Tuesday, 28 July 2020

कोरोना कहर; उस्मानाबाद जिल्ह्यात 95 जण पॉझिटिव्ह

कोरोना कहर; जिल्ह्यात 95 जण पॉझिटिव्ह, उमरग्यात 46, रात्री उशिरा अहवाल, जिल्ह्यात खळबळ

उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून एकाच दिवसात तब्बल 95 रुग्णांची भर पडली आहे. रात्री उशिरा याबाबत प्राथमिक माहिती समोर आली असून याबाबत सविस्तर माहिती लवकरच मिळेल. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 824 वर गेला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून जिल्हाभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. एवढे होवून देखील प्रशासन मात्र ठोस निर्णय घेण्याच्या अजूनही मूड मध्ये नाही.
दि.२७ जुलै रोजी उस्मानाबादच्या प्रयोगशाळेत पाठविलेल्या स्वॅबपैकी ६८ नमुने पेंडिंग आहेत तर मंगळवारी ६७ स्वॅब पाठविण्यात आलेलेही अहवाल पेंडिंग आहेत. शिवाय औरंगाबादला मंगळवारी पाठविलेल्या ३६७ रिपोर्टपैकी काही अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यात ९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर उस्मानाबादच्या प्रयोगशाळेतून दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. म्हणजे जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल ९५ जण पॉझिटिव्ह आले. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे उर्वरित रिपोर्ट आल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ८२४ वर गेली आहे. अहवाल उशिराने येत असल्याने संशयित रुग्णांची व कुटुंबीयांची घालमेल सुरू असून, आधीच वेळेत स्वॅब घेतले जात नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागत आहे. उस्मानाबादेत हक्काची प्रयोगशाळा उभारल्याने कोरोनाची तपासणी तातडीने होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी हे काम नवीन असल्याने तपासणीला अपेक्षित गती आलेली नाही.
रात्री उशीर झाल्याने आरोग्य विभागाने माध्यमांना रुग्णांची माहिती दिलेली नाही. आज सकाळी माहिती मिळण्याची शक्यता आहे. माहिती आल्यांनतर दिवसातील कोरोना बाधितरुग्णांची संख्याही वाढलेली दिसेल आणि रुग्ण कुठल्या गावाचे हे पण समोर येईल.
उमरगा तालुक्यात ४६ पॉझिटिव्ह निघाले असून नगरपालिकेतील १३ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. 

No comments:

Post a Comment