Saturday, 25 April 2020

शकुनीची गोष्ट

*शकुनीची गोष्ट*


शकुनीचं वास्तव काय आहे?

गांधार देश व गांधारी याबद्दलची माहिती ही अत्यंत अल्प अशी माहिती आहे आपल्याला..महाभारत, कुरु व यदु कुल यांच्या प्रभावळीत गांधार देश हरवल्यासारखा आहे..

गांधार देश, गांधारी, शकुनी हा एक स्वतंत्र विषय होईल, एक मोठं पर्व, गांधार पर्व होईल एवढा इतिहास या गांधार देशाला महाभारतात आहे.परंतु, आपल्यापर्यंत केवळ गांधारी, तिचं अंध पतीला स्वीकारुन स्वतःचे नेत्र एका पट्टीनं बंद करणं व शकुनीचं कारस्थान एवढंच आलंय..

गांधार देश, आत्ताचा अफगाणिस्थान..राजा सुबल, यांना शकुनीसह एकूण शंभर पुत्र व गांधारीसह एकूण दहा कन्या होत्या..

गांधारी हे तिचं मूळ नाव नव्हे..गांधारीचं मूळ नाव शुभा हे होतं..जे गांधार देशावरुन नंतर गांधारी हे पडलं..शकुनीचं नाव सौबल..

शकुनि हा अत्यंत खलप्रवृत्तीचा असा..सर्वच बहिणींमध्ये शुभा ही अत्यंत लावण्यवती अशी..

तिला कायमच छळण्यात अग्रेसर असा शकुनी..

काल भीष्मांना कोणतं रहस्य समजलं होतं?

अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडून कळलं, ते अचंबित करणारं होतं. 

गांधारीच्या जन्म पत्रिकेत पहिल्या पतीच्या मृत्यूचा योग होता. यावर उपाय म्हणून गांधारीचा विवाह एका बोकडाशी करायचा आणि नंतर त्या बोकडाचा बळी द्यायचा, असं राजज्योतिषानं सुचवलं. 

अतिशय गुप्त पद्धतीने हा विधी पार पडला. यथावकाश गांधारी धृतराष्ट्राशी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या पहिल्या विचित्र विवाहाची कल्पना कुरू कुलात कोणालाही देण्यात आली नाही..

हा वृत्तांत ऐकून पितामह संतापले. बोकडाशी लग्न लावून देऊन त्याचा बळी दिल्यानंतर आणलेली कुलवधू ही एक अर्थानं विधवा ( हे पितामहांचे त्यावेळचे विचार असावेत, आत्यंतिक संतापापोटी आलेले) अशी, हे उद्या जगाला समजलं तर सगळीकडं आपली छी थू होईल या संतापानं त्यांच्या मस्तकात विचारांच्या ठिणग्या पडू लागल्या..

त्यांनी विचार केला की मी समस्त सुबल कुटुंबाचा उच्छेद केला तर हे गुपित कोणाला कधीच समजणार नाही हा उद्देश..

त्यांनी गांधारीला बोलावून घेतलं आणि विचारलं. गांधारीने घाबरत संकोचत सारं काही मान्य केलं. क्षमायाचनाही केली. चेहरा शक्यतो निर्विकार ठेवत पितामहांनी तिला जायला सांगितलं..

फसवणुकीनं संतापलेल्या पितामहांनी गांधार देशी सैनिकांची तुकडी पाठवली. गांधारीचे वडील आणि सर्व भावांना कैद करून हस्तिनापुरात आणलं. झाल्या गोष्टीची शहानिशा केली आणि त्यांना तळघरात डांबलं. गांधारीनं खूप विनवण्या केल्या, पण पितामहांनी त्यांना मुक्त करण्यास ठाम नकार दिला.

बंदिखान्यात असणार्‍या सुबलाला. त्याच्या पुत्रांना भोजन म्हणून दररोज केवळ एक मूठ्भर भात दिला जात असे..या कृतीमागं असणारा भीष्मांचा उद्देश सुबलाच्या लक्षात आला..

तो आपल्या पुत्रांना म्हणाला, ‘एखाद्या कुटुंबाची हत्या करणं म्हणजे अधर्म हे धर्मज्ञ असणार्‍या भीष्माला माहिती आहे. तेव्हा धर्मानं घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग न करता आपल्या सर्वांना मारुन टाकण्याचा हा मार्ग भीष्मांनी शोधून काढलाय..भीष्म आपल्याला रोज  अन्न देतात हे खरं असलं तरीही आपल्याला दिलं जाणारं अन्न इतकं अल्प असतं की, आपली उपासमार होते..अन शेवटी आपण सर्व उपासमारीनंच मरणार आहोत हे नक्की.या परिस्थितीतून आपण काहीही मार्ग काढू शकत नाही.

आपण भीष्मांकडं जे अन्न देताय, त्यापेक्षा जास्त अन्‍न द्या हे सांगणां म्हणजे भीक मागण्यासारखं आहे..यापेक्षा अपमानाची गोष्ट दुसरी कोणतीही नसेल..
त्यापेक्षा उपासमारीनं मरण आलेलं पत्करलं..
तसंच पलायन करणं हेही अनुचित, क्षात्रधर्माला अनुसरुन नाही..'

काळ उलटत गेला..कारावासात असलेल्या सुबल व सुबलपुत्रांची शारीरिक अवस्था खालावत गेली..

अन त्यावरुन सुरु झाले भांडणतंटे..

जगभरात व इतिहासात जेवढी म्हणून युद्धं झाली आहेत ती,जमीन, धनसंपत्ती, स्त्री व उपासमार..अन्नासाठी.

तेच झालं मिळणार्‍या मूठभर अन्नासाठी सर्वांमध्ये भांडणं सुरु झाली..
क्षुधा व्याकुळ व क्षीण अशा सुबलानं या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या पुत्रांपुढं एक विचार मांडला..

सुबल म्हणाला, ‘ आपल्यापैकी जो कोणी सर्वाधिक बुद्धिमान असणार्‍यानं एकट्यानंच हा भात खाऊन दिवस कंठावेत..
मात्र, एका अटीवर..
त्यानं आपल्यावर झालेल्या या अन्यायाला कधीही विसरता कामा नये..इतकंच नव्हे तर, त्यानं भीष्मांचा सूड घेण्यासाठीच फक्त जीवित राहावं..
जीवनाचं अंतिम ध्येय केवळ हेच राहिल..'

सुबलाची ही योजना त्याच्या पुत्रांना मान्य झाली..सर्वांनीच टाचा घासून मरण्यापेक्षा एकानं कोणी जीवित राहून हा सूड घ्यावा ही योजना सर्वांनाच पटली.त्यानुसार सर्वात तरुण अशा सौबल उर्फ शकुनी या सुबलाच्या पुत्राची निवड झाली..दिलं जाणारं सर्व अन्न शकुनि एकटाच खाऊ लागला..अन कालांतरानं सुबल कुटुंबातील इतर सदस्य हे उपासमारीमुळं तडफडून मेले.. प्रत्येक भावाच्या निधनानंतर गांधारीनं विलाप केला, पितामहांची करूणा भाकली. पण ते द्रवले नाहीत. होता-होता गांधारीच्या पित्याचा अंत जवळ आला.

परंतु प्राण सोडण्यापूर्वी सुबलानं, शकुनीला बोलावून जवळ असणार्‍या लोखंडाच्या दंडाचा आघात त्याच्या पायावर केला..साहजिकच शकुनीच्या घोट्याचं हाड मोडलं..शकुनिच्या मोडलेल्या घोट्याकडं बघून सुबल त्याला म्हणाला,

'माझ्यानंतर तुला वाचवण्यासाठी गांधारी शर्थीचे प्रयत्न करेल. तू शक्यतो जिवंत राहशील. पण तुझं उरलेलं आयुष्य आमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आहे, हे लक्षात असू देत.
तू आता आयुष्यभर लंगडत चालशील..अन प्रत्येक पाऊल टाकताना तू कुरुंनी आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायाची आठवण ठेवशील..त्यांनी केलेल्या अपराधांची आठवण ठेवून त्यांना तू कधीही क्षमाही करु नकोस..

तुझा हा मोडलेला पाय, प्रत्येक पावलावर तुला या कर्तव्याची आठवण करून देत राहील...'

थोड्याच वेळात गांधार नरेशही मरण पावला. 

शकुनीला असणारी द्यूताची आत्यंतिक आवड ही सर्वांना माहिती होती..लहानपणापासून द्यूतक्रीडा व त्यातून लोकांना लुबाडणं हे सर्वश्रुत होतंच..

त्याच आवडीचा आधार घेत, सुबल त्याला म्हणाला, ‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या बोटांच्या हाडांपासून तू द्यूतात वापरले जाणारे फासे घडव..या बोटांच्या हाडांमध्ये कुरुकुलाबद्दल मला असलेला सारा संताप व क्लेश उतरले आहेत.अन एवढंच नव्हे तर, हे फासे तुझ्या हुकुमाचे ताबेदार असतील..तुला हवं असणारं दान प्रत्येक वेळी पडत जाईल..
परिणामी, या फाशांच्या साहाय्यानं तू द्यूताचा प्रत्येक डाव जिंकत जाशील..'

भावांच्या मृत्यूंनंतर पित्याच्याही मृत्युनं गांधारी कोसळली. शकुनीला अभय द्या किंवा मलाही त्याच पद्धतीनं मरू द्या, असं म्हणत पितामहांच्या पावलांवर कोसळली. 

पितामहांना तोवर आपल्या वागण्याच्या योग्यायोग्यतेबाबत संदेह वाटू लागला होता. त्यांनी शकुनीला अभय दिलं... शकुनी हस्तिनापुरातच वाढू लागला...
भीष्मांनी इतर मुलांबरोबरच त्याचं पालनपोषणही केलं..

शकुनि आपणा कुरुकुलाचं हित चिंतणारे आहोत हे दर्शवत राहिला...
पणा भीष्माच्या आधिपत्याखाली वाढणार्‍या या कुळाचा सत्यानाश कसा घडवता येईल हा विचार सतत त्याच्या मनात राहिला..अन त्या दिशेनं त्याची पावलं चालत राहिली.. आणि पुढं सर्वज्ञात महाभारत घडलं...

गांधारीच्या मनातही कमी गाठी नव्हत्या..तिच्या संपूर्ण कुटुंबाची भीष्मांनी केलेली वाताहत कायमच धगधगत राहिली.

कुंती नंतर माद्री यांचे विवाह झाले..

तिन्ही विवाहांच्या तर्‍हा वेगळ्या..तिचा विवाह ज्या तर्‍हेनं झाला त्याबद्दल तिच्या मनी एक खंतही होती..आपणा या कुलात सम्राज्ञी म्हणून आलो असलो तरीही आपला विवाह साधेपणानं झाला व खटकणारी गोष्ट म्हणजे विवाहाचा सर्व खर्च तिच्या पित्याला करावा लागला होता..म्हणजे सुबल कुल योग्यतेचं नव्हतं का?
मानभंगाचं शल्य कायमच तिच्या मनात राहिलं..

शकुनीनं कौरव-पांडवांमध्ये कलह माजवला, जो की दोन्ही परिवारांना फक्त विनाशाकडे घेऊन गेला..

#शकुनी_काय_आहे?

शकुनी ही मूर्तिमंत खलप्रवृत्ती आहे...नकारात्मकता आहे..
चांगलं न बघवण्याची ही वृत्ती..

गांधारीच्याच एका आत्मकथनात, गांधारी लहान असतानाच शकुनीनं तिला कमळांच्या पुष्करिणीत ढकलून दिलं अन तिला वाचवायला जाणार्‍य बहिणींना त्यानं घाबरवलं, तुम्ही गेलात तर शुभा तुम्हालाही आत ओढेल..

घाबरवणं, भीती घालून न घडणार्‍या गोष्टीही मनात ठसवू पाहणार्‍या या वृत्तीचा जनक शकुनी असावा..

#धृतराष्ट्र...सतत आपल्या अंधपणाचा गंड बाळगून त्याबद्दल सहानुभूती मिळवण्यासाठी आक्रंदणारा..

सतत परिस्थितीला दोष देत रडत राहण्याची वृत्ती म्हणाजे धृतराष्ट्र..

महाभारतातली ही पात्रं, एकेक वृत्तीची उदाहरणं आहेत.

कुरुकुलाला संपवण्यासाठी कारणीभूत असणार्‍यात, भीष्म सर्वात आधी..

समस्त कुरुकुलाच्या अधोगतीला कारणीभूत ठरलं ते कुरुकुलच..

त्यातली प्रत्येक व्यक्ती..

शांतनुपासून ते शकुनीपर्यंत,अश्वत्थाम्यापर्यंत.
भीष्मही यातून सुटलेले नाहीत..

न विचार करता केलेली प्रतिज्ञा, त्याचा परिणाम किती भयंकर होऊ शकतो हा विचार न करता ती केली..

माणसाला असणारा मोह, किंवा माणसाचा ह्व्यास हा व हाच त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो, हा महाभारताचा सारांश आहे..

कुरुकुल म्हणाजे मानवी जीवन..अन ही सर्व त्यातल्या चांगल्या वाईट वृत्ती..

बारकाईनं विचार केला तर महाभारतात सारे प्रसंग, साऱ्या घटना, साऱ्या कथा या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या , सर्व भावभावनांना स्थान देणाऱ्या आहेत. 

महाभारतातही शृंगारापासून शांतरसापर्यंत साऱ्या रसांचा आविष्कार सहजपणे घडताना दिसतो. 


#तळटीप:-

कालपासून द्यूतक्रीडेचे भाग दूरदर्शनवर दाखवत आहेत..

त्यात एक प्रसंग असा आहे, शकुनी ही माझी सेना आहे, दुर्योधन.
पण ती तुझ्याकडे असू देत.
द्यूतक्रीडेच्या वेळी मला दे'

जेव्हा शकुनी माझ्या वतीनं फासे टाकेल हे दुर्योधंन म्हणतो तेव्हा विदुर काय म्हणतात बघितलंय का?

विदुर म्हणतात, द्यूत दुर्योधनाकडच्या फाशांनी होईल..

अन इथं शकुनीचा डाव बरोबर लागू पडतो.
विदुरांना जो संशय असतो,शकुनीच्या चलाखीचा तो बरोबर असतो...

पण शकुनी चलाखी करतोच..
त्याचे फासे दुर्योधनाकडे दिलेले असतात,जे विदुरांना माहिती नसतं.
तेच,सुबलाच्या अस्थीपासून केलेले.

Sunday, 19 April 2020

संधीवात व आयुर्वेद

*संधिवात व आयुर्वेद*
संधिवात बरेच गैरसमज आहेत ,काहींना वाटते तो बराच होत नाही पण आपल्याला बऱ्याच वेळा संधिवात म्हणजे काय हेच माहिती नसते
संधिवात म्हणजे काय ?
*संधी म्हणजे काय ? व त्याठिकाणी काय काय रचना असतात ? ज्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी वेदना होत असतात .

*संधीच्या ठिकाणी असणाऱ्या संरचना*
# त्वचा ,(Skin )
# मांसपेशी ,( muscle )
# स्नायू ,( Tendon )
# हाडे ,( Bones )
# लिगामेंट ,( Ligament )
# सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण ,( Synovial Fluid )
# दोन्ही सांधे एकमेकांना घासू नये म्हणून कुर्चा ( Cartilage )
# शुद्ध रक्तवाहिन्या ( Artery )
# अशुद्ध रक्तवाहिन्या (Veins )
# संवेदना नसा ( Nerve )
# रसवाहिन्या ( lymphatic Vessel )

प्रथम आपल्याला ज्या *वेदना होत आहे त्याचे मुख्य कारण* काय आहे हे शोधने गरजेचे आहे त्यानंतर त्यावर उपचार करणे .

बऱ्याच वेळा आपण ते कारण न शोधता मनाने किंवा कोणाच्या सांगण्यावरून ,जाहिरातीतून औषधे घेतो व वेळ ,पैसा ,तसेच त्या औषधाच्या दुष्परिणामाला बळी  पडतो ,

आयुर्वेद शास्त्र सांध्याच्या ठिकाणी वेदना होण्याच्या कारणांमध्ये २ कारणे विशेषताने सांगते

*१) त्या अवयवाचे व्यवस्थित पोषण न होणे* व
*२) त्या सांध्याच्या पोषणाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होणे* .

१) *अवयवाचे व्यवस्थित पोषण न होणे* म्हणजे सांध्याचे पोषण होण्यासाठी वर दिलेल्या सर्व संरचनांचे पोषण होणे गरजेचे आहे .

जसे ( त्वचा ,(Skin )मांसपेशी ,( muscle )स्नायू ,( Tendon )हाडे ,( Bones )लिगामेंट ,( Ligament )सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण ,( Synovial Fluid )दोन्ही सांधे एकमेकांना घासू नये म्हणून कुर्चा ( Cartilage )शुद्ध रक्तवाहिन्या ( Artery )अशुद्ध रक्तवाहिन्या (Veins )संवेदना नसा ( Nerve ) रसवाहिन्या ( lymphatic Vessel ) ,यांचे पोषण होण्यासाठी योग्य आहार घटकांची गरज आहे .

जसे
# *त्वचा* ( Skin) - हळद, काळे मनुके,तूप,मध,डाळिंब,आवळा,लोणी,पिकलेला आंबा ,लसूण
# *मांसपेशी* ( Muscles ) - गहू,बदाम,उडीद,आंबा,गाजर, मांस,तीळ,लाल भोपळा,कोहळा, तुपातील खजूर
# *अस्थी* ( Bones ) - शेवगा,जोडगहू लापशी, डिंक,जुने कच्चे तांदूळ पीठ (सुश्रुत),आहळीव, गव्हाचे सत्त्व, (चिक),दूध +तूप,लसूण(सुश्रुत)
शिंगड्याची खीर,शेवया खीर,अहळीव खिर
# *लिगामेंट* ( Ligament )  - उडीद  , स्नायू बंध ( बोकडाच्या संधींचे ) , पायासुप,चारोळी,रव्याचा शिरा,कोवळा ,मुळा,कोहळा पाक,हिरवा मूंग,उडीद वडे, शिरा
# *वंगण*- बदाम तेल,तीळ  तेल,एरंडेल,तूप ,शेंगदाणा तैल ,जवस तैल ,करडई तैल ,अक्रोड तैल ,खोबरेल तैल ,तैल बिया : तीळ ,जवस ,करडई ,शेंगदाणा. बदाम ,अक्रोड ,खोबरे ,दूध ,लोणी ,वसा ( प्राण्यांचे फॅट ) ,मज्जा ( प्राण्यांची मज्जा )
# *कुर्चा*- काळे तील कल्क,सर्व प्रकारचे हलवे (भोपळा,कोहळा,गाजर,) ,वसा ( प्राण्यांचे फॅट ) ,मज्जा ( प्राण्यांची मज्जा )
# *शुद्ध नी अशुद्ध रक्तवाहिन्या* - तांदूळ पेज +जिरे,खजूर+जिरे+गुळ,डोंगरी मोर आवळा ,अंजीर, काळे मनुके, ओली हळद,डाळिंब,कोकम, चटणी,राजगिरा लाडू,
# *नसा* ( Nerve )  - पिस्ता ,तीळ ,अक्रोड ,खोबरे+गुळं,फणस बीज,लोणी,दूध+तूप,कुष्मांड पाक ,कोहळा ,पेठा ,पाया सूप ,
# *रसवाहिन्या* ( Lymphatic system ) - खाण्याचे (नागवेल)पत्र,लवंग,विलायची, बडिशेफ,मिरे,ओवा(एकंदरीत लाळ उत्पन्न करणारी सर्व मसाला द्रव्य )increases lymphatic system drain by increasing metabolism

वरील सर्व पदार्थ हे पोषणासाठी गरजेचे असतात हे जर *आहारात योग्य प्रमाणात नसतील तर शरीराचे पर्यायाने सांध्यांच्या ठिकाणी योग्य पोषण होत नाही* व शरीराची झीज होण्यास सुरवात होते व संधिवेदना सुरु होतात .
हे सर्व पौष्टिक खाऊनही वेदना होत असतील तर त्याचे दुसरे कारण म्हणजे पोषण मार्गात अडथळा तो पुढील लेखात
क्रमश : 


शाळा बंद. ...पण शिक्षण आहे.

[14/04 09:39] Rameshwar Jagdale: [14/04 08:42] Sanjiv Bagal: दि.१४ एप्रिल २०२०, मंगळवार

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - २)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे.
     म्हणूनच  या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही यापुढील काळात रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे.

चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!


*आजचा विषय-गणित*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-आठवड्याचे वार*
https://bit.ly/3a8xW5O


*इयत्ता-दुसरी*
*पाठ-पाढे तयार करू या*
https://bit.ly/2VgHo1q

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-दिनदर्शिका*
https://bit.ly/2yadbZS

*इयत्ता-चौथी*
*पाठ-आकृतिबंध
https://bit.ly/2RwtDKP


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-परिमिती*
https://bit.ly/3a8xJ2w

*इयत्ता-सहावी*
*पाठ-भौमितिक रचना*
https://bit.ly/2RLKYjl

*इयत्ता-सातवी*
*पाठ-सांख्यिकी-स्तंभालेख*
https://bit.ly/34whnPG

*इयत्ता-आठवी*
*पाठ-क्षेत्रफळ*
https://bit.ly/2ybeeJm

*इयत्ता-नववी*
*पाठ-पृष्ठफळ व घनफळ*
https://bit.ly/3caP4cf


 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[14/04 08:42] Sanjiv Bagal: 👆👆👆👆👆👆👆👆👆👆

*महत्वाचे*

*सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था , शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना , शिक्षकांना व पालकांना अभ्यासमालेचा मेसेज रोज मिळेल यासाठी आपल्या अधिनस्थ सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत आवश्यक नियोजन करावे. माझ्या शिक्षक मित्रांनी देखील जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांच्यापर्यंत सदर मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करावी.*

*राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना या कालावधीत उत्तम व दर्जेदार ई साहित्य देण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करुया.*


आपला
दिनकर पाटील
शिक्षण संचालक,
महाराष्ट्र राज्य, पुणे

शाळा बंद ..... पण शिक्षण आहे ( अभ्यासमाला भाग - ३)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे आपल्या शाळा बंद आहेत. परीक्षा रद्द झाल्या आहेत.पण मला खात्री आहे की शालेय अभ्यासाच्या पलीकडे जाऊन तुमचं शिकणं चालू असेलच! आपण सतत काही ना काही तरी शिकतच असतो.पण या सततच्या शिकण्याला आपण शालेय अभ्यासाची जोड दिली तर...? तर हे अभ्यासपालिकडचं शिकणं अधिक समजपूर्वक आणि सखोल आणि विस्तृत होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे.
     म्हणूनच  या लॉकडाऊन(बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही यापुढील काळात रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

त्यानंतर आपल्याला आपल्या पालकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्स अपवर आलेल्या सुचनेतील विषयनिहाय पाठनिहाय लिंकना टच करून तो पाठ पहायचा किंवा स्वाध्याय सोडवायचा आहे.

चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!


*आजचा विषय-इंग्रजी*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-The fox and the crane*
https://bit.ly/3caFjea

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-Who is better?*
https://bit.ly/2K0kaY8

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-Find a friend!*
https://bit.ly/2XxTpCk

*इयत्ता-चौथी*
*पाठ-Never-ending story*
https://bit.ly/34wVq3h

*इयत्ता-पाचवी*
*पाठ-Dice for your game*
https://bit.ly/2yZ2v0M

*इयत्ता-सहावी*
*पाठ-A fantastic shop*
https://bit.ly/34KBHNL

*इयत्ता-सातवी*
*पाठ-Baby pangolin's out night*
https://bit.ly/2yZNHir

*इयत्ता-आठवी*
*पाठ-P.V.Sindhu: An icon of success*
https://bit.ly/2V56gKw

*इयत्ता-नववी*
*पाठ-The tempest*
https://bit.ly/2yigHRZ

यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम्ही एक विशेष प्रश्नमंजुषा देत आहोत.खालील लिंकवर जाऊन ही प्रश्नमंजुषा आपण सर्वांनी सोडवावी.*
https://bit.ly/2V9eRvT


*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[16/04 09:36] Rameshwar Jagdale: दि.१६ एप्रिल २०२०, गुरूवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ४)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत तुमच्यासाठी ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

*आजचा विषय-परिसर अभ्यास-१/विज्ञान*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-सुशिलाच्या रांगोळ्या*
https://bit.ly/2K5rUrT


*इयत्ता-दुसरी*
*पाठ-स्वरांची ओळख*
https://bit.ly/3epYrXJ

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-पाणी नक्की येते कुठून?*
https://bit.ly/2yd4YEq

*इयत्ता-चौथी*
*पाठ-अन्नपदार्थातील विविधता व पौष्टिकता*
https://bit.ly/3eni2HY


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-पर्यावरण आणि आपण*
https://bit.ly/2RE86zT

*इयत्ता-सहावी*
*पाठ-प्रकाश व छायानिर्मिती*
https://bit.ly/3en8eh5

*इयत्ता-सातवी*
*पाठ-चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म*
https://bit.ly/2Vu7vSB

*इयत्ता-आठवी*
*पाठ-मानवनिर्मित पदार्थ*
https://bit.ly/2RGUDrj

*इयत्ता-नववी*
*पाठ-अनुवंशिकता व परिवर्तन*
https://bit.ly/2yjyEQ5

*इयत्ता-दहावी*
*पाठ-अवकाश मोहिमा*
https://bit.ly/3bbSk7i

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[17/04 12:45] Rameshwar Jagdale: दि.१७एप्रिल २०२०, शुक्रवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ५)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

*आजचा विषय-परिसर अभ्यास-२/इतिहास-नागरिकशास्त्र/राज्यशास्त्र*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-प्राण्यांची ओळख*
https://bit.ly/2RI8WMm

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-गरजाधिष्ठित उपक्रम*
https://bit.ly/34FbZtT

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-आपल्या गरजा कोण पुरवतात?*
https://bit.ly/2XEYXel

*इयत्ता-चौथी*
*पाठ-गड आला पण सिंह गेला*
https://bit.ly/3afwzCj


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती*
https://bit.ly/2VegJ6y

*इयत्ता-सहावी*
*पाठ-दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये*
https://bit.ly/3beCfxH

*इयत्ता-सातवी*
*पाठ-संविधानाची उद्देशिका*
https://bit.ly/34DCUpW

*इयत्ता-आठवी*
*पाठ-महाराष्ट्र राज्याची निर्मिती*
https://bit.ly/2RJRtTx

*इयत्ता-नववी*
*पाठ-महायुध्दोत्तर राजकीय घडामोडी*
https://bit.ly/34GKJep

*इयत्ता-दहावी*
*पाठ-संविधानाची वाटचाल*
https://bit.ly/3aexJxC

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*
[18/04 18:36] Rameshwar Jagdale: दि.१८एप्रिल २०२०, शनिवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* ( अभ्यासमाला भाग - ६)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!

   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload


चला तर मग,सुरू करूया 'ऑनलाईन अभ्यास!

*आजचा विषय-परिसर अभ्यास-१/भूगोल*

*इयत्ता-पहिली*
*पाठ-विविध हालचाली व शारीरिक स्थिती*
https://bit.ly/3evKrvh

*इयत्ता-दुसरी*
*पाठ-व्यायाम*
https://bit.ly/3ae2S4A

*इयत्ता-तिसरी*
*पाठ-सुंदर दात,स्वच्छ शरीर*
https://bit.ly/2Vh6Q80

*इयत्ता-चौथी*
*पाठ-हवा*
https://bit.ly/3cqYnFk


*इयत्ता-पाचवी*
*पाठ-सामाजिक आरोग्य*
https://bit.ly/2xtP6xs

*इयत्ता-सहावी*
*पाठ-नैसर्गिक संसाधने*
https://bit.ly/3bjn8TB

*इयत्ता-सातवी*
*पाठ-भरती-ओहोटी*
https://bit.ly/2wKv4y7

*इयत्ता-आठवी*
*पाठ-स्थानिक वेळ व प्रमाण वेळ
https://bit.ly/3adimFP

*इयत्ता-नववी*
*पाठ-वाहतूक व संदेशवहन*
https://bit.ly/3bfYljb

*इयत्ता-दहावी*
*पाठ-पर्यटन,वाहतूक व संदेशवहन*
https://bit.ly/2K9oRio

 यासारखे अनेक घटक आपण दीक्षा ऍपवर स्वतःसुद्धा पाहू शकतो.

*उद्या दिनांक १९ एप्रिल 2020, रविवार रोजी या आठवड्यात पुरवण्यात आलेल्या ई-कंटेंटवर आधारित प्रश्नमंजुषा देण्यात येणार आहे.*

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


आपला
*श्री. दिनकर पाटील,*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे*