उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले
उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद तालुका 4 कळंब तालुका 2 आणि उमरगा 1 अश्या सात रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 94 झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यातआले आले होते, पैकी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर सात जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत, तर २ अहवाल Inconclusive तर २ अहवाल पेंडिंग आहेत.
आज प्राप्त रिपोर्ट पैकी एकूण सात जण पॉसिटीव्ह आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद शहरातला पूर्वीचाच रुग्ण आहे ज्याचा स्वाब पॉजिटीव्ह आला आहे, म्हणजे नवीन सहा रुग्णात भर पडली आहे.
नवीन सहा रुग्ण
एक रुग्ण केसरजवळगा ता. उमरगा येथील येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. दुसरे दोन रुग्ण अंदोरा ता. कळंब येथील असून ते 29 मे रोजी मुंबई रिटर्न आहेत. एक रुग्ण धुता येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण सुंभा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण कारी येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. असे एकूण नवीन सहा रुग्ण व एक जुनाच रुग्ण आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत
सापडलेले कोरोना रुग्ण - 94
एकूण बरे झालेले रुग्ण - 41
उपचार घेत असलेले रुग्ण - 50
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
No comments:
Post a Comment