Friday, 15 February 2019

Competitive exam स्पर्धा परीक्षा

*स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण - शब्दविचार -* १
30| Feb 15, 2019, 04.00 AM IST

*वैशाली कार्लेकर*

शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले ......... मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून उतरलेले, पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरसाज दिलेले हे अजरामर गीत तुम्हाला माहीत असेलच. व्याकरणातला शब्दविचार शिकतानाही याच गाण्यातील 'शब्दांच्या पलीकडले' ही ओळ आठवावी म्हणजे शब्दविचार कळून जाईल. कारण व्याकरणात प्रत्येक स्वतंत्र 'शब्दाच्या पलीकडे' जाऊन त्या शब्दाद्वारे वाक्यात कोणते कार्य घडले आहे, त्या संदर्भावर त्या शब्दाची जात (प्रकार) अवलंबून असते. थोडक्यात एक विशिष्ट शब्द म्हणजे त्याची नेहमी हीच विशिष्ट जात असेल असे गृहीत धरता येत नाही. यासाठी एक उदाहरण पाहू या.

१ दशरथाने कैकयीला दोन वर दिले. (नाम )

२. तू त्या राजपुत्राला वर. (क्रियापद)

3. पक्षी झाडावर बसतो. (शब्दयोगी अव्यय)

४. बाण खालून वर गेला. (क्रियाविशेषण)

या वाक्यांमध्ये 'वर' हा एकच शब्द वाक्यात विविध कार्ये करतो म्हणूनच त्याला वेगवेगळ्या शब्दजातींची नावे दिली आहेत. म्हणूनच शब्दाचा विचार करताना आपली ही मनोभूमिका तयार झाली की शब्दांच्या जाती समजणे सोपे जाते.

आता आपण सर्वप्रथम शब्दाची व्याकरणिक व्याख्या पाहूया.

शब्द - ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला, तर त्याला शब्द असे म्हणतात.

उदा. 'म, क, ळ' या तीन अक्षरांची 'कमळ' अशा क्रमाने रचना केली तर मराठी भाषेत त्याचा अर्थबोध होतो व त्यामुळे तो मराठी भाषेतला अर्थपूर्ण शब्द आहे असे म्हणता येते. मात्र मकळ, कळम अशा रचना मराठीत अर्थपूर्ण होत नसल्याने त्यांना शब्द म्हणता येणार नाहीत.

आता शब्दांच्या मुख्य आठ जाती पाहू या.

शब्दांच्या जाती

शब्दांच्या वाक्यातील कार्यावरून त्यांच्या पुढीलप्रमाणे आठ जाती ठरतात.

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय

यातील पहिल्या चार जाती सव्यय किंवा विकारी आहेत, कारण त्यांच्यामध्ये बदल होतो, तर पुढील चार जाती अव्यय किंवा अविकारी आहेत. त्यांच्यामध्ये बदल होत नाहीत.

शब्दांच्या जातींच्या व्याख्या आणि उदाहरणे तुम्ही संदर्भ पुस्तकातून अभ्यासालच. इथे आपण त्यांच्याविषयी काही विशेष माहिती पाहूया.

नामांचे धर्मवाचक आणि धर्मिवाचक असे वर्गीकरण असून सामान्यनाम, विशेषनाम व भाववाचकनाम असे तीन प्रकार आहेत.

नामाच्या मूळ प्रकारांचेही एकमेकांच्या जागी कार्य होते. तसेच इतर शब्दजातीही काहीवेळा नामरूपात येतात. उदा. मी आत्ताच नगरहून आलो. (नगर- मूळचे सामान्यनाम, येथे विशेषनाम ) शहाण्याला शब्दांचा मार ( शहाणा- मूळचे विशेषण, येथे सामान्यनाम)

लिंग, वचन आणि विभक्तीमुळे नामाच्या रुपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात.

मराठीत ३ लिंगे मानतात. निर्जीव वस्तूंची लिंगे काल्पनिक आहेत, त्यामागे काही बाबतीत तत्त्व आढळते, तर अनेक अपवाद आढळतात. त्यामुळे मराठी भाषा ऐकून आणि बोलण्यात तिचा वारंवार उपयोग करूनच ही लिंगव्यवस्था समजून घेता येते.

मराठीत २ वचने आहेत. वचन बदलताना काही नामांचे रूप बदलते, तर काहींचे तेच राहते. जोडपे, त्रिकूट, ढीग, रास, समिती, सैन्य यातून अनेकत्व किंवा समूह दर्शविला गेला तरी तो एक गट मानून त्याचे एकवचन मानले जाते. मात्र २ किंवा त्याहून जास्त जोडपी, त्रिकुटे, ढीग असले तर अनेकवचनी मानली जातात.

सामान्यरूपे लक्षात येण्यासाठी त्या नामाचा वाक्यात उपयोग करून पाहावा. वर्ग या शब्दाचे सामान्यरूप 'वर्गा' आहे, वर्गात किंवा वर्गाला नव्हे. या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

प्रश्नार्थक सर्वनाम आणि सामान्य (अनिश्चित) सर्वनाम यातील फरक - उदा. कोण रे तू? (प्रश्नार्थक सर्वनाम), तिकडे कोण आहे, ते मला माहीत नाही. (सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम)

आपण आणि स्वतः या ही पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम या दोन्ही प्रकारात आढळतात. त्यांच्यातील फरक लक्षात घेणे.

विशेषणांचे मुख्य प्रकार

अ) सिद्ध विशेषणे - १. गुणविशेषणे- मोठी मुले, २. संख्याविशेषणे -दहा मुली, ३. सार्वनामिक विशेषणे -माझे पुस्तक, ब) साधित विशेषणे - १. नामसाधित विशेषणे - सातारी पेढे, २. धातुसाधित विशेषणे - हसरी मुलगी, ३. अव्ययसाधित विशेषणे - वरचा मजला

क्रियापदाचा अभ्यास करताना धातू, धातुसाधिते, कर्ता, कर्म या सर्व संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. उदाहरणादाखल एकेक वाक्य लक्षात घेऊन सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, उभयविध क्रियापदे लक्षात घेणे आवश्यक आहे. मो. रा. वाळंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकामध्ये क्रियापदविचाराची सविस्तर माहिती आहे.

काळांच्या उपप्रकारांमधील अपूर्ण काळ आणि रीतिकाळ यांच्यातील फरक नीट समजून घ्यावा. उदा. तो कविता म्हणत असेल -(भविष्यात क्रिया चालू असल्याचे दिसते -अपूर्ण भविष्यकाळ) तो कविता म्हणत राहील/जाईल. (भविष्यात क्रिया सतत करत राहण्याची रीत समजते - रीति भविष्यकाळ)

क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये आणि केवलप्रयोगी अव्यये या सर्व अव्ययप्रकारांचे त्यांच्या अर्थावरून व स्वरूपावरून विविध प्रकार आहेत. ते बारकाईने अभ्यासावेत.

अशाप्रकारे सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे शब्दांचे वाक्यातील कार्य समजून जात निश्चित केली तर शब्दविचार हा संपूर्ण घटक अभ्यासासाठी सोपा आहे. पुढील लेखामध्ये आपण समास, शब्दसिद्धी आणि शब्दशक्ती या घटकांची माहिती घेऊया.

Sunday, 27 January 2019

Fan dance पंखा कवायत

https://youtu.be/ogWUUNoYoAQ 
70व्या प्रजासत्ताक दिनाच्या* निमित्ताने *पंखा नृत्य* *fan drill* सादरीकरण

▪जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *शेळका धानोरा* ता. कळंब जि. उस्मानाबाद

▪Video पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि *LIKE* & *SUBSCRIBE* करा.

Sunday, 20 January 2019

School competition शालेय स्पर्धा






जि.प.प्राथमिक शाळा *शेळका धानोरा* येथे *प्रजासत्ताक दिनानिमित्त* *संगीत खुर्ची, लिंबू चमचा, स्मरण शक्ती व रंगभरण स्पर्धा* घेण्यात आल्या.

Wednesday, 16 January 2019

Fan dance,बाल आनंद मेळावा

[13/01 16:14] rameshwar jagdale: https://youtu.be/-178NqCKKhM
बाल आनंद मेळावा, शेळका धानोरा.
अतिशय सुंदर vdo आहे.
एकदा अवश्य पहा.
Please subscribe my YouTube channel.
Like and share.
[16/01 16:46] rameshwar jagdale: https://youtu.be/ML23C4L8yXg 
Fan DRILL,पंखा कवायत, शेळका धानोरा.
अतिशय सुंदर vdo आहे.
एकदा अवश्य पहा.
Please subscribe my YouTube channel.
Like and share.

Thursday, 25 October 2018

जि.प.प्राथमिक शाळा,शेळका धानोरा शाळेत वेशभूषा_स्पर्धा FASHION SHOW

https://youtu.be/v3siKAMCTGM
जि.प.प्राथमिक शाळा,शेळका धानोरा शाळेत वेशभूषा_स्पर्धा FASHION SHOW आयोजित केला होता.
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आपापली वेशभूषा सुंदर पणे सादर केली.
तसेंच यावेळी गोवर रूबेला लसीकरण जनजागृती साठी रॅली काढण्यात आली.

Monday, 22 October 2018

Women power नवरात्री -जागर स्त्री शक्तीचा

https://youtu.be/mFhCauntRic
जि. प.प्राथमिक शाळा #शेळका_धानोरा येथे #नवरात्री निमित्ताने #जागर_स्त्री_शक्तीचा कार्यक्रमांतर्गत महिलांच्या विविध स्पर्धा व मनोरंजक खेळ घेण्यात आले.
#व्हिडीओ_आवडल्यास_आमच्या_चॅनलला_जरूर_subscribe_करा.

Saturday, 29 September 2018

नागिण किंवा नागवेढा रोगाविषयी माहिती

नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का?

‘व्हरीसेला झोस्टर’ या विषाणू (व्हायरस) पासून होणाऱ्या या इन्फेक्शनला नागीण (हर्पीस झोस्टर) असे म्हणतात, पण याच विषाणूमुळे आपल्याला लहानपणी कांजिण्याही होतात. लहानपणी कांजिण्या येऊन त्यां बऱ्या झाल्यावरही हा विषाणू आपली ‘पाठ’ सोडत नाही.
पाठीच्या कण्यामध्ये काही विशिष्ट नसांमधे तो ठाण मांडून बसतो तो आयुष्य भरासाठीच. केवळ आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे त्याचा फारसा त्रास होत नाही, पण वाढणारं वय, अचानक हवामानात झालेला बदल (थंडी संपून उकाडा सुरु होणे), शारीरिक अथवा मानसिक ताण, किंवा एखाद्या आजारामुळे अथवा केमोथेरपीसारख्या उपचारांमुळे तात्पुरती कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता, अशा अनेक कारणांमुळे हा निद्रिस्त विषाणू पुन्हा जागृत होऊ शकतो. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.
● नागिणीच्या संसर्गाचे प्रकार :
 १. हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार १ (HSV-1)
२. हरपीज सिंम्प्लेक्स प्रकार २ (HSV-2)
हे संसर्ग सुक्ष्मदर्शीतून एकसमान दिसतात आणि ह्यांचा तोंड व जननेंद्रियांच्या भागात संसर्ग होऊ शकतो. सर्वसाधारणतः (HSV-1) हा कमरेच्यावरच्या भागात उद्भवतो व (HSV-2) हा कमरेच्या खालील भागात उद्भवतो.
● गुप्तांगाजवळील नागीण :
गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो. सामान्यतः एखाद्या व्यक्तीला, गुप्तांगाचे एचएसव्ही–2 चे संक्रमण असलेल्या व्यक्तीकडून समागमाच्या दरम्यानच एचएसव्ही-2 चे संक्रमण होते.  ज्या जोडीदाराला न दिसणारा फोड आहे आणि आपण संक्रमित आहोत किंवा नाही याची माहिती नसलेल्या जोडीदाराकडून संक्रमण होऊ शकते.
● गुप्तांगाच्या नागिणीची चिन्हे आणि लक्षणे :
‘व्हेरिसोला ऑस्टर’मुळे होणारी नागीण ही एकाच बाजूला होते व तिचा विळखा पडत नाही. परंतु ‘हर्पिस सिम्प्लेक्‍स’मुळे होणारी नागीण ही दोन्ही बाजूंना होते व पसरूही शकते. ही नागीण प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांत आढळून येते. प्रतिकारशक्ती कमी असल्याने ही नागीण पसरते व गंभीर स्वरूपात होऊ शकते. त्यामुळे ‘नागिणीचा विळखा पडल्यास गंभीर आजार आहे’ हा समज रूढ झाला असावा.
या नागिणीवरदेखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
नागिणीच्या रोगाची लक्षणे Image 
● रोगनिदान :
हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.
सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत. नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.
● साधारण लक्षणे: 
१. सुरुवातील नागिणीच्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात, तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात.
२. नागिणीची प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज.
३. नागीण झाल्यावर तो भाग लालसर होतो, आतून दडदडीत होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपताही येत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे फोड मोठे होतात. शेजारचे छोटे छोटे फोड एकत्र होऊन मोठे फोड तयार होतात. नंतर ते फुटतात.
४. काही वेळा या फोडांमध्ये पूसुद्धा होतो. फुटल्यावर त्यातील पाणी निघून जाते आणि वरची त्वचा निघून जाऊन आतील मांस दिसू लागते. नंतर त्या मांसावर खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपली गळून पडते.
● नागिणीच्या विशिष्ट लक्षणे :
– पाठदुखी.
– नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटत राहते.
– दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात
– त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो.
– त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो.
– फ्लूमध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशीही लक्षणे यात असतात.
● हा आजार किती दिवसांपर्यंत असतो? 
१. नागीण किती प्रमाणात झाली आहे, त्यावर त्याचा काळ अवलंबून असतो. पण साधारणतः नागिणीला चार आठवडे तरी लागतात. कांजिण्यांप्रमाणेच याचा बरा होण्याचा प्रवास असतो. फक्त त्या एका आठवड्यात कमी होतात, तर नागीण बरी व्हायला वेळ लागतो. नागीण आयुष्यात शक्यतो एकदाच होते.
२. एड्स किंवा जननेंद्रियांच्या सांसर्गिक रोगांमुळे होणारी नागीण मात्र वारंवार होऊ शकते. वेळीच उपचार न केल्यास किंवा पथ्य न केल्यास नागीण बरी व्हायला खूप वेळ लागतो.
३. नागिणीबद्दल एक रूढ समज म्हणजे नागीण दोन्ही बाजूंनी आल्यास व विळखा पूर्ण झाल्यास तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार समजला जातो व त्यात रुग्ण दगावतो. यात कितपत तथ्य आहे?
कुणी घरगुती उपचार करतात; मंत्र-तंत्रदेखील केले जातात. या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत.
४. वृद्धापकाळात झालेली नागीण बरी व्हायलाही खूप वेळ लागतो. अत्यंत वाईट बाब म्हणजे अशी नागीण बरी झाल्यानंतरही त्या जागेवरची आग किंवा वेदना या नंतर कितीही उपाय योजना केल्या तरी जन्मभर पाठ सोडत नाहीत.
५. काही रुग्णांमध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांमध्ये पुरळ गेले तरी त्यां भागात तीव्र स्वरूपाच्या वेदना होण्याचे आणि अगदी दोन-दोन वर्षे त्याचा त्रास राहण्याची उदाहरणे आहेत. यालाच ‘पोस्ट-हर्पेटीक न्युराल्जीया’ असे म्हणतात. नागीण झालेल्यांपैकी सुमारे २० ते २५ टक्के रुग्णांना हा त्रास जाणवतो. यामध्ये वर त्वचेवर काहीच दिसत नाही पण अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना आणि त्यां भागातील हालचालीवर मर्यादा आल्यामुळे जीव अगदी नकोसा होऊ शकतो.
६. साधारण संसर्ग सुरु झाल्यापासून खपली पडून जाण्याची प्रक्रिया साधारण २-६ आठवड्यात पूर्ण होते. आपल्याला किती दिवस याचा त्रास होणार अथवा किती जलद या विषाणू-संसर्गाचा समारोप होणार हे सर्वस्वी आपली नैसर्गिक रोगनिवारक शक्ती, संसर्ग होतानाची आपली निरोगी-स्थिती, स्वच्छता आणि आपले वय या सर्वांवरती ठरते.
● नागिणीसाठी प्रचलित उपचार आणि गैरसमज
१. तंत्र मंत्र ऊतारा हे सर्व अंधश्रद्धा आहेत. आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. नागीण या रोगाबद्दलही अशाच अनेक भ्रामक कल्पना आहेत.
२. हा विकार कितीही भयंकर असला, तरी योग्य व वेळीच केलेल्या आयुर्वेदिक उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात ‘कक्षा’, ‘विसर्प’, ‘अग्निरोहिणी’ अशा नावांनी उल्लेख असलेल्या या विकाराला आपण नागीण, धावरे या नावांनी ओळखतो.
३. पूर्वी विषाणूंवर परिणामकारक औषधे नसल्यामुळे साधारणपणे अशा सर्व आजारांबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक भीती होती. आता नागिणीवर देखील गुणकारी व अतिशय परिणामकारक औषधे आहेत. योग्य उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. नागिणीच्या विळख्यालाही आता यापुढे घाबरायला नको.
● नागीण होण्याची कारणे
नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरण, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग नागीण होण्यास कारणीभूत असतात.
● हा आजार शरीरावर कोणकोणत्या ठिकाणी होऊ शकतो? 
डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर हा आजार विळखा घालू घालण्याची जास्त शक्यता असते.
● आयुर्वेदिक उपचार :
नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.
१. उंबाराच्या ४ पानांचा काढा करुन सकाळीच उपाशी पोटी घ्या.
२. गुळवेल सत्त्व           १५मिली
महामंजिंष्टादि काढा  १५मिली हे दुपारी घ्या.
३. खदिरारिष्ट               १५ml
कायाकल्प वटी       २ गोळ्या
संशमनी वटी           २ गोळ्या हे सायंकाळी घ्या.
४. ऊंबराची मुळी घासुन, दुर्वांचा रस करुन, कोरफडीचा गर हे मलम म्हणून बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.
● पथ्य :
१. हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.
२. पोट साफ ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे.
३. महत्त्वाचे म्हणजे आजाराच्या काळात सुरुवातीचे आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना  नागीण नाही, पण कांजिण्या मात्र येऊ शकतात.

लेख : राजु गोल्हार ( आरोग्यसंवाद )
९९२२३१५५५५
संपादन व मुद्रणकार्य : मराठी ब्रेन

Saturday, 8 September 2018

Add name online in voter list मतदार यादीत नाव ऑनलाईन समाविष्ट करण्याची लिंक

मतदार यादीत नाव ऑनलाईन समाविष्ट करण्याची
लिंक
http://www.nvsp.in/Forms/Forms/Form6

मतदार यादीतील  नावाची ऑनलाईन दुरुस्ती लिंक

http://www.nvsp.in/Forms/Forms/Form8


          👉🏻किंवा👈🏻


👉🏻सर्व करिता आता Online Form भरण्याची प्रकिया खालीलप्रमाणे.
प्रथम www.ceo.maharashtra.gov.in वर जाऊन
Online Voter Registration वर Click करणे त्या नंतर
नमुना 6, 6A, 7, 8, 8A असे फॉर्म दिसतील.

👉🏻उदा. नमुना 6 वर गेल्यावर
     State - Maharashtra   
     District - Palghar

     AC -  Vikramgad निवडा

👉🏻त्यानंतर Mandatory Detail मध्ये पुढीलप्रमाणे
प्रथम इंग्लिशमध्ये नाव टाकावे त्याचे आपोआपच प्रादेशिक भाषेत रूपांतर होते जर प्रादेशिक म्हणजेच मराठी भाषेत उदा.

👉🏻Name - Shrikrishan  Vasudev
     नाव       - श्रीकृष्ण वासुदेव

👉🏻Surname - Yadav
     आडनाव     -     यादव

⚡ (जर काना वेलांटी चूक असले तर आपल्या मोबाईलच्या keyboard च्या साहायाने आवश्यक तो बदल करता येतो)

👉🏻पुढे relative name

👉🏻RLT Name - Vasudev Shambhunath

  नातलागचे नाव - वासुदेव शंभुनाथ

👉🏻RLT Surname    - Yadav
     नातलागचे आडनाव - यादव

👉🏻नंतर RTL Type -                         Father, Mother, Husband, Other प्रकार आहे.

तसेच वर दिलेल्या RLT मध्ये शक्यतो आईचे नाव टाकू नये जास्तीत जास्त वडिलांचे नाव टाका म्हणजे पुढे अडचण नको

👉🏻नंतर Date Of Birth
दोन प्रकारे जन्मतारीख टाकता येतात पण दुसरा प्रकारे सोईस्कर आहे.

👉🏻नंतर Gender निवडा

👉🏻नंतर Address
त्यात Current आणि Permnant पण दोन्ही सारखे असेल तर Current Add type केल्यावर

👉🏻Same Above वर Tik करा  म्हणजे वरील पत्ता आपोआप खालीपन येतो

👉🏻नंतर 1) Photo Upload
       
       2) Age proof Upload
       
       3) Address proof Upload
।👉🏻नंतर Village Name
        State Name
        District Name
         आणि
  सदर गावातील वास्तवाचा कालावधी यात जन्मतारीख Copy Past करा

👉🏻Place :
👉🏻Date   :


              ✔Submit

🌟महत्वाची सुचना - Photo व Document यांची size 100 KB पेक्षा कमी असावी.

🌟आवश्यक गोष्टी Cam saccaner
नावाचे App आणि Photo & Picture Resizer App
यांचा वापर करून नमुना 6 फॉर्म हा 5 मिनिटात मोबाईलवर भरता येते.

         
       
                    👆🏻

     💫 🙏🏻धन्यवाद🙏🏻💫

SCHOOL culture programs, music,dance,film songs,projects,children songs

[16/01 15:29] rameshwar jagdale: https://youtu.be/hRrLTfvhbIk 
बाल आनंद मेळावा,जि.प.प्रा.शा.शेळका धानोरा,
पाहण्यासाठी वरिल लिंकवर क्लिक करा.
[16/01 15:36] rameshwar jagdale: https://youtu.be/PgdVllOGg3M 
शालेय समुहगीत जि.प.प्रा.शा.शेळका धानोरा,
पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.
[16/01 15:49] rameshwar jagdale: https://youtu.be/QVPQqOohwJY 
अपूर्व विज्ञान मेळावा,जि.प.प्रा.शा.शेळका धानोरा,
पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.
[16/01 16:13] rameshwar jagdale: https://youtu.be/m_y6mrJdLQQ 
प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे
जि.प.प्रा.शा.शेळका धानोरा
पाहण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा.

English Marathi words

*१ली ते ८वी साठी उपयुक्त*

*आता विद्यार्थ्यांना दया 700 इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थासह सराव*
*तो ही Alphabetically*👇

https://www.youtube.com/playlist?list=PLxyKePnpoZbx2ViqNe_cWvGm-pANEVsh2
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
*Like, Share and Subscribe my Youtube channal and see my all educational videos*
https://youtube.com/c/GodavariTambekar

पायाभूत चाचणी,Baseline test

● *_पायाभूत चाचणीचे गुणनोंद तक्ते कसे बनवावीत?_*●
🚥🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥🚥
═══════════════════
https://youtu.be/X9vbzc-f1NE              ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*_🚸 २८-०८-२०१८ ते ३१-०८-२०१८ या कालावधीत घेतलेल्या पायाभूत चाचणीचे गुण आपणास सरल प्रणाली वरती अपलोड करावयाचे आहेत. आपल्या शाळेतील पटसंख्या जास्त असेल किंवा आपणास दुसऱ्या शाळेचे गुण भरावयाचे असतील अशा वेळी आपणास गुण नोंद तक्ते लागतात._*                          ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🚸 *_पायाभूत चाचणी गुणनोंद तक्ते विद्यार्थी नावासह कसे प्रींन्ट करावेत?_*
🚸 *_Excel Sheet च्या मदतीने Pdf गुणनोंद तक्ते कसे तयार कराल?_*
🚸 *_आपण दुसऱ्या शाळेचे गुण भरणार असाल तर काय कराल?_*
🚸 *_विद्यार्थी संख्या जास्त असेल तर पायाभूत चाचणी गुण भरण्याचे नियोजन कसे करावे?_*
🚸 *_पायाभूत चाचणी गुण होणाऱ्या चुका कशा कमी कराव्यात?_*
   👉🏻 *_पायाभूत चाचणीचे गुण नोंदतक्ते संबंधी वरील गोष्टींची अतिशय सोप्या पध्दतीने दिलेली माहिती खालिल लिंकवर क्लिक करुन पाहू शकता._*
👉🏻 *_खालील लिंक youtube मध्ये open करुन व्हिडिओ पाहा._*
*_लिंक_* 👉🏻 https://youtu.be/X9vbzc-f1NE
═══════════════════
*व्हिडिओ आवडल्यास like व शेअर करायला विसरू नका channel subscribe करुन समोरील बेल वर क्लिक करुन असेच नवनवीन video नियमित मिळवा*
═════════════════   
          ✍🏼 *शब्दांकन* ✍🏼
            *श्री नितिन समुद्रे*             
         *📱 08156048686📱*
   🚥 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🚥
═══════════════════
👉🏻 *आपल्या मिञांना तसेच आपल्या शैक्षणिक Group वर शेअर करा.*

Tuesday, 7 August 2018

चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही अत्यंत महत्वाच्या टिप्स --

चांगलं मटन विकत घेता यावं म्हणून काही अत्यंत महत्वाच्या टिप्स --

१) पहिल्यांदा टांगलेल्या धुडाच्या मागच्या पायांच्यामध्ये एक नजर टाकून घ्यावी.

२)साधारण आकारावरून मगच ठरवावं की घ्यायचं का नाही.मध्यमवयीन बोकडाच मटन सर्वोत्कृष्ट असतं.
 कोवळं लगेच शिजतं, राळ होतं, आणि हाडं खायला मजा येत नाही.

३) थोराड बोकडाचं मटन शिजायला वेळ लागतो आणि चवीला फार चांगलं नाही लागत.

४) मटन घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावं. हाडांमुळं रश्याला चांगली चव येते.
मऊ मटन खाण्यात सहसा सगळे आनंदी असतात.
आमच्याकडे हाडांच्यावर जास्त डोळा असतो त्यामुळे हे प्रमाण ७०:३० आहे.

५)सीन्याचा भाग सर्वात चांगला. यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं. त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात.

६)मांडीचा थोडा भाग घ्यावा. यात नळी मिळते. नळीतला गुद्दु ओढून खाताना प्रचंड आनंद मिळतो.(Noal Harari च्या म्हणण्यानुसार हे आपलं आद्य खाद्य आहे.)

७) काळजाचा माफक तुकडा आठवणीनं घ्यावा.

८) चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी, यामुळे सुक्क्या मटणाच्या चवीत दुपटीने वाढ होते.
चरबीच्या नावाखाली पडदा दिला जातो, तिथं २ मिनिट वाद घालण्याची तयारी ठेवावी.

९) जर्मनच्या पातेल्यात शिजवलेल्या मटणास सर्वोत्तम चव येते. कुकर सहसा वापरू नये, मटन बेचव होतं.

१०) घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती-भाकरी चुरून खाता येते.
चुरून खाण्यात मटणाची सर्वोत्तम अनुभूती आहे.

११)लिंबू फार पिळून खाऊ नये, कांदा सुद्धा अगदी २-३ घासात एकदाच खावा. कोशिंबीर असेल तर हात सैल सोडण्यास हरकत नाही.

१२) लहानग्यांसाठी मिठाचा रस्सा वेगळा काढावा.
मोठ्यांसाठी हाच रस्सा सूप म्हणून देता येऊ शकतो.

मांसाहार - एक आध्यात्मिक पुण्य 84 लक्ष पशु जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो असे  सांगतात. पशूंपक्षांच्या जन्मात वर्षानुवर्षे वाया जाण्यापेक्षा, पशुपक्ष्यांना त्यातून मुक्त करून त्यांचा मनुष्ययोनीकडेचा प्रवास वेगवान करण्याचे पुण्यकर्म मांसाहारी लोक करत असतात.तेव्हा मांसाहाराला पाप समजण्याची चूक चुकूनही करू नका. मटण खा, पुण्य कमवा .

महत्वाची सुचना --  बोलवा कधी रविवार पाहून ??

Wednesday, 20 June 2018

चहाचे दुष्परिणाम

🍁जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट🍁

 बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील,

 🍁🍁🍁चहाचे दुष्परिणाम.🍁🍁🍁

🍁१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

🍁 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

🍁३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

🍁४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

🍁५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

🍁६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

🍁७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

🍁८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

🍁९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

 🍁१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .

 *दिवसातून एक तरी अशी पोस्ट टाका जेनेकरून ती पोस्ट सर्वांच्या उपयोगी पडेल* जनहितार्थ -

 🌺🌺🙏🌺