Tuesday, 25 July 2017

वंश,गोत्र,देवक

९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या

1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,
जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती....

2. देवक -
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.

3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश.
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी झाली आहे.
[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]

१. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव

२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव

३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने

४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख

५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने

६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख

७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल

८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस

९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव

११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव

१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख

१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव

१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव

१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई

१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख

१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ

१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार

२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव

२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि, कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा...

२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव

२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव

२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब

२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार

२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.

२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..

२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव

२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर

३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई

३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ

३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव

३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव

३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब

३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव

३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव

३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख

३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान

४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल

४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख

४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू

४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव

४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार

४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने

४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब

४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव

४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल

४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब

५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव

५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख

५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड

५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख

५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव

५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव

५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ

५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव

५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख

५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने

६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख

६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब

६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव

६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव

६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव

६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव

६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल

६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर, शंख

६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख

६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब

७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ

७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी

७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे

७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल

७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत

७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव

७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत

७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल

७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव

८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल

८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ

८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव

८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख

८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल

८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत

८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान

८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल

८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख

९०. साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख

९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद

९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव

९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव

९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल

९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव

९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब

हर हर महादेव
जय भवानी
जय शिवराय....!!

Friday, 21 July 2017

नोकरीविषयी CAREER

[17/07, 6:15 p.m.] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
🎯🎯 *_कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 11 जागा
पद :
1. अभियांत्रिकी : 4 जागा
2. इलेक्ट्रिकल : 5 जागा
3. यांत्रिक : 1 जागा
4. सिग्नल आणि टेलिकॉम : 1 जागा
शिक्षण : अभियांत्रिकी पदवी
वय : 25 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 500/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/VonkXj
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/zWUGdE

*_===========================_*
[17/07, 6:16 p.m.] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
🎯🎯 *_पुणे प्राचार्य संरक्षण खाते नियंत्रक भरती 2017_*
एकूण पद संख्या : 13 जागा
पद : कँटीन अटॅंटेंट
शिक्षण : 10वी पास
वेतनमान : Rs. 5200-20200/- + GP Rs. 1800/-
वय : 18-25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
The PCDA (SC),
No.1,
Finance Road,
Pune - 411001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/Ctmqxf

*_============================_*
[17/07, 6:17 p.m.] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
🎯🎯 *_अणु ऊर्जा शिक्षण संस्था भरती 2017_*
एकूण पद संख्या : 23 जागा
पद :
1. मास्टर शिक्षक : 4 जागा
2. प्रशिक्षित पदवी शिक्षक : 8 जागा
3. प्राथमिक शिक्षक : 11 जागा
शिक्षण : 12वी/पदवी/पदव्युत्तर
परीक्षा शुल्क : Rs. 750/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Chief Administrative Officer,
Atomic Energy Education Society,
Central Office,
Western Sector,
Anushaktinagar,
Mumbai – 400094.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/cEBFsU

*_=============================_*

Saturday, 1 July 2017

माझी शाळा, माझें उपक्रम.







कपालभाती प्राणायाम

डॅा• घोसालळकर यांनी कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती।              🔔         *कपालभाती प्राणायाम*        🔔

कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातिमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयमपूर्ण होतो.

कपालभातीने हार्टमधले ब्लोकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण ओपन होतात. कोणतेही औषध न घेता.

कपालभाती करणार्याची हार्टची कार्यक्षमता वाढते. हार्टची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही. हार्ट फंशन नॉर्मल रहातं. अजुन एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हार्ट कधीच बन्द पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हार्ट बन्द पडल्याने मरतात.
   
कपालभाती केल्याने शरीरांतर्गत व् शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझाॕल्व्ह होते. कपालभातीने शरीरात हिट जनरेट होते त्यामुळे गाठी विर्घळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते.

कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्यबाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवशीपासून कोलेस्टेरोलची गोळी बंद करायला सांगतो.
   
कपालभातीने वाढलेलं ईएसआर, यूरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलक्टीन लेव्हल नॉर्मल होऊ लागते.

कपालभाती केल्याने हीमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हीमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथिच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हीमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांच् हीमोग्लोबिन १६ व् पुरुषांच्ं १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.


कपाभातिमुळे महिलांच्या पिरिएड्सच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात.


कपाभातिमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बन्द करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.

एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. गुड़ हार्मोन्स सीक्रेट होऊ लागतात. स्ट्रेस हामोंस गायब होतात. मनाचा व् शरीराचा थकवा नाहिसा होतो. कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही.

*किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. WBC. व्हाईटब्लड सेल्स, RBC. रेडब्लड सेल्स कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या करेक्ट होतात. बैलन्स होतात. कपालभातीने सर्व बैलन्स होते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला एक एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दूसरा उपाय नाही. कपालभातीने शरीर संतुलित रहते. अंडरवेट आसण जसा आजार आहे तसं ओव्हरवेट आसण ही आजारच आहे.
   
कपालभातीने कोलायटिस, अल्सरीटिव्ह कोलायटिस, अपचन, मंदाग्नि, संग्रहणि, जीर्ण संग्रहणि, आव असे शौच लागणार आजार बरे होतात. कोंस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात.

कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, लिकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात.

अर्थ्राइटिस मधला अजुन एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटिस म्हणजे आर ऐ फैक्टर पॉझिटिव्ह होण. अर्थात इथे हाडांमधे विकृति येते. हाडांमधे टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटिस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झिज होते, कार्टिलेज तूटतात, लिगैमेट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटिस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉयड देतात. मेडिक्लसायन्स सागतं, स्टिरोइड मुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसुल होतात. गम्मत बघा, एस्ट्रो अर्थरायटिसमधे स्टिरोइड दिल्याने हाडं ठिसुल होतात व् त्याच रुगलाल स्टिरोइड दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही व् दूसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकलसायंस. विद्यानाच्या नावावर अज्ञान आहे की नाही.

कपालभातीने छोटी इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचु लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स आतड्यात शोषल जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फर्स, प्रोटीन्स अव्हेलेब्ल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनु लागतात व् ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटिस, एस्ट्रो अर्थ्राइटिस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात.

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हीमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्स द्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यन्त अखण्ड चालु असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडु देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केलि पाहिजे.

विचार करा प्राणायामामधली एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

Tuesday, 26 July 2016

जुन्या बालभारती ,कुमारभारती मधील सुंदर कविता

🌻या झोपडीत माझया -🌻
🍁संत तुकडोजी महाराज🍁
राजास जी महाली , सौखये कधी िमळाली
ती सवर पाप झाली , या झोपडीत माझया॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱयांकडे पहावे
पभुनाम िनतय गावे , या झोपडीत माझया॥२॥
पहारे आिण ितजोऱया , तयातूनी होती चोऱया
दारास नाही दोऱया , या झोपडीत माझया॥३॥
जाता तया महाला , ‘मजाव शबद आला ’
िभतीनं यावयाला, या झोपडीत माझया॥४॥
महाली माऊ िबछाने , कं दील शामदाने
आमहा जमीन माने , या झोपडीत माझया॥५॥
येता तरी सुखे या , जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा , या झोपडीत माझया॥६॥
पाहन सौखयं माझे , देवेद तोही लाजे
शांती सदा िवराजे , या झोपडीत माझया॥७॥

Sunday, 24 July 2016

स्वछ विद्यालय पुरस्कार ऑंलाईन फॉर्म भरण्यासाठी

https://goo.gl/atAe69

या साईटवर जावुन Android Application डाउनलोड करावे .
 त्यानंतर Apply या टॅब वर जावुन ऑनलाईन फॉर्म भरावा .
  काही अडचण आल्यास खालील मोबाईल  नंबर वर मिस्कॉल द्यावा .

Give a missed call for support to   07097298858

Email us at: svpuraskar@gmail.com



         

Tuesday, 17 May 2016

मराठी शाब्दिक कोडी

१. हिरवा तुरा पांढरा घोडा सांगायला वेळ घेतो मी थोडा
२. कोपर्याुत उभी राही, सकाळी कामाची घाई, सकाळी उठताच हातात घेते आई
३. दोन भाउ जुळे एका रंगाचे एका उंचीचे , हरवता एक काय काम दुसर्यातचे
४. कपड्यावर कपडे पाचपन्नास काढता एकास रडवतो ससमोरच्यास
५. पांढरी जमीन काळे बीज देता ध्यान होऊ सदन्यान
६. उन्हात येई, सावलीत जाई, नसता हवा याची कमी नाही, हवा लागताच मारुन जाई
७. झाड निघाले पाण्यातून, फुले नाही पण फांद्या घेऊन,सावली थंड पण भीजन्याचा दंड
८. जमिनीच्या पोटात दडउन पाय मन माझी आकाशी जाय थकल्या भुकेल्यांची मी हाय माय
९. कपड्यावर कपडे पाचपन्नास काढता एकास रडवतो समोरच्यास
१०. लाल गाय लाकूड खाय पाणी प्याई मारुन जाई
११. आठ तोंड जीभ नाही तरी शब्दांची गोडी मधा पेक्षा कमी नाही
१२. हिरवी टोपी लाल शाल पोटात वसलि मोत्याची माळ
१३. हिरवा मासा हिरवी अंडी आंड्या ला आहे भलतीच गोदी खायला पडते सगळ्यांची उडी
१४. काळे फूल उन्हाळी पावसाळी विपुल हिवाळ्यात खाते धूळ
१५. एक रखवालदार उन्हा तान्हत, उभा आपल्या दारात, खाणे नाही पिणे नाही, एका कली समोर याचे काही चालत नाही.
१६. काला बदन धीमी चाल आखे तेज रखवलदार माने सबको करे सतेज
१७. हाड नाही मास नाही फक्ता बोटे आहेत माझी ओळखा पाहु मे कोण.
१८. थंडीत झोपून राहते, उन्हात सावली देते एका पायात धोतर घालते पावसाळात मात्रा रडत बसते.
१९. थांबून वाजते पण घड्याळ नाही, बारीक लांब पण काठी नाही,दोन तोंडची पण साप नाही, स्वास घेते पण तुम्ही नाही.
२०. धन आहे पण पैसे नाही, जवळ असता स्वाताच्या रक्षणाची काळजी नाही
२१. ना जेवण ना पाणी याच्या बुद्धी पुढे हार मानतात ज्ञानी
२२. हिरव छप्पर लाल घर लपून बसलेत असंख्य चोर
२३. गळा आहे पण डोके नाही खांदा आहे पण हात नाहीत. मी कोण ?
२४. पाय नाही चाक नाही तरीही चालते, खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते
२५. दात आहेत पण चावत नाही गुंता होता काळ्या शेतात सगळे माझयावर सोपवतात.
२६. लगाम सुटला खूप नाचला , घोडा लाकडी मुलांना आवडी.
२७. वीज गेली आठवण झाली, मोठी असो वा लहाणी डोळ्यातून ईच्या गाळते पाणी.
२८. जटाधरी राहे उंचावरी देतो तेल आणि पाणी, म्हणतात ही देवाची करणी.
२९. हातात हिरवा तोंडात लाल, सणसमारंभची मी आहे शान.
३०. मातिशिवाय उगवली कपाशी लाख मन, मुसळधार पाण्यात भिजला नाही एक कन.
३१. जादूच्या कळ्यांच एवढस खोक भिंतीवर घासा त्याच डोक. डोक्यातून फुलेल प्रकाशफूल, देठाना जलायचा खूळ.
३२. सर्वांची ती माय माउली जग तिच्यावर जगते घामाचा ती घास घेते मोत्याची ती रास देते.
३३. सुखात दुखात ते सहज येतात कोमात खारट ते असतात
३४. मी आहे काळा मला भटकण्याचा चाळा येणार्याअला घेऊन जातो. जाणार्यालला सोडून देतो, थकून जाताच जोरात किंचाळतो, हॅश हश करत थांबून राहतो.
३५. दोरी नाही, खिळा नाही , पडत नाही फुटत नाही, दमत नाही थांबत नाही,गोल फिरतो पण भिंगरी नाही.

Monday, 9 May 2016

Mobile recycle bin

मोबाइलचं रिसायकल बिन
_____________________
☆☆☆☆☆☆☆☆☆☆


कॉम्प्युटरवर काम करताना समजा एखादी महत्त्वाची फाईल चुकून डिलीट झाली तर ती फाईल रिसायकल बिनमधे जाते हे आपल्याला माहीत आहे. रिसायकल बिनची ही सुविधा विंडोजच्या अगदी सुरुवातीच्या व्हजर्नपासून तर हल्लीच्या विंडोज-8 पर्यत उपलब्ध आहे. म्हणजेच कॉम्प्युटरवर काम करताना चुकून एखादी फाईल डिलीट झाली तरी आपण बिनधास्त असतो. कारण आपल्याला माहिती असते की ती डिलीट झालेली फाईल आपल्याला रिसायकल बिनमधे मिळणार आहे. मात्र सध्याचे मिनी कॉम्प्युटर अर्थात स्मार्टफोनमधे अजून तरी अशी रिसायकल बिनची सुविधा अॅण्ड्रॉईडने दिलेली नाही. त्यामुळे स्मार्टफोन हाताळताना जर चुकून तुमचा एखादा महत्त्वाचा फोटो किंवा फोटोजची संपूर्ण डिरेक्टरी किंवा दुस-या कुठल्या फाईल्स डिलीट झाल्या तर मात्र त्या फाईल्स किंवा फोटोजला आपल्याला कायमचे गमवून बसावे लागते. हल्लीच्या टच स्क्रीन मोबाइलच्या जमान्यात तर अशा चुकून फाईल किंवा फोटोज डिलीट होण्याची शक्यता फार वाढली आहे. कारण टच स्क्रीन मोबाइल हाताळताना नाजूक धक्क्यानेसुद्धा फाईल डिलीट होण्याचे प्रकार बरेच वाढले आहेत. स्मार्टफोन लहान मुलंही ब-याच वेळा घेऊन बसतात. या लहान मुलांकडूनही
ब-याचदा स्मार्टफोनमधील महत्त्वाचा डेटा डिलीट होण्याचा धोका असतो. अशा वेळी हताश होण्याऐवजी आपण दुसरं काहीही करू शकत नाही.


पण आता अॅण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये डंपस्टर या थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने आपण हा धोका टाळू शकतो.





कसे इंस्टॉल कराल?


डंपस्टर ईमेज अॅण्ड व्हिडीओ रिस्टोर  या नावाने हे अॅप गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. हे अॅप स्मार्टफोनवर इन्स्टॉल करायचं. त्यावर क्लिक केलं की स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एक लायसन्स अग्रीमेंट येते. त्याला अॅक्सेप्ट केले कीइनिशिअल सेटअप स्क्रीन ओपन होतं. यामध्ये तुम्ही ठरवू शकता की काय काय तुम्हाला डंपस्टर  करायचे आहे. अर्थात काय काय रिसायकल बिनमधे पाठवायचे आहे. जसे की ई मेसेजेस, व्हिडीओ, ऑडिओ, डॉक्युमेंट,otherफाईल्स, अॅप्स आदि सेटिंग या ठिकाणी तुम्हांला कराव्या लागतील. यानंतर नेक्स्ट केल्यानंतर डंपस्टर तुमचा स्मार्टफोन चेक करेल. अर्थात याला थोडा वेळ लागेल. हे झाले की डंपस्टरचा मेन स्क्रीन ओपन होईल.


डंपस्टर कसं काम करतं?


एकदा का डंपस्टर ईमेज अॅण्ड व्हिडीओ रिस्टोअर हे अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल झाले की ते विंडोजच्या रिसायकल बिनप्रमाणे काम करायला सज्ज होते. म्हणजेच तुम्ही एखादा फोटो किंवा फाईल डिलीट केली असता तो आपोआप डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमध्ये जाऊन पडतो. तुम्ही डंपस्टर ओपन करून पाहिले असता तुम्ही डिलीट केलेला फोटो त्याच्या प्रिव्हूसह तिथे दिसतो. म्हणजेच यापुढे तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्या कडून चुकून डिलीट झालेल्या सर्व फाईल्स आता या डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमध्ये येऊन पडतील. आता या डिलीट झालेल्या फाईल्सचे काय करायचे हे तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच त्या डिलीट झालेल्या फाईल्स रिस्टोअर करायच्या की कायमच्या डिलीट करायच्या. डंपस्टरमध्ये या फाईल्स शेअर करायची सुविधासुद्धा आहे. म्हणजेच या डिलीट झालेल्या फाईल्स तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा ब्लूटुथवर शेअर करू शकता किंवा ईमेलसुद्धा करू शकता.


मात्र कॉम्प्युटरवर विंडोजच्या रिसायकल बिनमध्ये फक्त मुख्य हार्ड डिस्क वरील फाईलच डिलीट झाल्या की रिसायकल बिनमधे जातात. अन्य.  ड्राइव्ह जसे की नेटवर्क ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह, कार्ड रीडरवरील फाईल्स डिलीट झाल्या असता त्या फाईल रिसायकल बिनमधे जात नाहीत अगदी तसेच डंपस्टरमधेसुद्धा फक्त फोन मेमरीमधील डिलीट झालेल्या फाइल्स डंपस्टर अर्थात रिसायकल बिनमधे जातात. एसडी कार्डवरील फाईल्स डिलीट झाल्या असता त्या रिसायकल बिन अर्थात डंपस्टरमधे जात नाहीत.

🔘संकलन🔘
  उमेध धावारे

      हवेली

Monday, 2 May 2016

Short keys

OT संगणकीय ज्ञान - मॉड्यूल 1: साधारणपणे वापरले जाणारे की-बोर्ड शॉर्टकट्स



नमस्कार महत्वाकांक्षी स्पर्धकांनो,

आजकाल जवळपास प्रत्येकच भरती परीक्षा ऑनलाइन आयोजित केली जाते, मग ती PSB, सरकारी किंवा राज्य सेवा असो. येत्या काळात संगणक ज्ञान महत्त्वाचे असल्या कारणाने विश्लेषण करण्याच्या हेतूने घेतले जाते. LIC AAO, IBPS सारख्या काही मोजक्या परीक्षेमध्ये संगणक ज्ञान जाणून घेण्यासाठी एक स्वतंत्र सेक्शन दिल्या जाते. तसेच SSC CGL सारख्या परीक्षा ऑनलाइन आयोजित करण्याच्या चर्चेत आहे.

त्यामुळे, आम्ही " OT संगणकीय ज्ञान - मॉड्यूल" नावाचे एक नवीन कार्ड सुरू करीत आहेत, जेणेकरून उमेदवारांना विविध नोकरी भरती परीक्षेसाठी त्यांचे संगणक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होणार.

की-बोर्ड हे मुळात इनपुट देण्यासाठी वापरला जाणारे एक हार्डवेअर आहे, जे मॉनिटर वापरून पाहिले जाऊ शकते. यामध्ये 102/104 अल्फान्यूमेरिक / कार्ये आणि इतर विविध कळांचा (key) समावेश होतो. MS office सारख्या विशिष्ट सॉफ्टवेअर मध्ये यांची कार्ये वेगळी असतात. आपण त्यावर नंतर चर्चा करूया.

आज आपण सर्वात सामान्यतः वापरले शॉर्टकट keys वर चर्चा करणार आहोत जेणेकरून आपल्याला अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास आपल्याला मदत करेल आणि संगणक ज्ञान सेक्शन मधील यासंबंधी चे प्रश्न सोडविण्यास मदत होईल.

विविध प्रकाराचे की-बोर्ड शॉर्टकट खालील प्रमाणे आहेत:

की

शॉर्टकट

वेब शॉर्टकट्स –

Ctrl+N

नवीन विंडो उघडण्यासाठी

Ctrl+W

चालू विंडो हटविण्यासाठी/बंद करण्यासाठी

Ctrl+T

नवीन टॅब उघडण्यासाठी

Ctrl+R/F5

रीफ्रेश

Alt+à

फॉरवर्ड

Alt+ß

बॅकवर्ड

Alt +Home

मुख्यपृष्ठ (homepage)

Alt+D

अॅड्रेस बार कडे हलविण्यासाठी

Ctrl+Enter

लिहीलेल्या कश्याच्याही पुढे-मागे अनुक्रमे “http://www आणि “.com” जोडण्यासाठी



मजकूर (text) सामान्यपणे एडिट (सुधारित) करण्यासाठी -

Ctrl+B

निवडलेले ठळक (बोल्ड) करण्यासाठी

Ctrl+I

निवडलेले इटालिक (Italics) करण्यासाठी

Ctrl+U

निवडलेले अधोरेखित (Underline) करण्यासाठी

Backspace

आधीचे शब्द पुसण्यासाठी (delete)

Del

पुढचे शब्द पुसण्यासाठी (delete)

Ctrl+F

कोणत्याही पृष्ठ (page) वर शोधण्यासाठी

Ctrl+Z

मागील कृतीतील चुका सुधारण्यासाठी (Undo)



मजकूर संबंधीच्या वापरासाठी -

Shift+PageUp

आधीच्या पेज आणि कर्सर दरम्यानचे सर्व निवडणे

Shift+PageDown

पुढील पेज आणि कर्सर दरम्यानचे सर्व निवडणे

Shift +Home

ओळ (line) च्या सुरुवातीपासून आणि कर्सर दरम्यानचे सर्व निवडणे

Shift+End

ओळ (line) च्या शेवटपासून आणि कर्सर दरम्यानचे सर्व निवडणे

Shift+Ctrl+Home

डॉक्युमेंट च्या सुरुवातीपासून आणि कर्सर दरम्यानचे सर्व निवडणे

Shift+Ctrl+End

कर्सर पासून शेवटपर्यंत सर्व निवडणे

Shift+Ctrl+ß

डाव्या बाजूला असलेला शब्द निवडणे

Shift+Ctrl+à

उजव्या बाजूला असलेला शब्द निवडणे





टीप: जर ही कार्ये shift न दाबता वापरले तर, हे कमांड्स अशाच प्रकारे कर्सर हलविण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ - की Ctrl + Home हे डॉक्युमेंट च्या सुरुवातीला कर्सर हलवण्यासाठी वापरले जाते.



बेसिक keys -

Ctrl+C

निवडलेले कॉपी करण्यासाठी

Ctrl+X

निवडलेले खोडण्यासाठी (cut) करण्यासाठी

Ctrl+V

निवडलेले पेस्ट करण्यासाठी

Ctrl+A

सर्व निवडण्यासाठी

Ctrl+N

नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी

Ctrl+O

असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी

Ctrl+W

असलेले डॉक्युमेंट बंद करण्यासाठी

Ctrl+S

संपूर्ण डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी

Ctrl+P

निवडलेले प्रिंट करण्यासाठी



विंडोज शॉर्टकट -

Alt+F4

सक्रिय विंडो बंद करण्यासाठी

Alt + Tab

सक्रिय विंडो स्विच (अदलाबदल) करण्यासाठी

Alt +Esc

सर्व उघडलेल्या विंडो ला क्रमात बघण्याकरिता

Win + D

डेस्कटॉप बघण्याकरिता

Win+L

संगणक लॉक करण्याकरिता

Ctrl+Alt+Del

विंडोज टास्कबार मॅनेजर



हे शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी कीबोर्ड चा अधिकाधिक सराव करण्याचा प्रयत्न करा.