Saturday, 1 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 1ST 2020 AT 8:30 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात 

कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.

 जिल्ह्यात गेल्या २४ तासात (शनिवारी )

 तीन जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर 

औरंगाबाद येथून आलेल्या रिपोर्ट मधून 

आणखी 4 कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. 





🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 

काल दि. 31/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब

 आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद 

येथील प्रयोशाळेत 402 व डॉ. बाबासाहेब 

आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र 

उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 111 असे 

एकूण 513 स्वाब नमुने तपासणी साठी 

पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब 

अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल. 

तसेच आज दुपारी औरंगाबाद येथून 44 

स्वाबचा अहवाल प्राप्त झाला असून त्याचा

 अहवाल खालील प्रमाणे आहे.

पाठवण्यात आलेले स्वाब - 548
➤ प्राप्त अहवाल - 44
➤पॉझिटिव्ह - 04
➤ निगेटिव्ह -17
➤ इनकनक्लुझिव्ह - 23
➤ प्रलंबित - 504

 🔹मृत्यू बाबतची माहिती:-

1) 45 वर्षीय पुरुष, फिल्टर टाकीजवळ, 

उस्मानाबाद.(बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू)
2) 50 वर्षीय पुरुष, किनारा हॉटेल जवळ, 

उस्मानाबाद.
3) 75 वर्षीय पुरुष, लहुजी नगर, उस्मानाबाद.

🔹चार पॉजिटीव्ह रुग्ण : उमरगा 

1) 50 वर्षीय पुरुष, कोळीवाडा उमरगा.
2) 37 स्त्री, महादेव गल्ली, उमरगा.
3) 16 वर्षीय स्त्री, महादेव गल्ल्ली, उमरगा.
4) 14 वर्षीय पुरुष, महादेव गल्ली, उमरगा.

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1290
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले 

रुग्ण - 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण 

- 717
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 57

◼️वरील माहिती. दि  01/08/2020 रोजी

 सायंकाळी 08:30 वाजेपर्यंतची आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 1ST 2020 AT 1:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या

 झपाट्याने वाढत आहे. शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी १२३ जणांचा

 कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. दरम्यान  निष्क्रिय जिल्हा शल्य 

चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे 

आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले असून आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्नाची संख्या

 दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच[प्रमाणे मृत्यू दर वाढला आहे. जिल्हा शासकीय 

रुग्णालयात दोन रुग्णाचा मृत्यू हा निष्क्रियतेचे बळी ठरले होते.

 आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉ. गलांडे यांचे उस्मानाबाद दौऱ्यात

 कान टोचले होते, परंतु त्यांच्या  कार्यपद्धतीमध्ये बदल झाला नाही.

 आरोग्य यंत्रणेशी त्यांचा समन्व्य नव्हता. त्यामुळे कोरोना रुग्णाचा 

मृत्यू दर वाढला होता. अखेर गलांडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात 

आले आहे. डॉ. डी.के. पाटील यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे.

आजचे रिपोर्ट. ...




OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 1ST 2020






कळंब : कळंब तालुक्यात आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

 त्यामुळे तालुक्यातील बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त 

झालेल्या अहवालाप्रमाणे कळंब शहरात 3 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात 2 रुग्ण हे त्या

 बड्या व्यापाऱ्याच्या संपर्कातील आहेत तर 1 रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील

 कर्मचारी आहे. तर डिकसळ गावात देखील आणखी 2 रुग्ण वाढले आहेत जे पूर्वीच्या 

संपर्कातील आहेत, ज्यात 70 वर्षीय वृद्धांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय

 अधिकारी डॉ. वायदंडे यांनी दिली.

तर सात्रा या गावात देखील 6 रुग्ण आढळले आहेत जे पूर्वीच्या बधिताच्या संपर्कातील 

आहेत. या 6 रुग्णांमध्ये 6 महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. कोठाळवाडी गावातील

 पारधी वस्तीतील एकाच स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरील व्यक्ती 

वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे.

कळंब शहरात एका बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीला इतर जिल्ह्यातील लोकही आले होते, तेथून त्या कुटुंबातील 48 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. नंतर शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली. शहरातील चैन ब्रेक करण्यासाठी 3 ते 9 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार पासून 7 दिवस कळंब शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे.

Friday, 31 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020 AT 7:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी १७४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे पाच जणांचा बळी गेला आहे.

 🔹मृत्यू बाबतची माहिती:-

1) 45 वर्षीय पुरुष, हनुमान चौक, उस्मानाबाद.
2) 91 वर्षीय पुरुष, आनंद नगर, उस्मानाबाद.
3) 78 वर्षीय पुरुष, राजीव गांधी
 नगर, उस्मानाबाद.
4) 65 वर्षीय स्त्री, रा. ढोकी, ता. जि. उस्मानाबाद.
5) 70 वर्ष पुरुष, रा. रत्नापूर ता.
 कळंब. (बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू)

🔹 जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून काल दि. 30/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील प्रयोशाळेत 411 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील प्रयोशाळेत 39 असे एकूण 450 स्वाब नमुने तपासणी साठी पाठवण्यात आलेले आहेत, त्याचा स्वाब अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 1160  *(3 पॉझिटिव्ह रुग्णांचे स्वाब डबल प्राप्त झाले होते)
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 516
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 590
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 54

◼️वरील माहिती. दि  31/07/2020 रोजी सायंकाळी 07:00 वाजेपर्यंतची आहे.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020 AT 1:30 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूने हाहाकार उडवला आहे. शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी तब्बल १७४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. रुग्णाची संख्या 1163 वर पोहचली आहे. त्याचबरोबर ४९ जणांचा आजवर बळी गेला आहे.







Thursday, 30 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 31ST 2020

धक्कादायक बातमी एक दोन नव्हे तर तब्बल 21 नवे रुग्ण सापडले!


https://youtu.be/CnhfmJBt4j4


🛑कळंब शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर


https://youtu.be/CnhfmJBt4j4


कळंब-14,मंगरूळ-06,देवधानोरा-01


एकूण 21 रूग्ण सापडले.  









OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 30TH 2020 AT 2:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी 132 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर आजपर्यंत सापडलेल्या रुग्णाची संख्या 991 वर पोहचली आहे तर 48 जणांचा बळी गेला आहे.










 दि. 29/07/2020 रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे 466 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 452 रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.  

➤पाठवलेले स्वाब नमुने - 466
➤ प्राप्त रिपोर्ट्स - 452
➤ पॉझिटिव्ह - 132
➤ निगेटिव्ह - 287
➤ इनक्लुझिव्ह - 32
➤ प्रलंबित -14

*️⃣ तालुका निहाय संक्षिप्त माहिती  खालीलप्रमाणे आहे. 

🔹 उमरगा:- 32
🔹 तुळजापूर:- 16
🔹 कळंब:- 03
🔹 वाशी:- 09
🔹 परंडा:- 02
🔹 उस्मानाबाद :- 67
🔹 लोहारा:- 01
♦️ एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:- 132

🔹जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 991
🔹जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 482
🔹जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 461
🔹जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 48

◼️वरील माहिती. दि  20/07/2020 रोजी दुपारी 02:00 वाजेपर्यंत ची आहे.

Wednesday, 29 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 29TH 2020 AT 7:00 PM

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी  रात्री आणखी २५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या २४ तासात १३० पॉजिटीव्ह आणि आठ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 






OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 29TH 2020 AT 12:30 PM

एकाच दिवशी 105 रूग्ण पाॅजिटीव 

चार जणांचा मृत्यू 










राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के ,निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी*                पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज (बुधवारी) जाहीर केला आहे. राज्यातील ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदाचा निकाल तब्बल १८.२० टक्के वाढला आहे.






यंदाही बारावीच्या परीक्षेत बाजी मारत ९६.९१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा ३. १ टक्क्यांनी जास्त आहे. या परीक्षेत १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के सर्वाधिक लागला आहे. यंदा औरंगाबाद निकाल विभागाचा निकाल ९२ टक्के असा सर्वांत कमी लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ९७. ३४ टक्के लागला असून राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

*विभागानुसार निकाल*

पुणे : ९७.३४ टक्के

नागपूर : ९३.८४ टक्के

औरंगाबाद : ९२ टक्के

मुंबई : ९६.७२ टक्के

कोल्हापूर : ९७.६४ टक्के

अमरावती : ९५.१५ टक्के

नाशिक : ९३.७३ टक्के

लातूर : ९३.९ टक्के

कोकण : ९८.७७ टक्के

एकुण : ९५.३० टक्के


दुपारी १ वाजल्या पासून निकाल येथे पाहता येईल :

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in 

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

Tuesday, 28 July 2020

मीठ- मीठाचे प्रकार आणि त्याचे औषधी उपयोग










---------------------------------------------

मिठाचे पाच प्रकार आणि उपयोग

मीठ: हा प्रत्येक गोष्टीत वापरला जाणारा पदार्थ आहे. काही लोकांना मीठ कमी खायला आवडतं तर काही लोकांना जास्त मीठ

खायला आवडतं. मीठ सोडियमचा सर्वोत्तम आणि स्त्रोत आहे. अन्न पचन करण्याव्यतिरिक्त सोडियम आपली पाचन तंत्र देखील

चांगले ठेवतो. परंतु जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात सोडियमचे सेवन करण्यास सुरवात करतात, तेव्हा ते फायद्याऐवजी शरीरावर

नुकसान करतात

काही ब्लड प्रेशर वाल्यांना सांधे मीठ वर्ण्य असते,

मीठ सोडियम आणि क्लोराईडपासून शुद्ध स्वरूपात बनलेले असते. आपले शरीर हे घटक स्वतः बनवू शकत नाही, म्हणून

आम्हाला ते आपल्या आहारातून घ्यावे लागेल. सोडियम आणि क्लोराईड आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या आत आणि बाहेरील

इतर खनिज पदार्थासह समन्वय साधून शरीराला सुलभतेने कार्य करण्यास मदत करते.

मीठाचे फक्त 1 नाही तर संपूर्ण 5 प्रकार आहे. आपल्या आरोग्यासाठी कोणते मीठ सर्वात चांगले आहे ते आपण जाणून घ्यायला

1

सामान्य मीठ

रोजच्या आहारात साधा मीठ नियमितपणे वापरला जातो, नावानुसार हे मीठ पांढल्या रंगाच्या दाणेदार क्रिस्टलसारखे आहे.

प्रक्रियेदरम्यान हे आयोडीनयुक्त समुद्रापासून मिळते.

या मीठामध्ये सोडियमचे प्रमाण सर्वाधिक आहे. टेबल मीठामध्ये आयोडीन देखील पर्याप्त प्रमाणात असते, जे आपल्या शरीराची

प्रतिकारशक्ती वाढवते. जर मीठ कमी प्रमाणात सेवन केले तर त्याचे बरेच फायदे होतात परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास

आपल्या हाडांवर थेट परिणाम होतो. ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. आजचा तरुण हाडांच्या अनेक प्रकारच्या आजाराने

त्रस्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात मीठाचे सेवन आणि फास्ट फूड,

2

सेंधा मीठ किंव्हा सैंधवमीठ

संधव मीठ, लाहोरी मीठ हा क्रिस्टल स्टोनसारखा खनिज पदार्थ आहे जो सोडियम क्लोराईड म्हणजेच सामान्य मीठ आहे. हे

बल्याचदा रंगहीन किंवा पांढरे असते, काहीवेळा त्याचा रंग हलका निळा, दाट निळा, जांभळा, गुलाबी, नारंगी, पिवळसर किंवा

तपकिरी असू शकतो. काळे मीठ हा सुध्दा एक प्रकारचा रोक मीठ आहे जे भारतीय अन्न आणि औषधामध्ये पचन करण्यासाठी

वापरले जाते.

रॉक मीठ किंव्हा संधव मीठ म्हणजे सिंध किंवा सिंधूच्या प्रदेशातून याची उत्पत्ती झाली म्हणून यास अपभ्रंश होऊन सैंधव हे नाव

पडले

ऐतिहासिकदृष्ट्या, मीठ उत्तर भारतीय उपखंडातून सिंधमधून, पश्चिम पंजाबमधील सिंधू नदीचे काही भाग आणि खैबरपख्तूनख्वाचा कोहट जिल्ह्यात आता पाकिस्तानमध्ये आहे आणि जिथे ती जमीन आढळते. तेथे येत असते . 'रॉक मीठ' ' 'संधव

मीठ म्हणजे सिंध किंवा सिंधूच्या प्रदेशातून येते . पश्चीम उत्तर पंजाब येथे नमक कोह (म्हणजे मीठ माउंटन) नावाची एक प्रसिद्ध

डोंगररांग आहे जिथून मिठाची उत्पत्ती होते. आणि या भागात प्रसिद्ध खेवाडा मीठ खाण आहे. या मीठाला 'लाहोरी मीठ' असेही

म्हणतात कारण बहुतेक वेळा संपूर्ण उत्तर भारतात लाहोरी मीठ म्हणून विकले जाते .

सैंधव मीठ काहीसे चिकट, पांढ?या किंवा तपकिरी रंगाचा असते.

याचा उपयोग पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदात सैंधव मीठ देखील महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जाते. हे मीठ

कोणत्याही रसायनाशिवाय नैसर्गिकरित्या तयार होते. या कारणास्तव भारतात त्याचा वापर धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जात

आहे.

हे मीठ मुख्यतः उपवास आणि उपवासाच्या दिवसांमध्ये वापरले जाते. धार्मिक दृष्टीकोनातून संध्या मीठाचा वापर जास्त केला जातो,

त्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण साध्या मीठापेक्षा जास्त आहे. हेआपल्याआरोग्यासाठीही खूप चांगले आहे.

ज्यांना हृदय आणि मूत्रपिंडाचा त्रास आहे अशा लोकांसाठी हे मीठ सेवन करणे फायदेशीर ठरते.

3

black salt

काळे मीठ, हलका काळा रंग, तपकिरी रंग, हिंदीमध्ये याला काला नमक ‘पादेलोन म्हणतात परंतु इतर भाषांमध्ये याला वेगवेगळी

नावे दिली जातात. काळे मीठ सुलेमानी मीठ म्हणून देखील ओळखले जाते.

हे मीठ खारट आणि चवीनुसार तिखट आहे. हे पाकिस्तान ' हिमालय आणि गुजरात राजस्थान येथेही खडकाच्या स्वरूपात मिळते.

काळ्या मिठाचे सेवन करणे प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे. ते घेतल्यास, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, चक्कर

येणे, उलट्या होणे आणि थेट चिंताग्रस्तपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकते. उन्हाळ्याच्या मोसमात, डॉक्टर लिंबाची

पाळी किंवा ताक सह काळे मीठ खाण्याची देखील शिफारस करतात. काळी मीठ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असले तरी

त्यात फ्लोराईड असते म्हणून जास्त प्रमाणात सेवन केल्याने नुकसान होण्याचा धोका असतो सोडियम क्लोराईड, सोडियम बाय

---------------------------------------------सल्फेट, सोडियम सोडियम सल्फाइड, लोह सल्फाइड, हायड्रोजन सल्फर मुळे या मीठाला विशेष वास येतो. त्याचा रंग काळा '

फिकट गुलाबी आहे. हे

है भूक वाढवते आणि अन्नाला एक वेगळी चव देते. काळ्या मीठ प्रामुख्याने कोशिंबीरी, रायता, फळांचा चाट,फरसाण शीतपेय

इत्यादींमध्ये वापरला जातो,

यात औषधी गुणधर्म देखील आहे. काळ्या मीठात खूप प्रकारची खनिजे आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी

आहेत. आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा समावेश करू शकता,

सकाळी रिकाम्या पोटी रोज कोमट पाण्यात मिसळलेल्या लिंबाचा रस आणि एक चिमूटभर मिठ प्या, काही दिवसांत तुमची

पचनशक्ती पूर्णपणे ठीक होईल, पोटात गॅस आणि ज्वलनचे कोणतेही चिन्ह दिसणार नाही. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब,

सांधेदुखीसारख्या सर्व आजारांना दूर करण्यास हे खूप उपयुक्त आहे .

पाचक प्रक्रियेत एका ग्लास कोमट पाण्यात एक चिमूटभर मीठ घाला आणि थोडावेळ ठेवा नंतर . कोमट असताना ते प्या.

पोटाच्या सर्व आजारांसाठी हा रामबाण उपाय आहे. काळ्या मिठाने भूक नसणे देखील दूर केले जाते. यासाठी आपण कोणत्याही

स्वरूपात काळे मीठ वापरू शकता,

हृदयरोग प्रसार झपाट्याने होत आहे. खराब कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, साखर, लठ्ठपणा हे सर्व आपल्या हृदयाचे शत्रू आहेत. या सर्व

गोष्टी दुरुस्त आणि नियमित करण्यासाठी काळा मीठ खूप प्रभावी आहे. हृदयरोग आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना समुद्री

मीठापेक्षा काळे मीठ अधिक फायदेशीर आहे.

काळ्या मीठात सामान्य मीठापेक्षा कमी सोडियम असते. जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात खूप मदत करते. यामुळे कोलेस्टेरोल

आणि साखर नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच लठ्ठपणा कमी होतो. लठ्ठपणावर मात करण्यासाठी, एका ग्लास कोमट पाण्यात

लिंबू आणि काळे मीठ प्यावे, ते सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 15-20 मिनिटांनी द्रुत फेरफटका मारा. यानंतर 15-20 मिनिटे

पाणी पिऊ नका.

सर्दी-खोकला-दमा मध्ये प्रभावी

सर्दी, खोकला आणि दम्याचा उपचारात काळे मीठ खूप प्रभावी आहे. आपण त्यात थोडे काळे मीठ घालून कोमट पाणी पिऊ

शकता. उकळत्या पाण्यात काळे मीठ घालून त्याची वाफ कफ, श्लेष्मा आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करते.

डोक्यातील कोंडा *डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारचे साबण आणि शैम्पू वापरतात, याचे बरेच दुष्परिणाम

आहेत. केसांवर काळे मीठ आणि लाल टोमॅटो यांचे मिश्रण लावल्याने कोंडा लवकरच अदृश्य होतो

सांधे दुखी बरे

बयाच लोकांसाठी 30 वर्षाचे वय येताच सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. साधारणपणे याला आर्थरायटिस म्हणतात. काळे मीठ

सांधेदुखीचे बरे करण्यास उपयुक्त ठरते. गरम पाण्यात काळे मीठ मिसळणे आणि वेदनादायक भागावर शेक दिल्यास वेदनापासून

लवकरच आराम मिळतो. 15-20 दिवसांसाठी दररोज दोन ते तीन वेळा जादुई परिणाम सांध्याच्या वेदनांमध्ये दिसून येतो.

आयुर्वेदात काळे मीठ बद्धकोष्ठता, पाचक समस्या गेंस बरे करते. म्हणूनच काळ्या मीठात सर्व आयुर्वेदिक पाचक गोळ्या आणि

हिंगवाष्टक चूर्ण, हजमोला इत्यादी चूर्णात मिसळ केले जाते.

4 लोसोडियम मीठ

या मीठाला बाजारात पोटेंशियम मीठ देखील म्हणतात. तथापि, साध्या मीठाप्रमाणेच यात सोडियम आणि पोटॅशियम क्लोराईड

देखील असते. ज्या लोकांना रक्तदाब समस्या आहे त्यांनी कमी सोडियम मीठ घ्यावे. याशिवाय हे मीठ मधुमेह आणि मधुमेह

रूग्णांसाठीही फायदेशीर आहे.

5 समुद्री मीठ

हे मीठ बाष्पीभवन करून बनवले जाते आणि साध्या मिठासारखे खारट असते हे कोकण महाराष्ट्रात जास्त आगर , पीकवले जाते.

पण ते अशुध्द स्वरूपात मळ युक्त असते .. तणाव गोळा येणे, आतड्यांसंबंधी वायू आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दरम्यान

समुद्र मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो,

फोटोत पहिले काळे मीठ दुसरे सैंधवी मीठ तिसरी गुलाबी रंगाची पावडर ही दोनातले कुठलेही मीठा ची पावडर केल्यास काहीशी

गुलाबी दिसेल.

---------------------------------------------

आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे आज काल कंपनी वाले अनैसर्गिक रित्या काळे मीठ तयार करू लागले आहेत ' हे करण्यासाठी,

साधे मीठ हिरड्यांचा बियाना मिठात घालून उकळले जातात, उकळल्यानंतर, पाणी बाष्पीभवन होते आणि उर्वरित स्फटिकासारखें

मीठ असते ते काळ्या रंगाचे होते. मग ते काळे मीठ म्हणून बाजारात दुप्पट दराने विकले जाते याचे चूर्ण केल्यावर त्याची पण

पावडर गुलाबी होते .म्हणूनच जर तुम्ही काळे मीठ आणत असाल तर ते पावडर स्वरूपात न आणता मोठ्या खड्याच्या स्वरूपातले

विकत आणा.

आणखीन एक गुपित कंपनीत साबण करण्यासाठी समुद्री पाण्याचा वापर करतात हे साबण करताना त्या पाण्याचे बामि भवन

होऊन शेवटी मिठात रूपांतर होते तेच मीठ टेबल किंव्हा कुकीग मीठ म्हणून बाजारात विकले जाते.

आयुर्वेदानुसार, समुद्री मीठ स्वतःमध्ये खूप धोकादायक आहे. या व्यतिरिक्त कंपन्या त्यात अतिरिक्त आयोडीन घालत आहेत!

आयोडिन देखील दोन प्रकारांचा आहे. एक आधीपासूनच मीठात असते ! दुसरे म्हणजे औद्योगिक आयोडीन! हे खूप धोकादायक

आहे! म्हणूनच आधीच धोकादायक असलेल्या समुद्री मीठामध्ये कंपनी संपूर्ण देशाला अतिरिक्त ओद्योगिक आयोडीनची विक्री

करीत आहे! ज्यामुळे गंभीर लोक आपल्यापासून त्रस्त आहेत. हे मीठ कारखान्यामध्ये मानव तयार करतात! सामान्यतः वापरल्या

जाणाच्या समुद्री मीठामुळे उच्च रक्तदाब (उच्च बीपी), मधुमेह इत्यादी गंभीर आजार देखील होतात. याचे एक कारण म्हणजे हे मीठ

अम्लीय आहे, ज्यामुळे रक्तातील आंबटपणा वाढत आहे आणि रक्त आंबटपणा वाढत आहे, हे सर्व 48 रोग उद्भवतात. हे खारट

पाणी कधीही पूर्णपणे विरघळत नाही. त्याच प्रकारे ते शरीरात विरघळत नाही आणि अंत मूत्रपिंडातून बाहेर पडत नाही आणि दगड

देखील कारणीभूत ठरतो. म्हणूनच आपण दर रोजच्या जेवणात हे आयोडिन मीठ न वापरता नैसर्गिक काळे मीठ वापरल्यास

आरोग्याला पण फायदे होतील आणि हे मीठ आणला त तर ओल्या जागी किंव्हा उघडे ठेऊ नये पटकन विरघळून पाणी होईल .

आणि जर ओले लागले तर उन्हात सुखवत ठेवा.



कोरोना कहर; उस्मानाबाद जिल्ह्यात 95 जण पॉझिटिव्ह

कोरोना कहर; जिल्ह्यात 95 जण पॉझिटिव्ह, उमरग्यात 46, रात्री उशिरा अहवाल, जिल्ह्यात खळबळ

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून एकाच दिवसात तब्बल 95 रुग्णांची भर पडली आहे. रात्री उशिरा याबाबत प्राथमिक माहिती समोर आली असून याबाबत सविस्तर माहिती लवकरच मिळेल. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 824 वर गेला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून जिल्हाभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एवढे होवून देखील प्रशासन मात्र ठोस निर्णय घेण्याच्या अजूनही मूड मध्ये नाही.
दि.२७ जुलै रोजी उस्मानाबादच्या प्रयोगशाळेत पाठविलेल्या स्वॅबपैकी ६८ नमुने पेंडिंग आहेत तर मंगळवारी ६७ स्वॅब पाठविण्यात आलेलेही अहवाल पेंडिंग आहेत. शिवाय औरंगाबादला मंगळवारी पाठविलेल्या ३६७ रिपोर्टपैकी काही अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यात ९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर उस्मानाबादच्या प्रयोगशाळेतून दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. म्हणजे जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ९५ जण पॉझिटिव्ह आले. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे उर्वरित रिपोर्ट आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ८२४ वर गेली आहे. अहवाल उशिराने येत असल्याने संशयित रुग्णांची व कुटुंबीयांची घालमेल सुरू असून, आधीच वेळेत स्वॅब घेतले जात नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागत आहे. उस्मानाबादेत हक्काची प्रयोगशाळा उभारल्याने कोरोनाची तपासणी तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी हे काम नवीन असल्याने तपासणीला अपेक्षित गती आलेली नाही.
रात्री उशीर झाल्याने आरोग्य विभागाने माध्यमांना रुग्णांची माहिती दिलेली नाही. आज सकाळी माहिती मिळण्याची शक्यता आहे. माहिती आल्यांनतर दिवसातील कोरोना बाधितरुग्णांची संख्याही वाढलेली दिसेल आणि रुग्ण कुठल्या गावाचे हे पण समोर येईल.
उमरगा तालुक्यात ४६ पॉझिटिव्ह निघाले असून नगरपालिकेतील १३ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 28 2020 AT 10:30 PM


---------------------------------------------

कळंब : कळंब तालुक्यात आणखी 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

 कळंब शहरात 2,

डिकसळ गावात 3 

तर मंगरूळ येथे 1 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

 विशेष म्हणजे

कळंब शहरात एकाचा मृत्यू झाला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 

खळबळ उडाली आहे. या मृत व्यक्तीला कुठून कोरोनाची बाधा झाली, याची 

माहिती प्रशासन घेत आहे. 

 कळंब शहरातील शिवाजी नगर भागात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, जो 

पुण्याहून आल्याची माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी 

डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली. 

 डिकसळ 2 जण पूर्वीच्या संपर्कातील आहे तर 1 रुग्ण गणेश नगर येथील असून

 तिच्यावर  बार्शी येथे उपचार सुरू आहेत.

मंगरूळ या गावात एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. लातूर येथून त्याला बाधा

 झाल्याचं कळतंय. 

मागच्या 8 दिवसात कळंब शहरात 10 आणि तालुक्यात एकूण 18 रुग्ण आढळले

असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सापडलेल्या एकाच कुटुंबातील 7

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 35 जणांना प्रशासनाने क्वाराईनटाईन केले 

आहे. त्यापैकी 23 जणांचे स्वाब नमुने घेण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या 

सुरुवातीला एकही ऍक्टिव्ह नसलेल्या कळंब तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची

 संख्या वाढत चालली आहे, म्हणून चिंताही वाढली आहे.



OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 28TH 2020 AT 1:30 PM

#उस्मानाबाद जिल्हयातील कोवड 19 ची माहती

दिनांक:-28/07/2020 

वेळ:- दु. 01:30 

शा. वै. म. औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेन्द्र

 उमानाबाद येथे पाठवण्यात आलेले अहवाल प्राप्त झाले असुन याचा अहवाल

खालीलमाणे आहे.

https://t.co/1U2tal4NMb





Monday, 27 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 27TH 2020 AT 10-15 PM

उस्मानाबाद कोरोना अपडेट 






नवे ४५ रुग्ण तर दिवसभरातील 10 मिळून 55 रुग्ण

उस्मानाबाद प्रयोगशाळेतील 96 स्वाद पैकी 2० पा झीटिव्ह एकूण 

दिवसभरात 75 रुग्णांची भर..

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७०० पार...

दि.27/07/2020

रात्री 10:15 वाजता

दि. 26/07/2020 रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे 178 स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 178

रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे आहे.

.

* पाठवलेले स्वाब नमुने-178

* प्राप्त रिपोर्ट्स - 178

•पॉझिटिव्ह-45

निगेटिव्ह-122

इनक्लुझिव्ह - 11

• तालुका निहाय संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे आहे.

उमरगा:-21

तुळजापूर:-09

कळंब:-07

वाशी:-06

परंडा:-01

लोहारा:-01

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण:-45

जिल्ह्यातील एकूण रुग्ण-708

जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -465

जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 204+4*(*बाहेरच्या 

जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद येथे उपचार सुरू)

जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39

वरील माहिती दि 27/07/2020 रोजी रात्री 10:15 वाजेपर्यंत ची 

आहे.


OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON 27TH JULY 2020 AT 6-30 PM

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्णाचीभर , एकाचा मृत्यू सोमवारी


 दिवसभरात दहा रुग्णाची भर .







उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी आणखी दोन कोरोना 


रुग्णाची भर पडली आहे तर एकाचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे 


आतापर्यंत ३९ जणांचा बळी गेला असून, मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त


 केली जात आहे. 


दि. 26/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 


उपकेंद्र उस्मानाबाद येथे 110  स्वाब पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 


रिपोर्ट्स जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना  प्राप्त झाले असून त्याचा अहवाल 


खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 110 


प्राप्त रिपोर्ट्स - 14 


पॉझिटिव्ह - 02 


निगेटिव्ह - 12 


इनक्लुझिव्ह - 0 


प्रलंबित - 96 


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.


उस्मानाबाद :- 02 


1) 13 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी,रुपी


नगर, निगडी, पुणे. (बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू


 उस्मानाबाद येथे उपचार सुरू) 


2) 29 वर्षीय पुरुष, आगड गल्ली, उस्मानाबाद.


️मृत्यू बाबतची माहिती:- 1) 60 वर्षीय पुरुष, विष्णुपुरी


उमरगा. 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 663 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 465


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण -


 159+4*(*बाहेरच्या जिल्ह्यातील परंतू उस्मानाबाद


 येथे उपचार सुरू) 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 39 


️वरील माहिती. दि  27/07/2020 रोजी सायंकाळी


6:30 वाजेपर्यंत ची आहे.


OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 27th 2020 AT 11-00 AM

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारी आठ


 रुग्णाची भर 






उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण


 दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. सोमवारी सकाळी


 आठ रुग्णाची  भर पडली आहे. तसेच उस्मानाबाद येथे


 कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभी करण्यात येऊनही


 अद्यापही अंबाजोगाई   येथे स्वाब पाठवण्यात येत


 आहेत. 


उस्मानाबाद  दि. 26/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय


 उस्मानाबाद येथून 196 स्वाब नमुने तपासणी साठी


 स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई  येथे


 पाठविण्यात आले होते, त्यापैकी 194 रिपोर्ट्स रात्री


 उशिरा प्राप्त झाले असून  पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल


 खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 196 


प्राप्त रिपोर्ट्स - 194 


पॉझिटिव्ह - 08 


निगेटिव्ह - 183 


प्रलंबित - 02 


इनक्लुझिव्ह - 03     


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 


उमरगा - 03 


तुळजापूर - 03 


कळंब - 01  


परांडा - 01 


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 08


उमरगा - 03 


1) 26 वर्षीय स्त्री, रा.डिग्गी  रोड, उमरगा. 


2) 70 वर्षीय स्त्री, रा. पंचशील नगर, उमरगा. 


3)  40 वर्षीय स्त्री,रा. पंचशील नगर उमरगा. 


तुळजापूर :- 03 


1) 43 वर्षीय पुरुष, रा.अणदूर, ता. तुळजापूर 


2) 20 वर्षीय पुरुष, रा. काटी ता. तुळजापूर. 


3) 9 वर्षीय मुलगा, रा. काटी ता. तुळजापूर. 


कळंब - 01  


कळंब :- 0 1) 9 वर्षीय मुलगी  रा.डिकसळ ता. कळंब.  


परांडा:- 01 


1) 40 वर्षीय स्त्री,रा. साकत  ता. परंडा.


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 662 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 422


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 202+ *3


 ( बाहेरच्या जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये


 उपचार घेत आहेत ) 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 38 


️वरील माहिती. दि.  27/07/2020 रोजी सकाळी


 11:00 वाजेपर्यंत ची आहे. 


शेती विषयक - खते व औषधे







*1)क्लोरमेक्वाट क्लोराईड ---::* वाढ निंयञक

*2)एन ए ए ---::* नैसर्गीक गळ थांबवीणे

*3)जि ए --::* पेशीची संख्या वआकार वाढविणे

*4)नायट्रोबेंझीन ---::* कळी व फुले काढणे

*5)टायकंटेनाॅल--::* प्रकाश सश्लेषण वाढविणे. . ...... . 

 *6)ह्युमिक अॅसीड 6% --::* सुपीकता वाढविणे ,

*7)ह्युमिक अॅसिड 12 %वर --::* पाढ-या मुळाची वाढ .......

*8)बायो स्टिमुलंट--::* नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे ....

*9)सुक्ष्म अन्नद्रव्ये --::* पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे .......

*10)स्टिकर --::* पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.. .......

*11)अमिनो अॅसीड--::* हिरवे व कोवळेपणा वाढविणे

*12)अँन्टीआॅक्सीडंट--::* झाडाला तारूण्य वाढविणे... .... .

*13)प्रथम अन्नद्रव्ये --::* नञ, स्फुरद, पालाश ..

*14)दुय्यमअन्नद्रव्ये--::* मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक

*NPK*:- नत्र-स्फुरद-पालाश

*19:19:19*:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी

*12:61:00*:-फुटवा जास्त येण्यासाठी

*18:46:00*:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

*12:32:16*:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी

*10:26:26* :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी

*00:52:34*:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी

*00:00:50*:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.

🌿 कृषिसेवा 🌿

हे माहीत आहे का?

मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ

विद्राव्य खतांचे कार्य...

🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०*

या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._

🌿 *१२:६१:०*

या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. _नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो._

🌿 *०:५२:३४*

या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत. _फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते._

🌿 *१३:०:४५*

या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते. _फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे पाणी कमी असताना पिके तग धरू शकतात._

🌿 *०:०:५०+१८*

या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध सल्फेट भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते. _पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले अशकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते._

🌿 *१३:४०:१३*

पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

🌿 *कॅल्शियम नायट्रेट -*

मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

🌿 *२४:२४:०*

यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाखीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.💐💐💐

Sunday, 26 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 26TH 2020 AT 8-30 PM

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ११ रुग्णाची भर, एकाचा मृत्यू 


रविवारी दिवसभरात २४ रुग्णाची भर, तिघांचा मृत्यू 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सायंकाळी आणखी 


११ कोरोना रुग्णाची वाढ झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला 


आहे. दिवसभरात २४ रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात


तीन जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.








दि. 25/07/2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा 


उपकेंद्र उस्मानाबाद येथे पाठविण्यात आलेले प्रलंबित 53 रिपोर्ट्स 


जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले असून त्याचा अहवाल


 खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 53 


प्राप्त रिपोर्ट्स - 53 


पॉझिटिव्ह - 11 


निगेटिव्ह - 40 


इनक्लुझिव्ह - 2    


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. 


 उस्मानाबाद :- 11 


1) 15 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद 


2) 35 वर्षीय स्त्री, बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद. 


3) 7 वर्षीय स्त्री,बजाज हाउसिंग सोसायटी, उस्मानाबाद. 


4) 43 वर्षीय पुरुष, समता कॉलनी, उस्मानाबाद. 


5) 35 वर्षीय पुरुष, लक्ष्मी नगर उस्मानाबाद.


6) 65 वर्षीय पुरुष, सांजा रोड, उस्मानाबाद. 


7) 9 वर्षीय, पुरुष सिव्हिल कॉर्टर, उस्मानाबाद.


8) 37 वर्षीय स्त्री, माणिक चौक उस्मानाबाद. 


9) 62 वर्षीय पुरुष, तांबरी विभाग, उस्मानाबाद. 


10) 40 वर्षीय पुरुष, महात्मा गांधी नगर, उस्मानाबाद.


 11) 46 वर्षीय पुरुष, खाजा नगर, उस्मानाबाद. 


मृत्यू बाबतची माहिती:- 1) 38 वर्षीय स्त्री, माणिक चौक, 


उस्मानाबाद. 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 657 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 422


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 197


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 38 


️वरील माहिती. दि  26/07/2020 रोजी रात्री 8:30 वाजेपर्यंत ची 


आहे.


आधारकार्ड ला मोबाईल नंबर कसा जोडावा

आधार कार्ड हे एखाद्या व्यक्तीचे सर्वात महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. अनेक सरकारी आणि खासगी  private नोकरीसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. दरम्यान, अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसह आधार कार्ड लिंक करणे देखील बंधनकारक झाले आहे. आधार ऑनलाइन सेवा मिळविण्यासाठी आधार कार्डधारकाला आपला मोबाइल नंबर यूआयडीएआयकडे नोंदवावा लागेल. आधार कार्डसाठी नावनोंदणीच्या वेळी एखाद्याचा आपला मोबाइल नंबर यूआयडीएआयकडे नोंदविला जावा.







जर कार्डधारकाने नावनोंदणीच्या वेळी आपला मोबाईल क्रमांक नोंदविला नसेल किंवा कार्डधारकाला त्याचा नवीन मोबाइल नंबर आधार कार्डवर नोंदवायचा असेल तर कार्डधारकास कायम नोंदणी केंद्रात जावे लागेल. आधार कार्डासह मोबाईल नंबरची नोंदणी करण्याची प्रक्रिया काय आहे ते आम्हाला कळू द्या अर्जदाराने त्याच्या आधारमध्ये मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करणे आवश्यhtक नाही.

पायरी 1. कार्डधारकाने प्रथम युनिक आयडेंटिफिकेशन Authorityथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) वेबसाइट 

 https://www.uidai.gov.in/

वर भेट दिली पाहिजे. येथे कार्डधारकास 'माझा आधार' टॅबवर जा आणि 'लोकेट एंड एनरोलमेंट सेंटर' वर क्लिक करावे लागेल. आता एक पृष्ठ उघडेल जिथे कार्ड धारकांना त्या संबंधित माहिती देऊन त्यांच्या जवळच्या नोंदणी केंद्राचा पत्ता माहित असेल.

 पायरी २. आता कार्डधारकास नावनोंदणी केंद्रात जाऊन आधार दुरुस्ती फॉर्म भरावा लागेल. 

पायरी 3. या फॉर्ममध्ये, कार्डधारकास त्याचा सक्रिय मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल, जो आधारमध्ये अद्यतनित केला जावा.

पायरी 4. आता कार्ड धारकाला हा फॉर्म सादर करावा लागेल आणि त्यांची बायोमेट्रिक्स प्रमाणीकरणासाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील. 

पायरी 5. आता कार्ड धारकाला एक स्लिप मिळेल. या स्लिपमध्ये अद्यतन विनंती क्रमांक (यूआरएन) असेल. पायरी 6. आधारधारकाची स्थिती जाणून घेण्यासाठी कार्डधारक या यूआरएनचा वापर करू शकतात.

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 26TH,2020 AT 11-30 AM

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी १३ रुग्णाची भर, दोघांचा मृत्यू 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी सकाळी १३ कोरोना


 रुग्णाची भर पडली आहे तर गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झालेला


 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णाची संख्या ६४६ झाली असून,


 ३७ जणांचा बळी गेला आहे. 






दि. 25/07/2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 256


 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय,


 अंबाजोगाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्र उस्मानाबाद


 येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 201 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त


 झाले असून त्याचा अहवाल तसेच  जिल्ह्याबाहेरील 1 पॉझिटिव्ह


 रुग्णांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. 


पाठवलेले स्वाब नमुने - 256 


प्राप्त रिपोर्ट्स - 201 


पॉझिटिव्ह - 13 


निगेटिव्ह - 186 


प्रलंबित - 55 


इनक्लुझिव्ह - 3       


पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. ⧪


उस्मानाबाद - 04 ⧪


उमरगा - 03 ⧪ 


तुळजापूर - 05 ⧪


कळंब - 01 (बार्शी येथे उपचार सुरू) ⧪ 


एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 13 


उस्मानाबाद :- 04 


1) 35 वर्षीय पुरूष, जिल्हा रुग्णालय कॉर्टर, उस्मानाबाद 


2) 55 वर्षीय पुरुष, रा. प्रसाद कॉलनी उस्मानाबाद 


3) 54 वर्षीय पुरुष रा. आगड गल्ली उस्मानाबाद 


4) 50 वर्षीय स्त्री, रा.देशपांडे स्टॅन्ड, उस्मानाबाद 


उमरगा - 03 


1) 40 वर्षीय पुरूष, भीम नगर, उमरगा 


2) 22 वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा 


3) 58 वर्षीय पुरुष, रा. गुंजोटी ता. उमरगा 


 तुळजापूर :- 05 


1) 30 वर्षीय स्त्री, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर 


2) 27 वर्षीय पुरुष, रा. अणदूर ता. तुळजापूर 


3) 56 वर्षीय पुरुष, रा.अणदूर ता. तुळजापूर 


4) 33 वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर 


5) 33 वर्षीय पुरुष, रा. मंगरूळ ता. तुळजापूर 


कळंब :- 01 


1) 48 वर्षीय स्त्री लोणार गल्ली, कळंब (बार्शी येथे उपचार घेत आहे) 


️मृत्यू बाबतची माहिती. 


1) 58 वर्षीय पुरुष, मिल्ली कॉलनी उस्मानाबाद 


2) 54 वर्षीय पुरुष, अागड गल्ली उस्मानाबाद 


जिल्ह्यातील एकूण रुग्ण - 646 


जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण - 414 


जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण - 195 


जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 37 


️वरील माहिती. दि  26/07/2020 रोजी सकाळी 11:30 वाजेपर्यंत ची


 आहे.