Saturday, 18 July 2020

Admission घेताना हे लक्षात ठेवा

फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......




अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला,


 नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या


 पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. 


पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे


 जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा. 


विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख,


 जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या


 पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव,


 स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये


 अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा. 


अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर


 माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा


 मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या. 


अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने


 पालन करा. 


इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड


 कॉपी बरोबर ठेवा. 


काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते.


 त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का


 हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण,


 करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात.


 अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.

 

बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या


 असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते


 पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या


 जवळ बाळगा. 


-----------------------------


काही महत्त्वाची संकेतस्थळे

 

1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन. 


(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल


 मॅनेजमेंट आदी) 


www.dte.org.in 


2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय,


 महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी) 


www.dmer.org


3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र


 शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी) 


www.dvet.gov.in


4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ 


www.unipune.ac.in


5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई 


आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी) 


www.iitb.ac.in 


6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)


 "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण  


www.aipmt.nic.in  


7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा


 आयोगय (यूपीएससी) 


www.upsc.gov.in


8) फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी


 www.pcfscs.in


👏👏

No comments:

Post a Comment