Sunday, 10 July 2022

जय जगन्नाथ जगन्नाथ पुरी

 भगवान श्रीकृष्णांनी देह सोडला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांचे संपूर्ण शरीर पंचभूतांमध्ये मिसळले होते, परंतु त्यांचे हृदय सामान्य जिवंत माणसासारखे धडधडत होते, श्री कृष्णाचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे, जे भगवान जगन्नाथाचे लाकडी मूर्तीत आहे. आणि ठोके ही सर्व माणसानं सारखेच आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. . . !

महाप्रभूंचे मोठे रहस्य सोन्याच्या झाडूने केली जाते स्वच्छता . . . !

महाप्रभू #जगन्नाथ (श्री कृष्ण) यांना कलियुगाचे भगवान देखील म्हटले जाते. जगन्नाथ स्वामी त्यांची बहीण #सुभद्रा आणि भाऊ #बलराम यांच्यासोबत पुरी (ओरिसा) येथे राहतात, परंतु रहस्य असे आहे की आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही . . . !

दर 12 वर्षांनी महाप्रभूंची मूर्ती बदलली जाते . . . !

अशावेळी संपूर्ण पुरी शहरात ब्लॅकआऊट असतो, म्हणजे संपूर्ण शहरातील दिवे बंद असतात, दिवे बंद केल्यानंतर मंदिर परिसराला CRPF ने वेढले असते, त्यावेळी कोणीही मंदिरात आत जाऊ शकत नाही . . . !

मंदिराच्या आत दाट अंधार आसतो, पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आसते, पुजाऱ्याला हातमोजे आसतात, तो जुन्या मूर्तीतील "ब्रह्म पदार्थ" काढून नवीन मूर्तीमध्ये घालतात. हा ब्रह्म पदार्थ काय आहे हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. ते आजपर्यंत कोणी पाहिलेले नाही. हजारो वर्षांपासून हे एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीकडे हस्तांतरित होत आहे . . . !

हा एक अलौकिक पदार्थ आहे, त्याला स्पर्श केल्याने माणसाच्या अंगाच्या चिंध्या उडून जातात. हा ब्रह्म पदार्थ भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. पण हे काय आहे, कुणालाच माहीत नाही, आषाढचे दोन महिने एकाच वर्षी येतात तेव्हा भगवान जगन्नाथ आणि इतर मूर्ती बदलल्या जातात. ही संधी 19 वर्षांनंतर आली आहे, काही वेळा 14 वर्षातही येते, या प्रसंगाला नव-कलेवर म्हणतात . . . !

पण आजपर्यंत एकही पुजारी सांगू शकला नाही की महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीत काय आहे . . . ?

काही पुजारी म्हणतात की जेव्हा आम्ही ते हातात घेतले तेव्हा ते हृदयासारखे उड्या मारत होते… डोळ्यावर पट्टी होती… आम्ही फक्त अनुभवू शकलो होतो . . . !

आजही जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने पुरीचा राजा स्वतः सोन्याच्या झाडूने झाडू मारायला येतो . . . !

भगवान जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारातून आतमध्ये पहिले पाऊल टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही, तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरातून बाहेर पडताच समुद्राचा आवाज येतो . . . !

तुम्ही बहुतेक मंदिरांच्या शिखरावर पक्षी बसलेले आणि उडताना पाहिले असतील, परंतु जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी जात नाही, #ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, दिवसाच्या कोणत्याही वेळी जगन्नाथ परमेश्वराच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली पडत नाही . . . !

भगवान जगन्नाथ मंदिराच्या 45 मजल्यावरील #ध्वज दररोज बदलला जातो, असे म्हणतात की एक दिवसही ध्वज न बदलल्यास 18 वर्षे मंदिर बंद राहील . . . !

त्याचप्रमाणे, भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक #सुदर्शन_चक्र देखील आहे, जे कोणत्याही दिशांनी पाहिल्यावर, तुमच्याकडे तोंड करून आहे असे भासते . . . !

भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात, #प्रसाद शिजवण्यासाठी 7 मातीची भांडी एकमेकांवर ठेवली जातात, जो लाकडाच्या #अग्नीने शिजवला जातो, त्यातील सर्वात वरती ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो . . . !

भगवान जगन्नाथ मंदिरात दररोज केला जाणारा प्रसाद भक्तांसाठी कधीच कमी पडत नाही, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, आपल्या #सनातन_हिंदू धर्मामध्ये . . . !

सनातन हिंदु धर्म की जय

श्री जगन्नाथ की जय

No comments:

Post a Comment