Wednesday, 1 July 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा पॉजिटीव्ह

कोरोना : १ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा पॉजिटीव्ह 


उस्मानाबाद -  उस्मानाबाद  जिल्ह्यातील सहा जणांचा कोरोना रिपोर्ट बुधवारी  पॉजिटीव्ह आला आहे. त्यात   उस्मानाबाद शहरातील  दोन,  तुळजापूर तालुक्यातील दोन, उमरगा तालुक्यातील एक आणि परंडा शहरातील एक असा समावेश आहे. आज  आज 1 जुलै ( बुधवार )  रोजी रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 107 नमुने  तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून सहा   पॉजिटीव्ह , 6 अनिर्णित 1 रिजेक्ट व  94 निगेटिव्ह असा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. पॉजिटीव्ह रुग्ण  उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागातील दोन, तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील दोन,परंडा शहरातील एक आणि उमरगा तालुक्यातील डिग्गी रोड येथील एक असा समावेश आहे. 

कोरोना अपडेट 

 एकूण  बाधित रुग्ण - 235  

बरे झालेले रुग्ण -  175

मृत्यू - 12  

ऍक्टिव्ह रुग्ण - 48  


No comments:

Post a Comment