| १. हिरवा तुरा पांढरा घोडा सांगायला वेळ घेतो मी थोडा | |
| २. कोपर्याुत उभी राही, सकाळी कामाची घाई, सकाळी उठताच हातात घेते आई | |
| ३. दोन भाउ जुळे एका रंगाचे एका उंचीचे , हरवता एक काय काम दुसर्यातचे | |
| ४. कपड्यावर कपडे पाचपन्नास काढता एकास रडवतो ससमोरच्यास | |
| ५. पांढरी जमीन काळे बीज देता ध्यान होऊ सदन्यान | |
| ६. उन्हात येई, सावलीत जाई, नसता हवा याची कमी नाही, हवा लागताच मारुन जाई | |
| ७. झाड निघाले पाण्यातून, फुले नाही पण फांद्या घेऊन,सावली थंड पण भीजन्याचा दंड | |
| ८. जमिनीच्या पोटात दडउन पाय मन माझी आकाशी जाय थकल्या भुकेल्यांची मी हाय माय | |
| ९. कपड्यावर कपडे पाचपन्नास काढता एकास रडवतो समोरच्यास | |
| १०. लाल गाय लाकूड खाय पाणी प्याई मारुन जाई | |
| ११. आठ तोंड जीभ नाही तरी शब्दांची गोडी मधा पेक्षा कमी नाही | |
| १२. हिरवी टोपी लाल शाल पोटात वसलि मोत्याची माळ | |
| १३. हिरवा मासा हिरवी अंडी आंड्या ला आहे भलतीच गोदी खायला पडते सगळ्यांची उडी | |
| १४. काळे फूल उन्हाळी पावसाळी विपुल हिवाळ्यात खाते धूळ | |
| १५. एक रखवालदार उन्हा तान्हत, उभा आपल्या दारात, खाणे नाही पिणे नाही, एका कली समोर याचे काही चालत नाही. | |
| १६. काला बदन धीमी चाल आखे तेज रखवलदार माने सबको करे सतेज | |
| १७. हाड नाही मास नाही फक्ता बोटे आहेत माझी ओळखा पाहु मे कोण. | |
| १८. थंडीत झोपून राहते, उन्हात सावली देते एका पायात धोतर घालते पावसाळात मात्रा रडत बसते. | |
| १९. थांबून वाजते पण घड्याळ नाही, बारीक लांब पण काठी नाही,दोन तोंडची पण साप नाही, स्वास घेते पण तुम्ही नाही. | |
| २०. धन आहे पण पैसे नाही, जवळ असता स्वाताच्या रक्षणाची काळजी नाही | |
| २१. ना जेवण ना पाणी याच्या बुद्धी पुढे हार मानतात ज्ञानी | |
| २२. हिरव छप्पर लाल घर लपून बसलेत असंख्य चोर | |
| २३. गळा आहे पण डोके नाही खांदा आहे पण हात नाहीत. मी कोण ? | |
| २४. पाय नाही चाक नाही तरीही चालते, खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागते | |
| २५. दात आहेत पण चावत नाही गुंता होता काळ्या शेतात सगळे माझयावर सोपवतात. | |
| २६. लगाम सुटला खूप नाचला , घोडा लाकडी मुलांना आवडी. | |
| २७. वीज गेली आठवण झाली, मोठी असो वा लहाणी डोळ्यातून ईच्या गाळते पाणी. | |
| २८. जटाधरी राहे उंचावरी देतो तेल आणि पाणी, म्हणतात ही देवाची करणी. | |
| २९. हातात हिरवा तोंडात लाल, सणसमारंभची मी आहे शान. | |
| ३०. मातिशिवाय उगवली कपाशी लाख मन, मुसळधार पाण्यात भिजला नाही एक कन. | |
| ३१. जादूच्या कळ्यांच एवढस खोक भिंतीवर घासा त्याच डोक. डोक्यातून फुलेल प्रकाशफूल, देठाना जलायचा खूळ. | |
| ३२. सर्वांची ती माय माउली जग तिच्यावर जगते घामाचा ती घास घेते मोत्याची ती रास देते. | |
| ३३. सुखात दुखात ते सहज येतात कोमात खारट ते असतात | |
| ३४. मी आहे काळा मला भटकण्याचा चाळा येणार्याअला घेऊन जातो. जाणार्यालला सोडून देतो, थकून जाताच जोरात किंचाळतो, हॅश हश करत थांबून राहतो. | |
| ३५. दोरी नाही, खिळा नाही , पडत नाही फुटत नाही, दमत नाही थांबत नाही,गोल फिरतो पण भिंगरी नाही. |
Tuesday, 17 May 2016
मराठी शाब्दिक कोडी
Subscribe to:
Post Comments (Atom)
19 vya kodyach uttar pahije mala
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteBasari
Delete24व्या कोड्याच उत्तर पाहिजे मला.
ReplyDeleteहो
Deletecomb
Deletehach to chaha asha prakarache kode pahije
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete3 answer
ReplyDelete23 साव्या धड्याचे उत्तर मला पाहिजे
ReplyDeleteएकोणिसाव्या कोड्यात उत्तर पाठवणं सर कृपा करून
ReplyDelete8
ReplyDelete19 नं.चे उत्तर पाठवा
ReplyDeleteno.30 चे उत्तर सांगा
ReplyDeleteमला 24व्या कोड्याचे उत्तर हवे आहे
Delete