RAMESHWAR DURGADAS JAGDALE
Educational blog You can see news,vdo,photo,slide,documents etc
Wednesday, 27 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रुग्ण
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी
चार रुग्ण
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील
आणखी चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
आले आहेत. सायंकाळी सात जणांचे रिपोर्ट
पॉजिटीव्ह आले, त्यात जुने 2 आणि आणि
नवे पाच असे सात जण होते. त्यामुळे
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित
रुग्णाची संख्या आता ५२ झाली आहे.
आता जे चार पॉजिटीव्ह रिपोर्ट आले
आहेत, त्यात उमरगा शहरातील एक, लोहारा
तालुक्यातील काटेचिंचोली येथील
एक, वाशी तालुक्यातील गोजवाडा
येथील एक आणि उस्मानाबाद
तालुक्यातील धुता येथील एक असा
समावेश आहे.
मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातून
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
विज्ञान संस्थेला एकूण 89 स्वाब टेस्टसाठी
पाठवण्यात आले होते. त्यापैकी 82 अहवाल
हे निगेटिव्ह आले आहेत तर ४ पॉजिटीव्ह
आणि ३ प्रलंबित आहेत. उस्मानाबाद
जिल्ह्याने आता कोरोना मध्ये अर्धशतक
मारले आहे. सायंकाळी उस्मानाबाद
जिल्ह्यात सात जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर
तालुक्यातील कार्ला ३, लोहारा तालुक्यातील
जेवळी येथील २, उस्मानाबाद तालुक्यातील
धुता येथील एक आणि उमरगा तालुक्यातील
केसरजवळगा येथील एक असा समावेश आहे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment