Wednesday, 20 June 2018

चहाचे दुष्परिणाम

🍁जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट🍁

 बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील,

 🍁🍁🍁चहाचे दुष्परिणाम.🍁🍁🍁

🍁१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

🍁 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

🍁३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

🍁४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

🍁५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

🍁६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

🍁७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

🍁८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

🍁९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

 🍁१०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

खरे पाहिले तर 'चहा' दारू पेक्षा ही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही .

 *दिवसातून एक तरी अशी पोस्ट टाका जेनेकरून ती पोस्ट सर्वांच्या उपयोगी पडेल* जनहितार्थ -

 🌺🌺🙏🌺

Friday, 6 October 2017

मतदार यादीतील आपले नांव शोधा.

आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,edc फॉर्म भरा,आपला हक्क बजावा ,
 https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://103.23.150.139/marathi/&ved=0ahUKEwil94Gkh_TRAhVIOI8KHVOiBxgQFggZMAA&usg=AFQjCNEkT7DB8COk02IaZlJEals-ESVx9w&sig2=f6NqSsB-elIYcTneQbJcgg

Sunday, 27 August 2017

रक्तदान का व कोणी करावे?

 *रक्तदान का करावे?*

*सारे जीवन रक्तावरच आधारलेले असते. रक्तामध्ये ६०% द्रवपदार्थ आणि ४०% घन पदार्थ असतात. यातील द्रवपदार्थाला प्लाज्मा म्हणतात ज्यात ९०% पाणी आणि १०% पोषकघटक, हार्मोन्स, इत्यादी असतात. या घटकांची झीज अन्न, औषधे यांच्या साहाय्याने सहज भरुन काढता येते. मात्र घन पदार्थ, उदाहरणार्थ लाल रक्त पेशी, पांढ-या रक्त पेशी आणि रक्तकणिका यांची झीज भरुन निघण्यासाठी बराच वेळ लागतो.येथेच तुमची भूमिका सुरू होते. या गोष्टींची झीज भरुन काढण्यासाठी लागणार वेळ रुग्णाचे प्राण घेऊ शकतो. कधीकधी तर शरीर ही झीज भरुन काढण्याच्या अवस्थेत नसते.तुम्हाला माहीत आहे की रक्त निर्माण करता येत नाही ते केवळ दान करता येते. म्हणजेच तुम्ही रक्तदान करुन एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकता. म्हणूनच ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे . दरवर्षी भारतामध्ये २५०० सीसी रक्ताच्या ४०० लाख घटकांची गरज असते ज्यापैकी केवळ ५००००० च उपलब्ध होऊ शकतात*
 *रक्‍तदान कोणी करावे व कसे?*

*रक्‍तदानासाठी आलेल्या रक्‍तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे.*
*1]त्याचप्रमाणे रक्‍तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे.*
*2]वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्‍क्‍यांपेक्षा जास्ते असावे.*
*3]हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्‍तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्‍ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते.*
*4]रक्‍तदात्याने आधी किमान तीन महिने रक्‍तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्‍तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टर सल्ला घ्यावा.*
*5]उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.*
*6]रक्‍तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५० मि.लि. रक्‍त घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्‍त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्‍त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्‍तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्‍तदात्यास रक्‍तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्‍ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तपमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्‍त ३५ दिवस खराब न होता राहू शकते.*


गणपती बाप्पा मोरया


Tuesday, 25 July 2017

मनोरे human tower


वंश,गोत्र,देवक

९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या

1. गोत्र - आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र.... यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,
जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती....

2. देवक -
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते... वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.

3. वंश -क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश.
यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत... या ९६ कुळानुसार
त्याची विभागणी झाली आहे.
[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]

१. अहिरराव Ahirrao सुर्य... भारद्वाज ... पंचपल्लव

२. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव

३. आंगणे Angane चंद्र...दुर्वास ... कळंब, ... केतकी... हळद... ,सोने

४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख

५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद... सोने

६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख

७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल

८. कोकाटे Kokate सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस

९. खंडागळे Khandagale सुर्य , वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

१०. खडतरे Khadtare चंद्र लोमेश पंचपल्लव

११. खैरे Khaire चंद्र मार्कंडेय पंचपल्लव

१२. गव्हाणे Gavane चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख

१३. गुजर Gujar सुर्य शौनक पंचपल्लव

१४. गायकवाड Gaikawad चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

१५. घाटगे Ghatge सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव

१६. चव्हाण Chavan सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई

१७. चालुक्य Chalukya च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख

१८. जगताप Jagatap चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर,वड, पिंपळ

१९. जगदाळे Jagdale चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार

२०. जगधने Jagdhane चंद्र, कपिल, पंचपल्लव

२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav) चंद्र कौंडिण्य,अत्रि, कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा...

२२. ठाकुर Thakur सुर्य कौशिक, पंचपल्लव

२३. ढमाले Dhamale सुर्य शौनल्य पंचपल्लव

२४. ढमढरे Dhamdhere सुर्य काश्यप कळंब

२५. ढवळे Dhavale चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार

२६. ढेकळे Dhekale चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.

२७. ढोणे Dhone सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..

२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव

२९. तावरे / तोवर Tovar सुर्य गार्ग्य उंबर

३०. तेजे Teje सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई

३१. थोरात Thorat सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ

३२. थोटे (थिटे) Thote सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

३३. दरबारे Darbare चंद्र कौशीक पंचपल्लव

३४. दळवी Dalavi सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव

३५. दाभाडे Dabhade सुर्य शौनल्य कळंब

३६. धर्मराज Dharmaraj सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव

३७. देवकाते Devkate चंद्र कौशीक पंचपल्लव

३८. धायबर Dhaybar चंद्र भारद्वाज उंबर, शंख

३९. धुमाळ Dhumal चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान

४०. नलावडे Nalavade चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल

४१. नालिंबरे Nilabare चंद्र भारद्वाज उंबर, शंख

४२. निकम Nikam सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू

४३. निसाळ Nisal सुर्य वाजपेयी पंचपल्लव

४४. पवार (परमार) Pawar (Parmar) सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार

४५. प्रतिहार Pratihar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने

४६. पानसरे Pansare चंद्र कश्यप कळंब

४७. पांढरे Pandhare चंद्र लोमेश पंचपल्लव

४८. पठारे Pathare सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल

४९. पालवे Palve सुर्य भारद्वाज कळंब

५०. पलांढ Palandh सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव

५१. पिंगळे Pingale चंद्र भारद्वाज उंबर, शंख

५२. पिसाळ Pisal सुर्य कौशीक पंचपल्लव, वड

५३. फडतरे Fadatare चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख

५४. फाळ्के Phalke चंद्र कौशीक पंचपल्लव

५५. फाकडे Fakade सुर्य विश्वामित्र पंचपल्लव

५६. फाटक Phatak चंद्र भारद्वाज कमळ

५७. बागल Bagal सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव

५८. बागवर Bagvar चंद्र भारद्वाज उंबर्,शंख

५९. बांडे Bande सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने

६०. बाबर Babar सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख

६१. भागवत Bhagawat सुर्य काश्यप कळंब

६२. भोसले Bhosale सुर्य कौशीक पंचपल्लव

६३. भोवारे Bhovare चंद्र कौशीक पंचपल्लव

६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) सुर्य कौशीक पंचपल्लव

६५. भोईटे Bhoite सुर्य शौनक पंचपल्लव

६६. मधुरे Madhure सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल

६७. मालपे Malpe चंद्र भारद्वाज उंबर, शंख

६८. माने Mane चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख

६९. मालुसरे Malusare सुर्य काश्यप कळंब

७०. महाडीक Mahadik सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ

७१. म्हांबरे Mhambare चंद्र अगस्ति कळंब, शमी

७२. मुळीक Mulik सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

७३. मोरे(मोर्य) More (Morya) चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे

७४. मोहीते Mohite चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल

७५. राठोड Rathod सुर्य काश्यप सुर्यकांत

७६. राष्ट्रकुट Rashtrakut सुर्य कौशीक पंचपल्लव

७७. राणे Rane सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत

७८. राऊत Raut सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल

७९. रेणुस Renuse चंद्र विश्वामित्र पंचपल्लव

८०. लाड Lad चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल

८१. वाघ Wagh सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ

८२. विचारे Vichare सुर्य शौनक पंचपल्लव

८३. शेलार Shelar सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal चंद्र गार्ग्य शंख

८५. शिंदे Shinde सुर्य कौंडिण्य कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल

८६. शितोळे Shitole सुर्य काश्यप वड, सुर्यकांत

८७. शिर्के Shirke चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान

८८. साळ्वे Salve सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल

८९. सावंत Sawant चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख

९०. साळुंखे Salunkhe सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख

९१. सांबरे Sambare सुर्य मान्यव्य कळंब, हळद

९२. सिसोदे Sisode सुर्य कौशीक पंचपल्लव

९३. सुर्वे Surve सुर्य वसिष्ठ पंचपल्लव

९४. हंडे Hande सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल

९५. हरफळे Harphale चंद्र कौशीक पंचपल्लव

९६. क्षिरसागर Kshirsagar सुर्य वसिष्ठ कळंब

हर हर महादेव
जय भवानी
जय शिवराय....!!