Tuesday, 28 July 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 28 2020 AT 10:30 PM


---------------------------------------------

कळंब : कळंब तालुक्यात आणखी 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

 कळंब शहरात 2,

डिकसळ गावात 3 

तर मंगरूळ येथे 1 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

 विशेष म्हणजे

कळंब शहरात एकाचा मृत्यू झाला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 

खळबळ उडाली आहे. या मृत व्यक्तीला कुठून कोरोनाची बाधा झाली, याची 

माहिती प्रशासन घेत आहे. 

 कळंब शहरातील शिवाजी नगर भागात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे, जो 

पुण्याहून आल्याची माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी 

डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली. 

 डिकसळ 2 जण पूर्वीच्या संपर्कातील आहे तर 1 रुग्ण गणेश नगर येथील असून

 तिच्यावर  बार्शी येथे उपचार सुरू आहेत.

मंगरूळ या गावात एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. लातूर येथून त्याला बाधा

 झाल्याचं कळतंय. 

मागच्या 8 दिवसात कळंब शहरात 10 आणि तालुक्यात एकूण 18 रुग्ण आढळले

असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोमवारी सापडलेल्या एकाच कुटुंबातील 7

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 35 जणांना प्रशासनाने क्वाराईनटाईन केले 

आहे. त्यापैकी 23 जणांचे स्वाब नमुने घेण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या 

सुरुवातीला एकही ऍक्टिव्ह नसलेल्या कळंब तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची

 संख्या वाढत चालली आहे, म्हणून चिंताही वाढली आहे.



No comments:

Post a Comment