Showing posts with label Cooking. Show all posts
Showing posts with label Cooking. Show all posts

Tuesday, 7 August 2018

चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही अत्यंत महत्वाच्या टिप्स --

चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही अत्यंत महत्वाच्या टिप्स --

१) पहिल्यांदा टांगलेल्या धुडाच्या मागच्या पायांच्यामध्ये एक नजर टाकून घ्यावी.

२)साधारण आकारावरून मगच ठरवावं की घ्यायचं का नाही.मध्यमवयीन बोकडाच मटन सर्वोत्कृष्ट असतं.
 कोवळं लगेच शिजतं, राळ होतं, आणि हाडं खायला मजा येत नाही.

३) थोराड बोकडाचं मटन शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं नाही लागत.

४) मटन घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं रश्याला चांगली चव येते.
मऊ मटन खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात.
आमच्याकडे हाडांच्यावर जास्त डोळा असतो त्यामुळे हे प्रमाण ७०:३० आहे.

५)सीन्याचा भाग सर्वात चांगला. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात.

६)मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. नळीतला गुद्दु ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.(Noal Harari च्या म्हणण्यानुसार हे आपलं आद्य खाद्य आहे.)

७) काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा.

८) चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते.
चरबीच्या नावाखाली पडदा दिला जातो, तिथं २ मिनिट वाद घालण्याची तयारी ठेवावी.

९) जर्मनच्या पातेल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, मटन बेचव होतं.

१०) घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती-भाकरी चुरून खाता येते.
चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे.

११)लिंबू फार पिळून खाऊ नये, कांदा सुद्धा अगदी २-३ घासात एकदाच खावा. कोशिंबीर असेल तर हात सैल सोडण्यास हरकत नाही.

१२) लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा.
मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो.

मांसाहार - एक आध्यात्मिक पुण्य 84 लक्ष पशु जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो असे  सांगतात. पशूंपक्षांच्या जन्मात वर्षानुवर्षे वाया जाण्यापेक्षा, पशुपक्ष्यांना त्यातून मुक्त करून त्यांचा मनुष्ययोनीकडेचा प्रवास वेगवान करण्याचे पुण्यकर्म मांसाहारी लोक करत असतात.तेव्हा मांसाहाराला पाप समजण्याची चूक चुकूनही करू नका. मटण खा, पुण्य कमवा .

महत्वाची सुचना --  बोलवा कधी रविवार पाहून ??