Sunday, 5 July 2020

उस्मानाबाद - आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात आज लागोपाठ दुसऱ्या दिवशी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता १४ झाली आहे.

मुंबईहुन आलेला उमरगा येथील एक रुग्ण उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट होता. त्याचा आज रविवारी  मृत्यू झाला. शनिवारी परंडा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. लागोपाठ दुसऱ्या दिवशी कोरोनाने बळी घेतला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने  कहर माजवला असून, शनिवारी तब्बल  तेरा रुग्णाची भर पडली आहे. , विशेष म्हणजे आणखी   17 पेंडिंग  आहेत. त्याचा आज  रिपोर्ट येणार आहेत.

No comments:

Post a Comment