Sunday, 27 August 2017

रक्तदान का व कोणी करावे?

 *रक्तदान का करावे?*

*सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात*
 *रक्‍तदान कोणी करावे व कसे?*

*रक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.*
*1]त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.*
*2]वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे.*
*3]हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.*
*4]रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.*
*5]उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.*
*6]रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.*


गणपती बाप्पा मोरया