Wednesday, 24 June 2020

मी,माझी शाळा आणि माझे शिक्षक


कोरोना संकट मुळे सगळे लोक आपल्या घरी आहेत. प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळत आहे..


आज असंच माझीशाळा एपिसोड युट्युब वर बघत असताना मला जाणवले,  की आपली प्राथमिक शाळा त्यातील शिक्षक आणि या शाळेने मला काय दिलं. मी कसा घडलो त्यामध्ये शिक्षकांचा रोल किती महत्त्वाचा होता ह्याची जाणीव झाली..


आमच्यावेळी हाफ चड्डी पांढरा शर्ट आणि नायलॉन ची बॅग त्याच्यामध्ये वाहया पुस्तक..

ना त्यावेळी कसली ट्युशन असायची न पर्सनल गाईडन्स. जे काही घडलं ते शिक्षकांमुळे मला पहिली व दुसरीचे एवढे आठवत नाही पण तिसरी मध्ये असताना आम्हाला शिकवायला पाटील सर असायचे ते गावात राहायचे. ते खूप छान शिकवायचे , त्यांच्याविषयी एवढे आठवत नाही पण ते खूप छान शिकवायचे..यामध्येच आम्हाला भागवत तांबारे सर म्हणून शिकवायला आले. ते नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन लावायचे जो कोणी एक ते शंभर पर्यंत लिहून लवकर  दाखवेल त्याला चॉकलेट, गणित लवकर सोडवेल त्याला चॉकलेट.. ते वर्गामध्ये चॉकलेटचा पुडा घेऊन यायचे. ते एक ते तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर ऊभे करून चॉकलेट द्यायचे त्यामुळे असं वाटायचं की आपण खूप काहीतरी जिंकले, आपण खूपच हुशार आहोत... आणि प्रत्येक वेळी नवीन नवीन मुलं पुढे जायची त्याच्यामुळे सर्वांमध्ये कॉम्पिटिशन लागल्यासारखा वाटायचं आणि खूप मज्जा यायची अभ्यास करायला..


त्यानंतर चौथीमध्ये वायकर सर आमचे क्लास टीचर होते. वायकर सर जरा कडक होते चुकलं की फटके द्यायचे पण स्वभाव पण चांगला होता समजून पण खूप सांगायचे. त्यामुळे आमच्या वर्गाला एक वेगळेच वळण लागले होतो .  शिस्तीच्या बाबतीत ते कडकच होते. चौथीमध्ये असताना मी जास्त हुशार बी नाही आणि ढ बी नाही असा मिडीयम विद्यार्थी होतो..


जेव्हा पाचवीमध्ये आलो तेव्हा नवीन एक सब्जेक्ट आला तो म्हणजे इंग्लिश त्याची भयंकर भीती आणि इंग्लिश विषय शिकवायला जगदाळे सर त्यांची तर जास्तच भीती , दहशत होती मनावर ते खूप मारायचे शब्द पाट नाही झाले की असे सहावीचे मुलं सांगायचे आम्हाला..

जगदाळे सरांनी आम्हाला पाचवी ते सातवी इंग्लिश शिकवलं खूप मारायचे पण जे काही इंग्लिश मला जमायचं किंवा जमतंय ते त्यांच्यामुळेच. ते आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लिश शिकवायचे क्लासमध्ये रेडिओ घेऊन यायचे टेप घेऊन यायचे इंग्लिश कविता ते टेपवर लावून आमच्याकडून पाठ करून घ्यायचे.. त्यांच्याकडून इंग्लिश कविता शिकायला मजा यायची खेळीमेळीचे वातावरण असायचं.. ते आम्हाला दररोज शब्द पाठ करायला द्यायचे मला आठवतंय मी सकाळी लवकर उठून चिमणीच्या प्रकाशात सकाळ-सकाळ मोठ्यामोठ्याने शब्द पाठ करायचो.. कारण शब्द नाही आले कि मार हा असायचाच.. त्यांना शब्द पाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा खुपच राग यायचा कारण ते तेवढेच जीव तोडून शिकवायचे आम्हाला.. मी आठवड्यातून एक दोन वेळा नक्कीच मार खायचो..



 कन्हेरवाडी चे कवडे सर असायचे त्यांची मुलं खूप चेष्टा करायची.. ते आई वडिलांचे महत्व समजावून सांगायचे. आईला आपण आव जाव  का बोलत नाहीत असं विचारायची.


त्यानंतर गावातील तांबारे मॅडम त्या गणित शिकवायचे त्या पण खूप छान शिकवायच्या..


वाघमारे सर खरंच खूप भारी व्यक्तिमत्व हे आमचे खेळांचे शिक्षक. त्यांच्यामुळेच आम्हाला कबड्डी,  खो-खो खेळणे , 26जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट त्यावेळेस लेझीम, घुंगरू काठी , डान्स,  कोळी गीत, याचा जीव ओतून सराव करून घ्यायचे त्यात खूप मज्जा पण यायची..

शिकवण्याच्या बाबतीत पण खूप छान होते. सर या सर्वांचा प्रॅक्टिस शाळा संपल्यावर पण करून घ्यायचे..वर्ग प्रमाणे झाडे लावणे झाडासाठी काटड्या तोडून आणणे प्रत्येक वर्गाने प्रत्येक विद्यार्थ्याच्या ग्रुपने ते झाडे सांभाळणे त्याच्यावर लक्ष असायचे..


पाचवी ला नवोदय व सातवीला कॉलरशिप ची एक्झाम असायची. यासाठी वेगळे क्लास असायचे मला आठवतय आम्हाला श्रीकांत तांबरे सर बुद्धिमत्ता चाचणी व गणित शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत व विद्यार्थ्यांशी समजावून सांगण्याची पद्धत खरोखरच खूप वेगळी आहे. त्याच्यामुळेच कि काय मला बुद्धिमत्ता चाचणी व गणित खूपच आवडू लागले होते.. ते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत जागृत होते विशेष म्हणजे शाळा सुटल्यानंतर सुद्धा ते क्लास घ्यायचे व त्या क्लासला आम्ही आवर्जून बसायचो..त्यांचा

 क्लास कधी बोर व्हायचाच नाही.



 कॉलरशिप ला का नवोदय ला व्यवस्थित आठवत नाही पण कावळे सर पण गणित शिकवायचे. शाळा सुटल्यावर पण ते आम्हा काही विद्यार्थ्यांना घरी पण शिकवायचे. ते चांगले शिकवायचे,  पण मला कधी त्यांच्याकडून गणित समजलंच नाही. माहित नाही पण त्यांच्या विषयी असलेली भीती होती का

काय? एकदा लेझीम खेळण्यासाठी धोतर घालत होतो, त्यामुळे मी उड्या मारत होतो की काय माहित नाही पण कावळे सरांनी त्या वेळेस खूप मारलं होतं. एवढे का मारले कळलच नाही?? त्यांनी माझ्यावर कुठला राग काढला हे ही कळलं नाही? त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक भीती बसली ती कायमचीच.



मला आठवतय श्रीकांत तांबारे सर आम्हाला सातवी ला विज्ञान शिकवायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत खरंच खूप वेगळी होती एका टेस्टमध्ये वर्गांमध्ये मी कधी नाही तो विज्ञान मध्ये प्रथम आलो होतो.. मी तसा अवरेज विद्यार्थी, मला मार्क्स कमी ही नाही आणि जास्तही नाही मध्येच असायचे.

पण विज्ञान मध्ये मी प्रथमच यायचो. हे असे कसे काय घडले कारण श्रीकांत सरांचे सर्व विद्यार्थ्यांना विषय असलेली अस्ता व शिकवण्याची पद्धत. ते कधीच कोणत्या विद्यार्थ्याला कमी लेखायचे नाहीत.. मला आठवतंय ते सहसा पुस्तक नसतानाच शिकवायचे व पुस्तका व्यतिरिक्त बरच काही सांगायचे.. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्या विषयाची असलेली आवड निर्माण होत असे. पुस्तका व्यतिरिक्त म्हणजे काय माणसाच्या शरीरात रक्त किती लिटर असतं. एका मिनिटात हार्टबीट  किती असतात. माणसाच्या शरीरात हाडे किती असतात .कुठल्या शरीरावर केस नसतात. असे अनेक प्रश्न विचारून ते आम्हाला कुतूहल निर्माण करायचे. मला आठवतंय त्यांनी आम्हाला कधी कडक शिक्षा केली असं कधीच घडलं नाही.. ते आम्हाला चुका समजावून सांगायचे.. त्यामुळेच कि काय ते आमच्या वर्गाचे आवडते शिक्षक होते.जेव्हा मी विज्ञान मध्ये प्रथम यायचं तेव्हा मला कळले मी पण हुशार विद्यार्थी आहे..

हे केव्हा घडतं एखादा अवरेज विद्यार्थी चांगले मार्च केव्हा घेतो.

जेव्हा त्याला त्या विषयांमध्ये अभ्यास करण्याची आवड निर्माण होते व हे केव्हा होते एखादा शिक्षक त्याविषयी कुतूहल निर्माण करून शिकवतात..

खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचे महत्त्व खूप आहे आपण जे आहोत ते  शिक्षकां मुळेच..


बुद्धी की सर्वांना सारखे असते पण त्या बुद्धीचा कशा पद्धतीने वापर करावा हे शिक्षकच शिकू शकतात. आणि ही कला काहीच शिक्षकाकडे असते.. 


पण मला माझ्या शाळेमध्ये मिळालेली सर्वाच शिक्षक ही आदर्श शिक्षक होती व आहेत..


अशा माझ्या सर्व गुरुजन वर्ग यांना मानाचा मुजरा ज्यामुळे मी आज घडलो आहे..👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


ते म्हणतात ना गुरु म्हणजे


*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः*



                       मुकुंद काळे..

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदोरा, तालुका -कळंब जिल्हा -उस्मानाबाद*

No comments:

Post a Comment