कोहळा आपल्या वास्तूमध्ये लावण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊ त्याची लावण्याची योग्य पद्धत योग्य मुहूर्त कोणता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात कोहळा याला संस्कृत मध्ये कुष्मांड असे म्हणतात हिंदी मध्ये कोहडा असे म्हणतात अमावस्या पौर्णिमेला रवीपुष्यामृत गुरुपुष्यामृत किंवा महिन्यातील कालाष्टमी किंवा शिवरात्री या दिवशी कोहळा घेऊन यावा स्वच्छ गंगाजल गोमूत्र पाणी यांनी स्वच्छ धुऊन पवित्र करून त्या कोहळ्यास चारी बाजूंनी ॐ कुंकवाने काढावे व काजळाची मधोमध उभी रेष ओढावी व देवघरा समोर एका ताम्हणात ठेऊन हळद कुंकू बेलफुल अक्षता अर्पण करून पूजन करावे धूप दीप गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व खालील मंत्र एक माळ करावा जाप करावा.
🔴मंत्र ~
तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कलपांत दहनोपम
भैरवाय नमस्तुभ्यम अनुज्ञाम दातुमरहसि.
हा मंत्र कमीत कमी एक माळ करू शकता व जास्तीत कितीही करू शकता.
पूजन पूर्ण झाल्यानंतर तो कोहळा एखाद्या मजबूत दोरीच्या शिकाळ्यावर बांधून घरात मुख्य हॉल मध्ये बांधावा खराब झाला नसला तरी दर तीन महिन्याला कोहळा बदलावा.
यामुळे होणारे फायदे.
🔴 घरातील निगेटिव्ह एनर्जी कोहळा नष्ट करतो व स्वतःमध्ये खेचून घेतो.
🔴 घरामध्ये भूत प्रेत अनिष्ट शक्तींचा वास असेल किंवा कोणी काही तंत्रबाधा किंवा बाहेरचं काही केलेल असेल तर तेही नष्ट होईल.
🔴 घरामध्ये एक प्रकारचं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल सकारात्मक शक्ती जाणवेल.
🔴 आपल्या घरात वास्तुदोष असेल तर त्या वास्तूदोषाचा होणार नाही.
🔴 घरातील आजारपण कमी होईल
🔴 लक्ष्मी स्थिर होईल व घरात आर्थिक आवक वाढेल.
🔴 घरात वाद विवाद भांडण तंटे होण्यास कारणीभूत असलेल्या परिवारातील सदस्यांची मनस्थिती बदलून जाईल.
ई.आणखीन बरेचसे फायदे आहेत.
🔴टीप ~ दर तीन महिन्याला कोहळा खराब झाला नसला तरी बदलावा वर मी पोस्टमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
