निशब्द झाल्या जाणिवा
थिजून गेले शब्द
याच नेत्रांनी पाहीले
माझ्या शुरांचे रक्त
असा आज खंत करत राहीलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
फडताळातील बंदूक
जर खोटी नसती
पहिली गोळी आज
मिच झाडली असती
लाहोरमधली होळी आज खेळून आलो असतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
न जाऊ दिले असते
शुरांचे बलिदान व्यर्थ
असा घडवला असता
शिवबा शब्दाचा अर्थ
दुर्दैवाने आज विलाप करीत बसलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
प्रेमाची अनं त्यागाची फुले
आज अश्रूंची झाली
त्याच फुलांनी आज
श्रद्धांजली वाहिली
मनातून आज चडफडत राहिलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
शब्द आले थांबा सर , हरू नका
करू नका तुम्ही खंत
सिमेवर अजूनही लढतो आहे
तुमचा विद्यार्थी शुर जातिवंत
फक्त एकच सैनिक घडला असता
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाला असता
जशास तसे, शिकवन तुमची
आहे आमीच्या ठायी
बलिदान व्यर्थ मित्रांचे
आम्ही जाऊच देणार नाही
आकाशातले हे तारे कसे घडले असते
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाले असते
उठलो मुला , जागा झालो
कळले आज मर्म
लाख पेटल्या जाणिवा जरी
माणवता हाच खरा धर्म
देशाची शकले करणाऱ्यांना तेजस्वी उत्तर देईन
इथून पुढे फक्त सैनिकच घडवत राहीन...
*विनम्र श्रद्धांजली*
💐💐💐💐💐💐💐💐
थिजून गेले शब्द
याच नेत्रांनी पाहीले
माझ्या शुरांचे रक्त
असा आज खंत करत राहीलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
फडताळातील बंदूक
जर खोटी नसती
पहिली गोळी आज
मिच झाडली असती
लाहोरमधली होळी आज खेळून आलो असतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
न जाऊ दिले असते
शुरांचे बलिदान व्यर्थ
असा घडवला असता
शिवबा शब्दाचा अर्थ
दुर्दैवाने आज विलाप करीत बसलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
प्रेमाची अनं त्यागाची फुले
आज अश्रूंची झाली
त्याच फुलांनी आज
श्रद्धांजली वाहिली
मनातून आज चडफडत राहिलो नसतो
जर गुरूजी ऐवजी सैनिक झालो असतो
शब्द आले थांबा सर , हरू नका
करू नका तुम्ही खंत
सिमेवर अजूनही लढतो आहे
तुमचा विद्यार्थी शुर जातिवंत
फक्त एकच सैनिक घडला असता
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाला असता
जशास तसे, शिकवन तुमची
आहे आमीच्या ठायी
बलिदान व्यर्थ मित्रांचे
आम्ही जाऊच देणार नाही
आकाशातले हे तारे कसे घडले असते
जर तुम्ही गुरूजी ऐवजी सैनिक झाले असते
उठलो मुला , जागा झालो
कळले आज मर्म
लाख पेटल्या जाणिवा जरी
माणवता हाच खरा धर्म
देशाची शकले करणाऱ्यांना तेजस्वी उत्तर देईन
इथून पुढे फक्त सैनिकच घडवत राहीन...
*विनम्र श्रद्धांजली*
💐💐💐💐💐💐💐💐
No comments:
Post a Comment