Wednesday, 27 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रुग्ण

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 

चार रुग्ण  

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 

आणखी चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

 आले आहेत. सायंकाळी सात जणांचे रिपोर्ट

 पॉजिटीव्ह आले, त्यात जुने 2 आणि आणि

 नवे पाच असे सात जण होते.  त्यामुळे 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित 

रुग्णाची संख्या आता ५२ झाली आहे.

     आता जे चार पॉजिटीव्ह रिपोर्ट आले

 आहेत, त्यात उमरगा शहरातील एक, लोहारा

 तालुक्यातील काटेचिंचोली येथील

 एक, वाशी   तालुक्यातील गोजवाडा 

येथील एक आणि उस्मानाबाद  

 तालुक्यातील धुता येथील एक असा 

समावेश आहे.

मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातून 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय

 विज्ञान संस्थेला एकूण 89 स्वाब  टेस्टसाठी 

 पाठवण्यात आले होते. त्यापैकी 82 अहवाल

 हे निगेटिव्ह आले आहेत तर ४  पॉजिटीव्ह

 आणि ३ प्रलंबित आहेत.  उस्मानाबाद

 जिल्ह्याने आता कोरोना मध्ये अर्धशतक 

मारले आहे.  सायंकाळी उस्मानाबाद

 जिल्ह्यात सात जणांचा कोरोना रिपोर्ट

 पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर 

तालुक्यातील कार्ला ३, लोहारा तालुक्यातील

 जेवळी  येथील २, उस्मानाबाद तालुक्यातील

  धुता येथील एक आणि उमरगा तालुक्यातील

 केसरजवळगा येथील एक असा समावेश आहे.


Tuesday, 26 May 2020

ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा -मुख्यमंत्री

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छतेची काळजी अत्यावश्यक

#ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय मोठ्या प्रमाणावर वापरा -

मुख्यमंत्र्यांच्या शिक्षण विभागास सुचना

मुंबई दि 26: @RajSarag शाळा सुरु झाल्यानंतर  विद्यार्थी व शिक्षक तसेच अन्य कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच शाळेत 

हात धुण्यासाठी जंतूनाशक  व स्वच्छतेच्या तर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिक्षण विभागाला दिले. आज एका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की यापुढील काळात ऑनलाईन व डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत. मुख्यमंत्री म्हणाले की, शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून शाळा वेगवेगळ्या सत्रात भरविणे, दर दिवशी एक वर्ग भरविणे असे पर्यायही अजमावून पाहण्यात येत आहे.

लोकप्रतिनिधी व सर्वांशी यासंदर्भात समन्वय राखावा, सर्वांचे विचार विचारात घ्यावेत.सर्वांना शिक्षण ही संकल्पना घेऊन आपण  पुढे जाऊ. संपूर्ण साक्षरतेचा विचार करू असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शिक्षणासाठी मोबाईल कंपन्यांचीही सहकार्य घेण्यात यावे. 

शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन करण्यात यावे.विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड द्यावे,  ऑनलाइन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा. टीव्ही चॅनल्सचा  यासाठी उपयोग करून घ्यावा व  यानिमित्ताने ऑनलाइन नेटवर्कही बळकट करून घ्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले. 

यावेळी बोलताना शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, प्रधान सचिव सौरभ विजय यांनी माहिती देतांना सांगितले की, बालभारतीने पीडीएफ स्वरूपात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. दीक्षा एपचा वापरही  वाढला असून व्हायरस वीर पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.  गुगल क्लास रूमचा तसेच रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओचा वापर करण्यात येणार आहे. शालेय पोषण आहार यासंदर्भात शाळांना स्वातंत्र्य देण्यात येत असून महाविद्यालये सुरू करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले.

DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE यांचे हे ट्विट आहे.

उस्मानाबादेत आणखी पाच रूग्ण कोरोना पाॅजिटीव, एकूण संख्या 43

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील आणखी पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात  परांडा कुकडगाव येथील तीन रुग्ण (मुंबई रिटर्न)  कळंब येथील
भाटशिरपूरा येथील एक
 (मुंबई रिटर्न )आणि उमरगा तालुक्यतील  बेडगा येथील एक रुग्ण असा समावेश आहे.आज दुपारीच तीन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटव्ह आलेला होता. आता त्यात पाच जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यत

 रुग्णाची संख्या ४३ झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण वाढले.

दि.26 मे.2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन
कोरोना रुग्ण वाढले.

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यतील
 आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मामाबाद शहरातील
पापनाश नगर मधील एक, कळंब तालुक्यातील
 शिराढोण
 येथील
 एक आणि उस्मानाबाद तालुक्यातील तेर
मधील एक जण आहे. उस्मानाबाद मधील
रुग्ण मुंबई रिटर्न ,तेर मधील रुग्ण पुणे रिटर्न
 तर शिरढोण
 मधील रुग्ण कोरोना बाधित
कुटुंबातील  आहे.;  उस्मानाबाद जिल्ह्यात
आता कोरोना बाधित रुग्णाची  संख्या ३८
झाली आहे.

 जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक
 25 मे 2020 रोजी लातूर येथील
प्रयोगशाळेत  पाठवलेल्या अहवाला मधील
प्रलंबित असलेल्या पाच अहवालांमधून तीन
 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून
दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी
 माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर
राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे..

पॉझिटिव्ह आलेल्या तीन व्यक्ती पैकी एक
उस्मानाबाद शहरातील पापनाश नगर चा
रुग्ण असून तो मुंबई येथून प्रवास करून
आलेला आहे. दुसरा तेर येथील रुग्ण असून
 तो पुणे येथून प्रवास करून आलेला आहे.
तर तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा कळंब 
तालुक्यातील शिराढोण येथील यापूर्वीच्या
 पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे,
 असे डॉक्टर सतीश आदरतराव व जिल्हा
शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले
 आहे.
पैकी आठ जणांना डिस्चार्ज  देण्यात आला
आहे.विशेष म्हणजे डिस्चार्ज  देण्यात आलेल्या
 एका महिलेचा रिपोर्ट पुन्हा पॉजिटीव्ह आला
आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० रुग्णावर
उपचार सुरु आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यत
सर्वाधिक रुग्ण उमरगा तर सर्वात कमी
 रुग्ण तुळजापूर तालुक्यात आहेत.  उमरगा - ८,
कळंब -८, परंडा -६, लोहारा- ५,
उस्मानाबाद - ५, वाशी -३, भूम - २,
तुळजापूर - १  अशी तालुकानिहाय संख्या आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची
संख्या वाढत चालल्याने चिंतेचे वातवरण
पसरले आहे.

Monday, 25 May 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४३)

दि. २६ मे २०२०  वार- मंगळवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!
 
       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/virus-warrior-marathi

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.
08033094243

*Story weaver*
दम - ए - दम बिर्याणी
https://bit.ly/2zulzEB

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : मिठाई
https://bit.ly/2ZAgntp

*चित्रकला*
संकल्प चित्र : पूर्वतयारी
https://bit.ly/2ZzRM8o

*Reading English*
Long words with sh/ch
https://bit.ly/2ATv6W5

*संगणक विज्ञान*
Scratch Animation Part 3
https://bit.ly/2Xk4Tre

*संगीत/नाटक*
गायन
राग - यमन
https://bit.ly/3ea1JgC

*मजेत शिकूया विज्ञान*
Game of Acid and Base
https://bit.ly/2ZBnLF0

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - गणित
पाठ - अंतराचे सूत्र
https://bit.ly/2XpGGjA

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - मराठी (व्याकरण)
घटक - लिंग व त्याचे प्रकार
https://bit.ly/2Xk59qc

*इयत्ता - ८ वी*
विषय - गणित
घटक - परिमेय संख्या व अपरिमेय संख्या
https://bit.ly/2XpGMHY

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Sunday, 24 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ कोरोना बाधित

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ६ कोरोना बाधित


उस्मानाबाद
- उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधितांची 
संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उस्मानाबाद 
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचि संख्या ६ ने वाढली आहे.
 आज उमरगा येथे ३ परंडा येथे १ तर जिल्हा शासकीय
 रुग्णालय उस्मानाबाद येथे २ रुग्णांचे अहवाल 
होकारात्मक आले  असल्याची माहिती जिल्हा
 शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
 आज जिल्ह्यात एकूण ४७ रुग्णांचे अहवाल आले आहेत.
 त्यातील ३५ जणांचे नकारात्मक तर ६ जणांचे संदिग्ध 
तर ६ जणांचे होकारात्मक आले आहेत. 

Saturday, 23 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण पाॅझिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 
  • कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

शिरढोण येथील ३३ वर्षीय महिला 
आणि मुरूम येथे २३ वर्षीय तरुणाचा 
कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला 
असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक 
डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज जिल्ह्यात 
एकूण ४१ रुग्णांचे अहवाल आले. त्यातील दोघांचे
अहवाल होकारात्मक आले आहेत.तर ३४ जणांचे
 अहवाल नकारात्मक आहेत
 तर ४ जणांचे अहवाल
 प्रलंबित आहेत आणि चाचणीसाठी पाठवलेला एक नमुना रद्द
करण्यात आलेला आहे. मुरूम येथे नव्याने रुग्ण आढळल्याने
रेड झोन मध्ये वाढ होत आहे.

Friday, 22 May 2020

उस्मानाबाद- शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार कोरोना रुग्ण

शुक्रवारी दिवसभरात चार रुग्ण सापडले 
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. शुक्रवारी दुपारी वाशी तालुक्यातील पिंपळगावच्या पती-  पत्नीचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले होते, त्यानंतर रात्री उशिरा दोन जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात पाथर्डी (ता. कळंब) आणि कुकडगाव ( ता. परंडा) येथील रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील  10 व्यक्तींचे  अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 7 व्यक्तींचे अहवाल  अनिर्णित (Inconclusive) आले असून एका व्यक्तीचा अहवाल परिपूर्ण न आल्यामुळे  रद्द (reject)करण्यात  आला आहे.दोन पॉझिटिव्ह व्यक्तीपैकी एक कळंब तालुक्यातील पाथर्डी व दुसरी व्यक्ती परंडा तालुक्यातील कुकडगाव येथील आहे.विशेष म्हणजे आजच  पाथर्डी येथील दाम्पत्याने कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, पण याच गावात पुन्हा नवा रुग्ण सापडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  कोरोना रुग्णाची संख्या २८ झाली आहे. पैकी सहा जण बरे झाले असून, २२ जणांवर उपचार सुरु आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्णांची वाढ सुरूच

 उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सहाची भर

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी मध्यरात्री सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत. त्यात परंडा १, वाशी १, लोहारा तालुक्यातील जेवळी ४ असा समावेश आहे.

 गुरुवारी सकाळी शिराढोण  येथील एक महिला आढळून आली होती मात्र ती महिला लातूर येथे उपचार घेत आहे. तर उमरगा येथे दुपारी एका महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आला होता.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी १७ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले असून, पैकी चार  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्यस्थितीत १९ रुग्ण आहेत.
उस्मानाबादेतील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

उस्मानाबाद शहरात धारासूर मर्दिनी रोड भागातील एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती, दरम्यान या तरुणाच्या संपर्कातील १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात एकूण 13 कोविड पॉझिटिव्ह  रुग्णावर उपचार 
 जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 982 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 220, लोहारा 76, कळंब 166, वाशी 18, भूम 41, परंडा 85 अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 840 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 34 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 92 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.
 आज दि.21/05/2020 पर्यंत एकुण 17 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हात आढळुन आले त्यापैकि 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे त्यांना रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले (उमरगा 3 व परंडा 1 ) सदयस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 13 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैदयकिय महाविदयाल सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे  तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4,  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे 1 असे एकुण 13 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत सदया त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

Tuesday, 19 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्याची रेड झोनकडे वाटचाल


उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात आज कोरोना रुग्णाच्या संख्येत एकदम  सहाने वाढ झाली असून एकूण संख्या १३ झाली आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरात एक रुग्ण आढळून आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची वाटचाल रेड झोन कडे सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे यापूर्वी सात रुग्ण होते. त्यात  19 मे रोजी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट मध्ये सहा जणांचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. मुंबई पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत , या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारनटाईन केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा एक मुलगा , उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तुळजापूरची 1 महिला यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  विशेष म्हणजे वरीलपैकी तुळजापूरची महिला पुण्यावरून आली असून इतर सगळेजण हे मुबंई वरून आलेले आहेत.उस्मानाबाद जिल्हयात आल्यानंतर वरील सर्व 6 जणांना क्वारंटाईन केले होते.


उस्मानाबाद शहरातील धारासुर मर्दिनी देवी रोड भागात असलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली असून तो तरुण मुंबई येथून सोलापूर पर्यंत खासगी जीपने त्याच्या आईसह 5 जणसोबत आला व त्यानंतर सोलापूरहुन 20 किमी पायी चालत हे आई व मुलगा उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आले व नंतर त्याचा भाऊ त्यांना दुचाकीवर उस्मानाबाद शहरात घेऊन आला. या रुगणाला अगोदर पासूनच ब्लड कॅन्सर असून त्यात कोरोना ही बाब चिंताजनक आहे. या तरुणाच्या घरी 12 जण असून इतर 7 असे 19 जण हायरिस्क संपर्कात आहेत.

तुळजापूर शहरातील 21 वर्षीय महिला ही पुणे येथून आली असून ती 6 महिन्याची गरोदर माता आहे त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, भोसले गल्लीत राहणाऱ्या या महिलेच्या संपर्कात 12 जण आले आहेत. भूम येथील 13 वर्षीय मुलगा हा मुंबई येथून आला असून त्याची बहीण मुंबई येथे पॉझिटिव्ह सापडली असून आई नर्स आहे. हा मुलगा वडिलांसोबत गावी आला असून त्याला शाळेत ठेवण्यात आले होते, याच्या संपर्कात 2 जण आहेत अशी माहिती गलांडे यांनी दिली.
परंडा तालुक्यातील 2 रुग्ण हे भूम तालुक्यातील रुग्णाच्या सोबत प्रवास करून आले होते त्यांच्या संपर्कातील 7 जण हायरिस्क आहेत.लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्ण कांदिवली मुंबई येथून आला असून त्याच्या संपर्कात 6 जण आले आहेत. या सर्व 6 रुग्णावर उपचार करण्यात येणार असून संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. कळंब येथील महसूल विभागाच्या कर्मचारी असलेल्या रुग्णाला अगोदरच किडनीचा त्रास असल्याने त्याची स्तिथी चिंताजनक बनली आहे.

Monday, 18 May 2020

अकलुजचा किल्ला व शिवसृष्टी

⛳ 🏰   *गडवाट*   🏰 ⛳

🗡️ *अकलूजचा किल्ला* 🗡️

*"अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे.*

 किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत.

तिकीट काढून किल्ल्यात शिरताना प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची म्युरल्स्‌ पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स्‌ व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स्‌ मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्‍यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.

किल्ल्याच्या मधोमध असणार्‍या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूस शेकोटी पेटवून पहार्‍यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.

किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इ समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.

किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.
"

Friday, 15 May 2020

शाळा बंद.....शिक्षण चालू

दि. १६ मे २०२०  वार- शनिवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-३३)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.
      आपण या अभ्यासमालेत *कोरोना योद्धा* ही एक  लिंक देत आहोत. या  लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे *कोरोना योद्धा* पुस्तक!
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही *प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका* ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व  5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.
   
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/coronavirus-warrior

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.
08033094243

*Storyweaver*
जादव आणि जंगलं
https://bit.ly/2Z4VxSN

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : गहू
https://bit.ly/2X4LtH4

*चित्रकला*
यथार्थदर्शन
https://bit.ly/3fPjlQB

*स्पोकन इंग्लिश*
English Speaking Practice
https://bit.ly/2Z1cGNk

*संगणक विज्ञान*
थीम बदलणे
https://bit.ly/2Ta4S87

*संगीत/नाटक*
गायन -वादन
केहरवा तालावर आधारित गीत
https://bit.ly/3dS47bT

*मजेत शिकूया विज्ञान*
Vibrating Brush
https://bit.ly/2WZpnp9

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - प्रकाशाचे अपवर्तन
https://bit.ly/3dR9ND1

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका
https://bit.ly/2y3T7J4

*इयत्ता - ८ वी*
प्रथम भाषा व गणित प्रश्नपत्रिका
 https://bit.ly/2Z7gi0o

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Thursday, 14 May 2020

उस्मानाबाद -कळंब तालुक्यात तीन रूग्ण कोरोना पाॅजिटीव

उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 22  व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3  व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बीड  येथील 15 व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल(Inconclusive) आला असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  उस्मानाबाद येथील 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्याची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे.  असे एकुण 58 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51  व्यक्तींचे अहवाल  निगेटीव्ह आले असून 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.