कोरोना, कॅन्सर आणि आयुर्वेद
कोरोना, कॅन्सर आणि आयुर्वेद
आपण सर्व कोरोना नामक आजाराला तोंड देत आहोत. जगभरात या आजाराने थैमान घातले आहे आणि आपला भारत देशही त्याला अपवाद नाही. भारतात जवळपास सव्वा दोन लाख रुग्ण कोरोना बाधित आहेत आणि चिंताजनक रित्या दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.
देशभरामध्ये दरवर्षी लाखो रुग्ण या विविध प्रकारच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात आणि लाखो नवीन रुग्णाना कॅन्सर चे निदान होते. यातही भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये तंबाखूजन्य कॅन्सरचे प्रमाण भयावह रित्या वाढतच आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग होतो. त्याच बरोबर अन्ननलिकेचा, जठराचा, मोठ्या आतड्यांचा, गुदाचा, यकृताचा, रक्ताचा कर्करोग असे विविध प्रकार भारतात आढळतात.
स्त्रीविशिष्ट अवयवांच्या विचार केला तर 'स्तनांचा कर्करोग' हा एकूण कर्क रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणे आढळतो. अन्य अवयवांचे म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि बीज ग्रंथीचा कर्करोगही मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
या सर्व पार्श्वभूमीवर कॅन्सर रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण कॅन्सर या आजारामुळे किंवा किमोथेरपी, रेडिओथेरपी आदि चिकित्सा यांचा शरीरावर घडलेल्या परिणामांमुळे एकूणच कॅन्सर रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. आणि कोरोना या आजाराची आतापर्यंतची वाटचाल लक्षात घेता, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणाऱ्या व्यक्ती यातून चांगल्या पद्धतीने बऱ्या झालेल्या आहेत किंवा त्यांना अजूनपर्यंत बाधा झालेली नाही. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, आहार-विहार यांचे नियोजन, मानस स्वास्थ्य जपणे आणि रसायन चिकित्सा यांचा विचार केलेला आहे.
१. आहारामध्ये देशी गायीचे दूध देशी गायीचे तूप यांचा समावेश असावा.
२. जेवण ताजे, सकस असावे.
३. फळ भाज्यांचा आहारात समावेश नेहमी असावा.
यामध्ये पडवळ, दोडका, घोसाळे, कारले, भेंडी, दुधी भोपळा, लाल भोपळा या भाज्या असाव्यात.
४. जेवणामध्ये आवडीनुसार हळद, सुंठ, जिरे, धने आदि मसाल्यांच्या पदार्थांचा समावेश असावा.
५. गव्हाचा फुलका किंवा पोळी, ज्वारी, बाजरी यांच्या भाकरी चालतील.
६. जेवणाची वेळ नियमित असावी.
७. शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ कटाक्षाने टाळावे.
८. सध्या पावसाळा असल्यामुळे एकूणच भूक कमी असते, त्यामुळे भुकेच्या प्रमाणातच जेवण करावे.
९. पावसाळा असल्यामुळे पालेभाज्या टाळाव्यात.
◆विहाराचा विचार करता कोरोना आणि पावसाळा या पार्श्वभूमीवर ज्यांना शक्य आहे त्यांनी घरातच व्यायाम करावा.
◆व्यायाम देखील सहजसोपी योगासने, पूरक हालचाली, दीर्घश्वसन यांचा समावेश असावा.
◆ पावसाळ्यातील गारठा यापासून शरीराचे संरक्षण करावे. ◆दिवसा झोप, रात्री जागरण टाळावे.
★ या आजारामध्ये माणस स्वास्थ्य जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी ओंकार, ध्यान, दीर्घश्वसन किंवा इष्ट देवतेचे चिंतन करावे.
सध्या आवश्यक बाबी म्हणजे मास्क वापरणे, शरीराची वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळायला हव्यात.
आयुर्वेदामध्ये कॅन्सर रुग्णांना 'रसायन चिकित्सा' अत्यंत उपयुक्त आहे. रुग्णाचे वय, कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे, अग्नि, यांचा विचार करून विविध रसायनांचा वापर करता येऊ शकतो. ही रसायन औषधे व्याधी क्षमता चांगली करणारी असतात, रुग्णाचे बल वाढवणारे असतात, भूक वाढवणारी असतात, त्वचेची कांती, वर्ण वाढवणारी असतात आणि आयुर्वेदात वर्णन केलेले शरीरातील सात धातू - त्या सर्वांना बलवान करणारी असतात. याचे उदाहरण म्हणजे सर्वांचे परिचित असलेल्या च्यवनप्राश अवलेह.
ह्याच बरोबर अन्य रसायन औषधे देखील आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्याने चालू करणे हितावह ठरते. ही औषधे आयुर्वेदीय पद्धतीने शरीराचा विचार करून, कॅन्सर कुठल्या अवयवाचा आहे याचा विचार करून वेगवेगळी असतात.
कॅन्सर रुग्णांमध्ये असलेली पुढची चिंताजनक बाब म्हणजे अन्य अवयवांमध्ये कॅन्सर पसरणे (Metastasis). जेव्हा धातूंचे बल चांगले असते, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तेव्हा या Metastasis ला प्रतिबंध होण्यास मदत होते
No comments:
Post a Comment