Sunday, 27 August 2017

रक्तदान का व कोणी करावे?

 *रक्तदान का करावे?*

*सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात*
 *रक्‍तदान कोणी करावे व कसे?*

*रक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.*
*1]त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.*
*2]वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे.*
*3]हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.*
*4]रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.*
*5]उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.*
*6]रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.*


गणपती बाप्पा मोरया


Tuesday, 25 July 2017

मनोरे human tower


वंश,गोत्र,देवक

९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या

1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,
जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती....

2. देवक -
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.

3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश.
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी झाली आहे.
[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]

१. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव

२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव

३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने

४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख

५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने

६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख

७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल

८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस

९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव

११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव

१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख

१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव

१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव

१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई

१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख

१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ

१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार

२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव

२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि, कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा...

२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव

२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव

२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब

२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार

२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.

२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..

२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव

२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर

३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई

३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ

३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव

३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव

३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब

३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव

३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव

३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख

३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान

४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल

४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख

४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू

४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव

४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार

४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने

४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब

४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव

४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल

४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब

५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव

५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख

५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड

५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख

५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव

५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव

५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ

५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव

५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख

५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने

६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख

६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब

६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव

६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव

६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव

६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव

६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल

६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर, शंख

६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख

६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब

७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ

७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी

७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे

७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल

७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत

७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव

७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत

७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल

७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव

८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल

८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ

८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव

८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख

८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल

८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत

८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान

८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल

८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख

९०. साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख

९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद

९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव

९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव

९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल

९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव

९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब

हर हर महादेव
जय भवानी
जय शिवराय....!!

Friday, 21 July 2017

नोकरीविषयी CAREER

[17/07, 6:15 p.m.] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
🎯🎯 *_कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2017_*
एकूण पद संख्या : 11 जागा
पद :
1. अभियांत्रिकी : 4 जागा
2. इलेक्ट्रिकल : 5 जागा
3. यांत्रिक : 1 जागा
4. सिग्नल आणि टेलिकॉम : 1 जागा
शिक्षण : अभियांत्रिकी पदवी
वय : 25 वर्षे
परीक्षा शुल्क :
खुलावर्ग : Rs. 500/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/VonkXj
ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/zWUGdE

*_===========================_*
[17/07, 6:16 p.m.] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
🎯🎯 *_पुणे प्राचार्य संरक्षण खाते नियंत्रक भरती 2017_*
एकूण पद संख्या : 13 जागा
पद : कँटीन अटॅंटेंट
शिक्षण : 10वी पास
वेतनमान : Rs. 5200-20200/- + GP Rs. 1800/-
वय : 18-25 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
The PCDA (SC),
No.1,
Finance Road,
Pune - 411001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/Ctmqxf

*_============================_*
[17/07, 6:17 p.m.] गुरुशांत मगी ९६६५८७७८८९: ,
🎯🎯 *_अणु ऊर्जा शिक्षण संस्था भरती 2017_*
एकूण पद संख्या : 23 जागा
पद :
1. मास्टर शिक्षक : 4 जागा
2. प्रशिक्षित पदवी शिक्षक : 8 जागा
3. प्राथमिक शिक्षक : 11 जागा
शिक्षण : 12वी/पदवी/पदव्युत्तर
परीक्षा शुल्क : Rs. 750/-
अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
पत्ता :
Chief Administrative Officer,
Atomic Energy Education Society,
Central Office,
Western Sector,
Anushaktinagar,
Mumbai – 400094.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑगस्ट 2017
अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/cEBFsU

*_=============================_*