कळंब : तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. आज दिवसभरात तब्बल
56 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात 56 रुग्ण अढळल्याने खळबळ
उडाली आहे. परवा म्हणजे मंगळवारी पाठवण्यात आलेल्या नामुन्यांपैकी 26 रुग्णांचा
अहवाल आज दुपारी प्राप्त झाला होता. कळंब शहर 7 येरमाळा 9, मस्सा 8, डिकसळ 2
असे 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आज गुरुवारी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे
रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आली त्यात नगराध्यक्षा त्यांचे पती आणि रजेवर असलेले
उपनगराध्यक्ष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, अशी माहिती डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
त्यानंतर आज 10 वाजता कालचे म्हणजेच बुधवारी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचे अहवाल
प्राप्त झाले आहे. त्यात आणखी 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत आहेत. या 27 जणांमध्ये
रत्नापुर 17, मस्सा 6, कण्हेरवाडी, इटकूर, दहीफळ, येरमाळा प्रत्येकी एक अशे पॉझिटिव्ह
आलेल्याची माहिती आहे. त्यापैकी इटकूर व्यतिरिक्त सर्वच जण पूर्वीच्या बधितांच्या
संपर्कातील असल्याची माहिती, डॉ. शिंदे यांनी दिली. तर इटकूर येथील रुग्णाला लक्षणं
जाणवत असल्याने टेस्ट करण्यात आली त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. परवाचे
प्राप्त झालेले 26, कालचे 27 तर आजचे 3 अँटीजन्स अशी एकूण दिवसभरात 56 अहवाल
पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत
Watch vdo
No comments:
Post a Comment