Sunday, 18 October 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON OCTOBER 18TH 2020 AT 6.00 PM





 

श्री तुळजा भवानी LIVE दर्शन व तुळजाभवानी महिमा

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान | तुळजापूर 

Tuljapur,Live Darshan 

शाकंभरी नवरात्र 

 https://www.tuljabhavani.in/live-darshan.php 

Live दर्शन घेण्यासाठी ☝☝क्लिक करा.




 

पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव साजरा केला जातो.

शेषशाही अलंकार पूजा

पौर्णिमेस देवीला महापूजा बांधण्यात येते.


विजयादशमी दसरा

दसरा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त

मंदिर कार्यक्रम व घडामोडी


शारदीय नवरात्र

तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला

 अनन्यसाधारण महत्व असून या प्रसंगी देवीच्या

 मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते आणि हा

 उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने

 साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदे पासून (सप्टेंबर

-ऑक्टोबर) या शारदीय उत्सवास सुरुवात होते.

 त्यामागील पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्याबरोबर

 नऊ दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमल्याने देवी

 निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. नवरात्र संपताच दहाव्या

 दिवशी विजयादशमीला भारतीय संस्कृतीतला मोठा

 सण दसरा असतो.



शाकंभरी नवरात्र

पप्रत्येक वर्षी पौष महिन्यात ( डिसेंबर / जानेवारी

 महिन्यात ) शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या

 भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने उत्साहाने साजरा

 केला जातो. शारदीय नवरात्राप्रमाणेच याही उत्सवाला

 भाविकांची गर्दी असते. शारदीय नवरात्रामध्ये 

 पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी

 नवरात्र महोत्सवात होते. शारदीय नवरात्राच्या

 सोहळ्याचे वैभव पाहण्याचा योग ज्यांना येत नाही,

 असे भाविक शाकंभरी नवरात्राच्या सोहळ्यास

 सहभागी होण्याकरिता व देवीच्या दर्शनाकरिता

 आवर्जून तुळजापूरला येतात.


विजयादशमी दसरा

उषःकाली देवीचे सीमोल्लंघन केले जाते.या दिवशी

 बर्हाणपूर येथून पालखी व भिंगार येथूनपलंग यांचे

 आगमन होते.तसेच पालखीतून मिरवणूक पार पडून

 देवी पलंगावर विश्रांती(श्रमनिद्रा) घेते.दसरा ह्या सणांचं

 मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला

 एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी,

 नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी

 केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो.

 सोन्या - चांदीचे दागिने केले जातात. नवे व्यवसाय चालू

 केले जातात. नवी नाटके, चित्रपट ह्यांचे मुहुर्त होतात.

 पुस्तकं प्रकाशीत केली जातात.


Friday, 16 October 2020

नवरात्री नऊ रंग 2020

 नवरात्री : जाणून घ्या, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग 







दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी खास

गणेशोत्सवानंतर काही दिवसांतच येऊन ठेपणाऱ्या नवरात्रोत्सवाची अनेक मंडळी आतुरतेने वाट बघतात. दसरा, नवरात्री हे सण तरुणाईसाठी खास असतात. यंदा शनिवारपासून

 नवरात्रौत्सवाला सुरूवात होतं आहे. १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर

 या काळात नऊ दिवस ठिकठिकाणी आदिशक्तीचा जागर असतो.  गेल्या दशकभरापासून 

नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा सुरू आहे. 

एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते अशी

 या मागील धारणा आहे. एकोपा आणि समानतेचा संदेश यातून दिला जातो.


नवरात्रीचे नऊ रंग (२०२०)

१७ ऑक्टोबर – प्रतिपदा – राखाडी (Grey)

१८ ऑक्टोबर – द्वितिया –  केशरी/नारंगी (Orange)

१९ ऑक्टोबर – तृतिया – पांढरा (White)

२० ऑक्टोबर – चतुर्थी – लाल (Red)

२१ ऑक्टोबर – पंचमी – निळा (Royal Blue)

२२ ऑक्टोबर – षष्ठी – पिवळा (Yellow )

२३ ऑक्टोबर सप्तमी- हिरवा (Green)

२४ ऑक्टोबर – अष्टमी – मोरपंखी (Peacock Green)

२५ ऑक्टोबर – नवमी – जांभळा (Purple)


खरंतर धर्मशास्त्रात रंगांची प्रथा नाही. नवरात्रीत नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची

 संकल्पना साधरण दहा पंधरा वर्षांपासून सुरू झाल्याचं खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक

 व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे.

 नऊ दिवसांत या रंगांमुळे साऱ्याजणी एकमेकींच्या जवळ येतात. त्यांच्यामध्ये 

समानता दिसते. या दिवसात गरीब- श्रीमंत अशी दरी दिसत नाही. एकाच रंगांची

 वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून

 ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे

 परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली.


OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON 16TH OCTOBER 2020 AT 6.00 PM




 

Thursday, 15 October 2020

नवरात्र-घट स्थापना कशी करावी ?















 घटस्थापना विधी

घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य - नवरात्रोत्सवात
 शेतातील काळी माती, एक पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य यामध्ये
 गहू, साळी, इतर कडधान्य इ., कुंभ कलश, विड्याची पाने, 
 सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप,
 गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी पूजेचे साहित्य 
आवश्यक असते.

अमावस्येच्या दिवशी सर्व पूजासामग्री जमवावी. एकाच वेळी
 भोजन करावे. घटस्थापनेसाठी स्वच्छ जागेची निवड करावी.
 प्रतिपदेला सकाळी लवकर उठून नदी, तलाव, विहीर किंवा
 सोईस्कर ठिकाणी स्नान करावे. चौरंग किंवा पाटावर देवीची 
प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण, मुक्ताहराने सुशोभित करावी. 
फोटो नसल्यास दुर्गायंत्राची स्थापना करावी. त्यासमोर पवित्र 
ठिकाणची किंवा शेतातील माती आणून वेदी (वेदी म्हणजे शेत) 
तयार करून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य पेरावेत. पीठ पूजेकरिता
 चौरंगाच्या दक्षिणेला कलश ठेवावा. त्यामध्ये तीर्थ-जल ठेवावे. 
एखादे रत्न किंवा सुवर्णही त्यात ठेवावे.

पूजा झाल्यानंतर देवीसमोर गायन-वादन करावे. विधिवत
 मंत्रोच्चाराबरोबर पूजन करावे. उत्सवात जमिनीवर झोपावे. 
कुमारिकांचे पूजन करावे. एक किंवा दोन वर्षाची कन्या कुमारिका,
 तीन वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, 
नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा मानली जाते. 
 दहा वर्र्षांपुढील कन्येला पूजनासाठी वज्र्य मानले आहे.
 नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास तीन दिवस उपवास करावा. भक्तिभावाने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या रात्री भगवती पूजन 
केल्याने सर्व चांगले फळ मिळतात. 

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON OCTOBER 15TH 2020 AT 6.00 PM





 

Tuesday, 13 October 2020

तुम्ही आता LIVE बघू शकता कि वादळ कुठे आहे

 *आंध्र प्रदेशातून चक्रीवादळ कर्जत-जामखेडमार्गे चाललं मुंबईला* 








तुम्ही आता LIVE बघू शकता कि वादळ कुठे आहे  

या निळ्या लिंक वर क्लिक करा 

https://www.windy.com/?18.520,73.855,5,m:eDTainv

शिर्डी ः पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आंध्र ते मुंबई व्हाया नगर, असा प्रवास भूभागावरून करीत अरबी समुद्रात जाणार आहे. एका समुद्रातून निघालेले वादळ भूभागावरून मार्गक्रमण करीत दुसऱ्या समुद्रात जाणे, याकडे दुर्मिळ घटना म्हणून पाहिले जात आहे.

तत्पूर्वीच उत्तर भारतातून निघालेल्या परतीच्या पावसाचे गार वारे महाराष्ट्रात पोचले आहे. चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त हवा तयार झाली. परतीच्या पावसाचे गार वारे त्यात मिसळले. त्यामुळे सध्या राज्यभर दमट हवामान तयार झाले. त्यात चक्रीवादळाचा प्रवास दक्षिण नगर जिल्ह्यातून होणार असल्याने, येत्या बुधवारी व गुरुवारी या भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. हवामानातील हे बदल अनाकलनीय असल्याचे मत 

जाणकार व्यक्त करीत आहेत.

जलसंपदा विभागाकडे ब्रिटिश काळापासून गेल्या 100 वर्षांतील पाऊस

 व त्याच्या प्रवासाच्या ठळक नोंदी आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात 

निर्माण झालेले वादळ भूभागावरून प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात 

गेल्याची एकही घटना नोंदलेली नाही.

हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, येत्या मंगळवारी (ता. 13) 

बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून

 नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे (ता. 15) जामखेडहून दक्षिण नगर जिल्हा पार करून 

दुपारपर्यंत मुंबईत पोचेल. 

दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ रौद्र रूप धारण करील.

 त्याचा वेग ताशी शंभर किलोमीटरपर्यंत वाढेल. त्यामुळे उद्यापासून (ता. 12) 

शनिवारपर्यंत (ता.17) हवामान ढगाळ व दमट राहील. दक्षिण नगर जिल्ह्यात

 गुरुवारी (ता.15) अधिक पावसाची शक्‍यता आहे.

या प्रवासात वादळाचा चक्राकार वेग ताशी 25 किलोमीटर, तर पुढे सरकण्याचा 

वेग ताशी 10-12 किलोमीटर राहील. मुंबईतून अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ 

वेगाने कराचीकडे जाईल. मात्र, मुंबई व कोकणपट्टीत अधिक पाऊस होईल.

 राज्यातील सर्वच भागात येत्या 13 ते 18 ऑक्‍टोबरपर्यंत सर्वदूर पावसाची शक्‍यता आहे. 

जलसंपदा विभागाकडे गेल्या शंभर वर्षांतील पर्जन्यमानाच्या नोंदी तपासल्या. 

अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाल्याची घटना सहसा घडत नाही. यंदा तेथे

 निसर्ग चक्रीवादळ तयार झाले. त्याने कोकणपट्टीची हानी केली. ही दूर्मिळ घटना आहे.

हवामान खात्याच्या संकेतस्थळावर दुसऱ्या दुर्मिळ घटनेची नोंद व्हायला सुरवात

 झाली आहे. 13 सप्टेंबर रोजी अरबी समुद्रातून विशाखापट्टणम किनारपट्टीवरून

 निघालेले चक्रीवादळ नांदेड व्हाया नगर, पुणे असा प्रवास करीत मुंबईच्या अरबी

 समुद्रात जाण्याचा अंदाज आहे. तसे झाले, तर ही गेल्या शंभर वर्षांतील दुसरी दुर्मिळ

 घटना असू शकेल. त्यामुळे 18 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस होऊ शकतो.

 

- उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग 

संपादन - अशोक निंबाळकर

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON 13TH OCTOBER 2020 AT 6.00 PM