Tuesday, 14 July 2020

उस्मानाबादेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोरोनाचा कहर : उस्मानाबादेत एका बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू
उस्मानाबाद -  शहरातील एका बँकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाने १८ बळी घेतले आहेत.
मूळ भूम तालुक्यातील पण उस्मानाबादेतील एका बँकेत काम करणाऱ्या एका  ५५ वर्षीय  कर्मचाऱ्यास ताप आल्याने ११ जुलै रोजी ऍडमिट करण्यात आले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता. उपचार सुरु असताना आज मृत्यू झाला.




No comments:

Post a Comment