कळंब : कळंब तालुक्यात आणखी 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे तालुक्यातील बधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी प्राप्त
झालेल्या अहवालाप्रमाणे कळंब शहरात 3 जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात 2 रुग्ण हे त्या
बड्या व्यापाऱ्याच्या संपर्कातील आहेत तर 1 रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील
कर्मचारी आहे. तर डिकसळ गावात देखील आणखी 2 रुग्ण वाढले आहेत जे पूर्वीच्या
संपर्कातील आहेत, ज्यात 70 वर्षीय वृद्धांचा समावेश आहे, अशी माहिती वैद्यकीय
अधिकारी डॉ. वायदंडे यांनी दिली.
तर सात्रा या गावात देखील 6 रुग्ण आढळले आहेत जे पूर्वीच्या बधिताच्या संपर्कातील
आहेत. या 6 रुग्णांमध्ये 6 महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. कोठाळवाडी गावातील
पारधी वस्तीतील एकाच स्वाब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरील व्यक्ती
वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे.
कळंब शहरात एका बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तीचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीला इतर जिल्ह्यातील लोकही आले होते, तेथून त्या कुटुंबातील 48 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. नंतर शहरात पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली. शहरातील चैन ब्रेक करण्यासाठी 3 ते 9 ऑगस्टपर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवार पासून 7 दिवस कळंब शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment