Saturday, 13 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन पॉजिटीव्ह  

भूम एक आणि परंडा दोन जणांना कोरोनाची बाधा  


उस्मानाबाद -  सलग दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात भूम   येथील एक आणि परंडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १४५ झाली आहे. पैकी १०५  बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३  जणांचे स्वॅब आज १३  जून रोजी लातूरला पाठवण्यात आले होते,पैकी  तीन पॉजिटीव्ह , ७०  निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण  भूम  आणि दुसरे दोन रुग्ण  हे  परांडा येथील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

 उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण १४५ 

एकूण बरे झालेले  रुग्ण -१०५ 

उपचार घेत असलेले रुग्ण - ३६ 

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ४

 तालुकानिहाय रुग्ण

  उस्मानाबाद - ५९

 कळंब- ३६ 

उमरगा - १६

 परंडा - १७ 

लोहारा -२ 

वाशी - 0 

तुळजापूर -१२ 

भूम -३


No comments:

Post a Comment