Saturday, 23 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण पाॅझिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 
  • कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला 
आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा 
कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला 
असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक 
डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात 
एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे
अहवाल होकारात्मक आले आहेत.तर ३४ जणांचे
 अहवाल नकारात्मक आहेत
 तर ४ जणांचे अहवाल
 प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्द
करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने
रेड झोन मध्ये वाढ होत आहे.

Friday, 22 May 2020

उस्मानाबाद- शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार कोरोना रुग्ण

शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले 
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी दुपारी वाशी तालुक्यातील पिंपळगावच्या पती-  पत्नीचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले होते, त्यानंतर रात्री उशिरा दोन जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात पाथर्डी (ता. कळंब) आणि कुकडगाव ( ता. परंडा) येथील रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील  10 व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल  अनिर्णित (Inconclusive) आले असून एका व्यक्तीचा अहवाल परिपूर्ण न आल्यामुळे  रद्द (reject)करण्यात  आला आहे.दोन पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी एक कळंब तालुक्यातील पाथर्डी व दुसरी व्यक्ती परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील आहे.विशेष म्हणजे आजच  पाथर्डी येथील दाम्पत्याने कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, पण याच गावात पुन्हा नवा रुग्ण सापडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  कोरोना रुग्णाची संख्या २८ झाली आहे. पैकी सहा जण बरे झाले असून, २२ जणांवर उपचार सुरु आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्णांची वाढ सुरूच

 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सहाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात परंडा १, वाशी १, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असा समावेश आहे.

 गुरुवारी सकाळी शिराढोण  येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी १७ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले असून, पैकी चार  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्यस्थितीत १९ रुग्ण आहेत.
उस्मानाबादेतील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

उस्मानाबाद शहरात धारासूर मर्दिनी रोड भागातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती, दरम्यान या तरुणाच्या संपर्कातील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात एकूण 13 कोविड पॉझिटिव्ह  रुग्णावर उपचार 
 जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 982 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 220, लोहारा 76, कळंब 166, वाशी 18, भूम 41, परंडा 85 अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 840 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 34 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 92 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.
 आज दि.21/05/2020 पर्यंत एकुण 17 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हात आढळुन आले त्यापैकि 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले (उमरगा 3 व परंडा 1 ) सदयस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 13 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैदयकिय महाविदयाल सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे  तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4,  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे 1 असे एकुण 13 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत सदया त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

Tuesday, 19 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्याची रेड झोनकडे वाटचाल


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णाच्या संख्येत एकदम  सहाने वाढ झाली असून एकूण संख्या १३ झाली आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे यापूर्वी सात रुग्ण होते. त्यात  19 मे रोजी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये सहा जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा एक मुलगा , उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तुळजापूरची 1 महिला यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  विशेष म्हणजे वरीलपैकी तुळजापूरची महिला पुण्यावरून आली असून इतर सगळेजण हे मुबंई वरून आलेले आहेत.उस्मानाबाद जिल्हयात आल्यानंतर वरील सर्व 6 जणांना क्वारंटाईन केले होते.


उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागात असलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली असून तो तरुण मुंबई येथून सोलापूर पर्यंत खासगी जीपने त्याच्या आईसह 5 जणसोबत आला व त्यानंतर सोलापूरहुन 20 किमी पायी चालत हे आई व मुलगा उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आले व नंतर त्याचा भाऊ त्यांना दुचाकीवर उस्मानाबाद शहरात घेऊन आला. या रुगणाला अगोदर पासूनच ब्लड कॅन्सर असून त्यात कोरोना ही बाब चिंताजनक आहे. या तरुणाच्या घरी 12 जण असून इतर 7 असे 19 जण हायरिस्क संपर्कात आहेत.

तुळजापूर शहरातील 21 वर्षीय महिला ही पुणे येथून आली असून ती 6 महिन्याची गरोदर माता आहे त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, भोसले गल्लीत राहणाऱ्या या महिलेच्या संपर्कात 12 जण आले आहेत. भूम येथील 13 वर्षीय मुलगा हा मुंबई येथून आला असून त्याची बहीण मुंबई येथे पॉझिटिव्ह सापडली असून आई नर्स आहे. हा मुलगा वडिलांसोबत गावी आला असून त्याला शाळेत ठेवण्यात आले होते, याच्या संपर्कात 2 जण आहेत अशी माहिती गलांडे यांनी दिली.
परंडा तालुक्यातील 2 रुग्ण हे भूम तालुक्यातील रुग्णाच्या सोबत प्रवास करून आले होते त्यांच्या संपर्कातील 7 जण हायरिस्क आहेत.लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्ण कांदिवली मुंबई येथून आला असून त्याच्या संपर्कात 6 जण आले आहेत. या सर्व 6 रुग्णावर उपचार करण्यात येणार असून संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. कळंब येथील महसूल विभागाच्या कर्मचारी असलेल्या रुग्णाला अगोदरच किडनीचा त्रास असल्याने त्याची स्तिथी चिंताजनक बनली आहे.

Monday, 18 May 2020

अकलुजचा किल्ला व शिवसृष्टी

⛳ 🏰   *गडवाट*   🏰 ⛳

🗡️ *अकलूजचा किल्ला* 🗡️

*"अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे.*

 किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत.

तिकीट काढून किल्ल्यात शिरताना प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची म्युरल्स्‌ पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स्‌ व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स्‌ मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्‍यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.

किल्ल्याच्या मधोमध असणार्‍या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूस शेकोटी पेटवून पहार्‍यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.

किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इ समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.

किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.
"