Sunday, 19 April 2020

संधीवात व आयुर्वेद

*संधिवात व आयुर्वेद*
संधिवात बरेच गैरसमज आहेत ,काहींना वाटते तो बराच होत नाही पण आपल्याला बऱ्याच वेळा संधिवात म्हणजे काय हेच माहिती नसते
संधिवात म्हणजे काय ?
*संधी म्हणजे काय ? व त्याठिकाणी काय काय रचना असतात ? ज्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी वेदना होत असतात .

*संधीच्या ठिकाणी असणाऱ्या संरचना*
# त्वचा ,(Skin )
# मांसपेशी ,( muscle )
# स्नायू ,( Tendon )
# हाडे ,( Bones )
# लिगामेंट ,( Ligament )
# सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण ,( Synovial Fluid )
# दोन्ही सांधे एकमेकांना घासू नये म्हणून कुर्चा ( Cartilage )
# शुद्ध रक्तवाहिन्या ( Artery )
# अशुद्ध रक्तवाहिन्या (Veins )
# संवेदना नसा ( Nerve )
# रसवाहिन्या ( lymphatic Vessel )

प्रथम आपल्याला ज्या *वेदना होत आहे त्याचे मुख्य कारण* काय आहे हे शोधने गरजेचे आहे त्यानंतर त्यावर उपचार करणे .

बऱ्याच वेळा आपण ते कारण न शोधता मनाने किंवा कोणाच्या सांगण्यावरून ,जाहिरातीतून औषधे घेतो व वेळ ,पैसा ,तसेच त्या औषधाच्या दुष्परिणामाला बळी  पडतो ,

आयुर्वेद शास्त्र सांध्याच्या ठिकाणी वेदना होण्याच्या कारणांमध्ये २ कारणे विशेषताने सांगते

*१) त्या अवयवाचे व्यवस्थित पोषण न होणे* व
*२) त्या सांध्याच्या पोषणाच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होणे* .

१) *अवयवाचे व्यवस्थित पोषण न होणे* म्हणजे सांध्याचे पोषण होण्यासाठी वर दिलेल्या सर्व संरचनांचे पोषण होणे गरजेचे आहे .

जसे ( त्वचा ,(Skin )मांसपेशी ,( muscle )स्नायू ,( Tendon )हाडे ,( Bones )लिगामेंट ,( Ligament )सांध्यांच्या मध्ये असणारे वंगण ,( Synovial Fluid )दोन्ही सांधे एकमेकांना घासू नये म्हणून कुर्चा ( Cartilage )शुद्ध रक्तवाहिन्या ( Artery )अशुद्ध रक्तवाहिन्या (Veins )संवेदना नसा ( Nerve ) रसवाहिन्या ( lymphatic Vessel ) ,यांचे पोषण होण्यासाठी योग्य आहार घटकांची गरज आहे .

जसे
# *त्वचा* ( Skin) - हळद, काळे मनुके,तूप,मध,डाळिंब,आवळा,लोणी,पिकलेला आंबा ,लसूण
# *मांसपेशी* ( Muscles ) - गहू,बदाम,उडीद,आंबा,गाजर, मांस,तीळ,लाल भोपळा,कोहळा, तुपातील खजूर
# *अस्थी* ( Bones ) - शेवगा,जोडगहू लापशी, डिंक,जुने कच्चे तांदूळ पीठ (सुश्रुत),आहळीव, गव्हाचे सत्त्व, (चिक),दूध +तूप,लसूण(सुश्रुत)
शिंगड्याची खीर,शेवया खीर,अहळीव खिर
# *लिगामेंट* ( Ligament )  - उडीद  , स्नायू बंध ( बोकडाच्या संधींचे ) , पायासुप,चारोळी,रव्याचा शिरा,कोवळा ,मुळा,कोहळा पाक,हिरवा मूंग,उडीद वडे, शिरा
# *वंगण*- बदाम तेल,तीळ  तेल,एरंडेल,तूप ,शेंगदाणा तैल ,जवस तैल ,करडई तैल ,अक्रोड तैल ,खोबरेल तैल ,तैल बिया : तीळ ,जवस ,करडई ,शेंगदाणा. बदाम ,अक्रोड ,खोबरे ,दूध ,लोणी ,वसा ( प्राण्यांचे फॅट ) ,मज्जा ( प्राण्यांची मज्जा )
# *कुर्चा*- काळे तील कल्क,सर्व प्रकारचे हलवे (भोपळा,कोहळा,गाजर,) ,वसा ( प्राण्यांचे फॅट ) ,मज्जा ( प्राण्यांची मज्जा )
# *शुद्ध नी अशुद्ध रक्तवाहिन्या* - तांदूळ पेज +जिरे,खजूर+जिरे+गुळ,डोंगरी मोर आवळा ,अंजीर, काळे मनुके, ओली हळद,डाळिंब,कोकम, चटणी,राजगिरा लाडू,
# *नसा* ( Nerve )  - पिस्ता ,तीळ ,अक्रोड ,खोबरे+गुळं,फणस बीज,लोणी,दूध+तूप,कुष्मांड पाक ,कोहळा ,पेठा ,पाया सूप ,
# *रसवाहिन्या* ( Lymphatic system ) - खाण्याचे (नागवेल)पत्र,लवंग,विलायची, बडिशेफ,मिरे,ओवा(एकंदरीत लाळ उत्पन्न करणारी सर्व मसाला द्रव्य )increases lymphatic system drain by increasing metabolism

वरील सर्व पदार्थ हे पोषणासाठी गरजेचे असतात हे जर *आहारात योग्य प्रमाणात नसतील तर शरीराचे पर्यायाने सांध्यांच्या ठिकाणी योग्य पोषण होत नाही* व शरीराची झीज होण्यास सुरवात होते व संधिवेदना सुरु होतात .
हे सर्व पौष्टिक खाऊनही वेदना होत असतील तर त्याचे दुसरे कारण म्हणजे पोषण मार्गात अडथळा तो पुढील लेखात
क्रमश : 


No comments:

Post a Comment