Saturday, 11 July 2020

कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात १९ रुग्णाची भर

 

जिल्हा  कारागृहातील सहा कैदी कोरोना बाधित 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात १९ कोरोना रुग्णाची भर पडली आहे. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील दहा , भूम तालुक्यातील पाच, उमरगा तालुक्यातील चार असा समावेश आहे. गंभीर बाब म्हणजे उस्मानाबाद जिल्हा कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असून  सहा कैदी कोरोना बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. 

 सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून दि. ९ आणि १० जुलै रोजी शासकीय वैदकीय महाविद्यालय लातूर व स्वा. रा. ति. शा. वै. महाविद्यालय अंबाजोगाई येथे  पाठवलेले स्वाब  रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी  19 रिपोर्ट्स पॉजिटीव्ह आले आहेत त्यामुळे  आज  एकूण 19 पॉजिटीव्ह  रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 

पॉजिटीव्ह  रुग्णाची माहिती. 

उस्मानाबाद तालुका -१०

त्यापैकी एक शेकापूर, एक तुगाव, व दोन उस्मानाबाद शहरातील असून एक राम नगर उस्मानाबाद व एक नेहरू चौक उस्मानाबाद येथील आहे.त्याचबरोबर उस्मानाबाद जेल मधील सहा कैदी आहेत, हे सर्व सहा जण  अलगीकरण विभागात ठेवण्यात आलेले आहेत व त्यांना  विशेष विभागात ठेवण्यासाठी प्रक्रिया चालू आहे. 

भूम तालुका -५ 

एक वालवड, चार राळेसांगवी ता. भूम येथील आहेत.

उमरगा तालुका -४

तीन उमरगा शहर व एक मुरूम. 

एकूण  पॉजिटीव्ह  रुग्ण -354.


आजपर्यंतचे डिस्चार्ज -228.


आज पर्यंतचे मृत्यू  14.


उपचार घेत असलेले रुग्ण -112.


उपचार घेत असलेले रुग्ण व संस्था.  


सा. रु. उस्मानाबाद -27.


आयुर्वेदिक म. उस्मानाबाद -12.


उप. जि. रु. तुळजापूर -02.


कळंब ccc -28.


उप. जि. रु. उमरगा -18.


विजय क्लिनिक उमरगा -08.


शेंडगे हॉस्पिटल उमरगा -02.


सोलापूर -08.


लातूर -05.


पुणे -01


बार्शी -01.


असे एकूण 112.


Thursday, 9 July 2020

उस्मानाबाद -पेंडींग रिपोर्ट पैकी तीन पाॅजिटीव

दि. 08/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून जे swab नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते,  त्यापैकी 08   रिपोर्ट्स पेंडिंग होते ते   दि. 09/07/2020 रोजी रात्री उशिरा प्राप्त झाले असून, त्यापैकी तीन पॉसिटीव्ह, 02 inconclusive व तीन नेगेटिव्ह आहेत.



Wednesday, 8 July 2020

उस्मानाबाद - 08/07/2020 रोजी 20 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली

आज दि. 08/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते,  त्यापैकी 20 पॉसिटीव्ह, 120 नेगेटिव्ह, 01 rejected व 08 inconclusive  व 08 पेंडिंग असा आहे.  आज  एकूण 20 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 


*पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 

*08 पेशंट उस्मानाबाद तालुक्यातील  असून त्यातील 07 पेशंट झोरे गल्ली येथील असून  पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक  काळा मारोती चौक, नाना डेअरी जवळ चा आहे. 


*10 पेशंट उमरगा तालुक्यातील असून, त्यापैकी 05प्रॉपर उमरगा, 02 डाळिंब, 02 बेडगा व  01 तलमोड येथील आहेत. 

*दोन पेशंट परांडा तालुक्यातील असून 01 आवर पिंपरी येथील व एक धोत्री ता. परांडा येथील आहे. 

 

*उस्मानाबाद तालुका -08

*उमरगा तालुका -10.

*परांडा तालुका -02.


Total cases  .331.

Discharge      207.

Death               14.

Active patients 110.

Tuesday, 7 July 2020

उस्मानाबाद - आज एकूण 17 पॉसिटीव्ह

उस्मानाबाद-आज दि.07/07/2020 रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय

रुग्णालय येथून ८४ जणांचे स्वाब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव

देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त

झाले असून १६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ४ अनिर्णित, ३ रिजेक्ट तर ६१

negative आले आहेत.

एक पेशंट लातूर येथे पॉसिटीव्ह आली असल्यामुळे आज एकूण 17 पॉसिटीव्ह

रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक

डॉक्टर राम गलांडे डॉक्टर सतीश आदटराव यांनी दिली आहे.


पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती

सहा पेशंट उस्मानाबाद तालुक्यातील असून त्यातील दोन झोरे गल्ली येथील असून

पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व एक राम नगर उस्मानाबाद येथील

आहे, दोन समता कॉलनी उस्मानाबाद येथील व एक कनगरा येथील आहेत.

एक पेशंट माडज ता. उमरगा येथील असून ती लातूर येथे उपचार घेत असून तिचा

swab लातूर येथे घेण्यात आला आहे.

दहा पेशंट भूम तालुक्यातील असून त्यापैकी एक भूम शहरातील पुण्यावरून

आलेला आहे व बाकीचे नऊ पेशंट राळेसांगवी ता. भूम येथील असून एकाच

कुटुंबातील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहे.

उस्मानाबाद तालुका -06.

उमरगा तालुका-01.

भूम तालुका -10.

Total cases.311

Discharge 200.

Death 14.

Active patients 97.



Monday, 6 July 2020

OSMANABAD - CORONA VIRUS UPDATE ON JULY 6TH 2020

आज दि. 06/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 98 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, व पूर्वीचे 7 पेंडिंग असे एकूण 105 रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ   पॉसिटीव्ह, 11 अनिर्णित 5 रिजेक्ट व  81 negative असा आहे. असे आज एकूण 08 पॉसिटीव्ह रुग्णाची बाधितांमध्ये भर पडली आहे. 


पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 

दोन पेशंट आवार पिंपरी ता परांडा  येथील आहेत पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत. 


दोन पेशंट  तुळजापूर येथील आहेत.


उमरगा तालुक्यातील तीन पेशंट असून     त्यातील एक  पेशंट कसगी येथील व दोन उमरगा येथील आहेत ते पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत .


एक पेशंट इरला ता उस्मानाबाद येथील आहे पूर्वीच्या पोजिटीव्ह पेशंटच्या संपर्कातील आहे

 

उस्मानाबाद तालुका -1

तुळजापूर शहर -02.

उमरगा तालुका -03.

परांडा तालुका  -02.


Total cases  .296

Discharge      198.

Death               14.

Active patients 84

Sunday, 5 July 2020

OSMANABAD #CORONAVIRUSUPDATE

#CoronaVirusUpdates

दि. 05/07/2020.रोजी सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 134 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 06 पॉजिटीव्ह 88 नेगेटिव्ह, व 38 पेंडिंग व  दोन inco nclusive असा आहे.

कोरोनाचा कहर : 5 जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात बारा पॉजिटीव्ह


उस्मानाबाद - जिल्ह्यातील शनिवारच्या पेंडिंग रिपोर्ट मधील बारा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा तालुक्यातील आठ, उस्मानाबाद तालुक्यातील दोन, तुळजापूर आणि कळंब तालुक्यातील प्रत्येकी एक असा समावेश आहे.
 ४ जुलै रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 157 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 पॉजिटीव्ह, 138 नेगेटिव्ह, व 17 पेंडिंग असा रिपोर्ट प्राप्त  झाला होता. 
१७ पेंडिंग मधील बारा पॉजिटीव्ह आले आहेत. 
उमरगा तालुका  
उमरगा शहर - २ ( शेंडगे हॉस्पिटल १ ) 
नागराळ - ३

गुंजोटी - ३

उस्मानाबाद तालुका 

तेर - २ ( तेर हॉस्पिटल मधील कर्मचारी )

कळंब तालुका 
उपळाई ( ता. कळंब ) - १
( सोलापूर येथे एडमिट )

तुळजापूर तालुका 
धोत्री - १ 

उस्मानाबाद - आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता १४ झाली आहे.

मुंबईहुन आलेला उमरगा येथील एक रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट होता. त्याचा आज रविवारी  मृत्यू झाला. शनिवारी परंडा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोरोनाने बळी घेतला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने  कहर माजवला असून, शनिवारी तब्बल  तेरा रुग्णाची भर पडली आहे. , विशेष म्हणजे आणखी   17 पेंडिंग  आहेत. त्याचा आज  रिपोर्ट येणार आहेत.