Sunday, 21 June 2020

नागिन ...आयुर्वेदाचे दृष्टीकोन ....

आजच्या कलियुगात आणि आधुनिक काळातही अगदी सुशिक्षित व्यक्तीही अनेक भ्रामक कथांना बळी पडत असतात. नागीण या रोगाबद्दलही अशाच अनेक कल्पना आहेत. हा विकार कितीही भयंकर असला, तरी योग्य व वेळीच केलेल्या उपचारांनी तो निश्चितच पूर्ण बरा होतो, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. आयुर्वेदात 'कक्षा', 'विसर्प', 'अग्निरोहिणी' अशा नावांनी उल्लेख असलेल्या या विकाराला आपण नागीण, धावरे या नावाने ओळखतो.


* कारणेः

नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढविणार्‍या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरणे, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग हे नागीण होण्यास कारणीभूत असतात.

* स्थानेः

डोक्यात, भुवईपासून कपाळावर, कानापासून मानेवर, छातीपासून पाठीवर, पोटापासून पाठीवर, खांद्यापासून हातावर किंवा कंबरेपासून पावलापर्यंत, स्त्री व पुरूषांच्या जननेंद्रियांवर

* उपचारः

नागिणीत वेदना, खाज किंवा आग असली तरी प्रमुख चिकित्सा ही पित्तशामक अशीच करावी लागते.

पेशंटची तपासणी करून पोटात कामदुधा, गुळवेल सत्त्व, शंखजीरे, गुलकंद, तुळशीचे बी, धने-जिर्‍याचे पाणी, चंदनासव, सारीवाद्यासव यासारखे काढे, मौक्तिकयुक्त कामदुधा, चंदनादी वटी, चंद्रकला रस, संशमनी वटी यासारख्या गोळ्यांची योजना करून दिली जाते.

गाईचे १०० वेळा धुऊन शुद्ध केलेले तूप (शतधौतघृत), गेरूची शुद्ध केलेली पावडर आणि दुर्वांचा रस ही तीन औषधे बाहेरून लावण्यासाठी हमखास गुणकारी ठरतात.

जोडीला हिरवी मिरची, लसूण चटणी, लोणचे, गरम मसाला, आलं-लसूण- मिरची, तीळ-खोबरं, पंजाबी-चायनीज-चाट, शेंगदाणा-काजू यांसारखे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ बरे वाटेपर्यंत पूर्ण बंद करणे आवश्यक आहे.

पोट साफ ठेवणेही गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे पहिले आठ-दहा दिवस तरी संपूर्ण घरी राहणे आवश्यक आहे. नागीण काही प्रमाणात संसर्गजन्य आहे. नागीण झालेल्या पेशंटच्या संपर्कात लहान मुले आली तर त्यांना नागीण नाही, पण कांजिण्या येऊ शकतात. घरी राहून नागिणीची जागा जेवढी उघडी राहील तेवढे चांगले असते.

2 comments:

  1. यावर फक्त एकच उपाय::: BECLATE N हा मलम दिवसातुन फक्त दोनदा लावावा. दोन दिवसात फरक जाणवेल. सोबत vitamin B च्या दोन दिवस गैळ्या घ्या. इतर कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च करू नका.

    ReplyDelete