Wednesday, 29 July 2020

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के ,निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

*राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी*                पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल आज (बुधवारी) जाहीर केला आहे. राज्यातील ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदाचा निकाल तब्बल १८.२० टक्के वाढला आहे.






यंदाही बारावीच्या परीक्षेत बाजी मारत ९६.९१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थिंनींच्या निकालाची टक्केवारी ही विद्यार्थ्यांपेक्षा ३. १ टक्क्यांनी जास्त आहे. या परीक्षेत १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के सर्वाधिक लागला आहे. यंदा औरंगाबाद निकाल विभागाचा निकाल ९२ टक्के असा सर्वांत कमी लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ९७. ३४ टक्के लागला असून राज्यात कोकण विभागानंतर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

*विभागानुसार निकाल*

पुणे : ९७.३४ टक्के

नागपूर : ९३.८४ टक्के

औरंगाबाद : ९२ टक्के

मुंबई : ९६.७२ टक्के

कोल्हापूर : ९७.६४ टक्के

अमरावती : ९५.१५ टक्के

नाशिक : ९३.७३ टक्के

लातूर : ९३.९ टक्के

कोकण : ९८.७७ टक्के

एकुण : ९५.३० टक्के


दुपारी १ वाजल्या पासून निकाल येथे पाहता येईल :

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in 

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment