शारदीय नवरात्र उत्सव 2022
अश्विन शु.प.०१ शके १९४४ शरदऋतू प्रारंभ कसा साजरा करावा ?
घटस्थापना शुभ मुहुर्त:
यंदा सोमवार, 26 सप्टेंबरला घटस्थापना केली जाईल. या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल
घटस्थापना मुहूर्त - सकाळी 06:11 ते 07:51 पर्यंत.
घटस्थापना अभिजित मुहूर्त - सकाळी ११:४८ ते दुपारी १२:३६
घटस्थापना पूजा विधी:
घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटा खाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घाला.
चौरंग/पाटावर लाल वस्त्र अंथरा.
टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्या मधोमध कलश ठेवा.
कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटं ओढा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा.
कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.
नारळावर बारीक काडी लावून त्यावर फुलं ठेवा.
कलशाला हळद कुंकु, गंध अक्षता वाहून पूजा करा.
कलशावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला.
दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता.
नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.
दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.
परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.
नवरात्रातीत दुर्गेची पूजा ही "निर्मिती शक्तीची" पूजा असते. नवरात्रीतील घटाला सृष्टीचे रुप मानले जाते. या काळात कन्या पूजन करुन देवीच्या रुपाची पूजा केली जाते.
आई तुझाच आशिर्वाद
जय जगदंबा 🕉👏🏻🔱
