Thursday, 26 November 2020
Wednesday, 25 November 2020
Tuesday, 24 November 2020
Monday, 23 November 2020
Sunday, 22 November 2020
Saturday, 21 November 2020
Friday, 20 November 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON NOVEMBER 20TH 2020
उस्मानाबाद - गेल्या काही दिवसापासून आटोक्यात आलेली कोरोना संसर्ग साथ
पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी ८७ जणांचा रिपोर्ट कोरोना
पॉजिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील शाळा
( ९ वी ते १२ वर्ग ) सोमवारपासून सुरु होणार
आहेत, त्यात काही शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह
आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
गेले काही दिवस कोरोना रुग्णाची संख्या ५० च्या
आत होती. मात्र शुक्रवारी एकदम ८७ पॉजिटीव्ह
निघाले आहेत. त्यात उस्मानाबाद ४१,
तुळजापूर १३, उमरगा ११, लोहारा २, कळंब ९,
वाशी ३, भूम २, परंडा ६ असा समावेश आहे.
जिल्ह्यात आज २५ रुग्ण बरे होवून घरी परतले
तर ८७ नव्या रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत
जिल्ह्यात १५ हजार ४४२ रुग्ण आढळून आले असून पैकी १४ हजार ६१८
रुग्ण बरे झाले आहेत. तसेच
५५८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा ( ९ वी ते १२ वर्ग ) सोमवारपासून सुरु होणार
आहेत, त्यात उस्मानाबाद शहरातील भोसले हायस्कुल मधील जवळपास २० शिक्षक ,
कर्मचारी तसेच उमरगा येथील बसवेश्वर शाळेतील सहा शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह
आले आहेत. शाळेची घंटा वाजण्याअगोदरच धोक्याची घंटा वाजत असल्याने
पालक आणि शिक्षक चिंताग्रस्त झाले आहेत.
Thursday, 19 November 2020
Wednesday, 18 November 2020
Tuesday, 17 November 2020
Monday, 16 November 2020
Sunday, 15 November 2020
Subscribe to:
Comments (Atom)






































