Tuesday, 9 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात 14 पॉजिटीव्ह

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात 14 पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - गेले दोन दिवस खंड पडलेल्या कोरोना रुग्णात आज एकदम 14 जणांची भर पडली आहे. या बारा जणांमध्ये उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा, काकानगर भागातील 12 आणि नळदुर्ग ता. तुळजापूर येथील दोन जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 137 झाली आहे.जिल्हयात रुग्णाची संख्या अशी उस्मानाबाद जिल्ह्यात
आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण 137
एकूण बरे झालेले  रुग्ण -76

उपचार घेत असलेले रुग्ण 58

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3

तालुकानिहाय रुग्ण
उस्मानाबाद - 55
कळंब- 33
उमरगा - 16
परंडा - 11
लोहारा - 8
वाशी - 4
तुळजापूर 7
भूम - 3

सूर्यनमस्कार-प्रत्येकासाठी उत्तम व्यायाम

🙏सूर्यनमस्कार-प्रत्येकासाठी उत्तम व्यायाम 🙏

      ☀️१२ मिनिटात २८८ योगासने☀️


सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या  दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.



☀️सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.


एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.


☀️३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट


☀️३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:


☀️वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,


बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,

रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.


वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?

‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’

      कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा  वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.


इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.


सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?


🌞सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ


सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता 


‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.


सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा.  आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.


🌷 आरोग्यम् धनसंपदा  🌷

Sunday, 7 June 2020

जॉब अपडेट - ७ जुन/२०२०

जॉब अपडेट  - ७ जुन/२०२० 





  



https://t.co/KIf17cC67S


https://t.co/LbiRikbaB9


 मराठीनोकरी 


 https://t.co/kVK3qf0CZo

 

  https://t.co/N1z8oPaJFx

  

  https://t.co/XdwGOXYIcs


 https://t.co/pEWca224qe

 

https://t.co/d8QcKgkonj

 

https://t.co/DTaSsBsqZs

 


 

 https://t.co/Us2d4PY5R1

  

  https://t.co/nNf785TtYZ


 

https://t.co/OoLwxfd9y4


 


https://t.co/4LmlsLjgEQ

 #मराठीनोकरी 

  

जॉब अपडेट  - ७ जुन २०२०

#मराठीनोकरी 

@iamShantanu_D

 

https://t.co/RhaPcwscTp



https://t.co/MRJNH6DZu


 https://t.co/hgbJFMI076


 

 करोना काळात जर कोणाचा जॉब गेला असेल तर  काही आय.टी मधल्या ओपनिंग टाकत आहे. 

सविस्तर माहिती - जॉब स्किल वाचून Apply करा.सगळ्या पुण्यातील ओपनिंग आहेत.


टीप : सर्व लिंक व्यवस्थित पाहणे.

Saturday, 6 June 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रुग्णाची भर

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात सहा रुग्णाची भर 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात शिराढोण ता. कळंब येथील चार, उस्मानाबाद शहर १ आणि सास्तूर ता. लोहारा अश्या सहा रुग्णाचा समावेश आहे.

आज दिनांक 06/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 81 samples शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .

त्यापैकी सहा   पॉझिटिव्ह,1 रिजेक्ट  व 74 निगेटिव आले आहेत. 

पॉझिटिव पेशंट ची माहिती ---

चार  पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व एक  पेशंट हा उस्मानपुरा  उस्मानाबाद येथील असून  पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत.व  एक पेशंट सास्तूर येथील असून आठ दिवसापूर्वी  पुणे  येथून  आलेला  आहे. आज एकूण सहा  नवीन रुग्णाची  बाधितांमध्ये भर पडली  आहे.

 उस्मानाबाद जिल्ह्यात

 आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 122

एकूण बरे झालेले  रुग्ण - 56

उपचार घेत असलेले रुग्ण -63

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3 


शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांच्या जीवनावर* 🔊 आधारित प्रश्न मंजुषा

https://forms.gle/FwsjfjXFquS2qQSB7  👈
 🔊 *शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांच्या जीवनावर* 🔊 *आधारित प्रश्न मंजुषा*
🔊 *आयोजक*-जि.प.प्रा.शाळा *शेळका धानोरा* ता.कळंब         जि.उस्मानाबाद
 🔊 *निळ्या लिंकवर क्लिक करा.*
 🔊 *टेस्ट सोडवा.*
 🔊 *नांव, वर्ग, शाळा, मोबाईल क्रमांक लिहा.*
 🔊 *submit करा.*
 🔊 *view score वर क्लिक करा.आपले गुण व चुकलेली उत्तरे पहा.*

Friday, 5 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह ,एकूण रूग्ण 116

 उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह ,एकूण रूग्ण 116 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे आजपर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ११६ झाली आहे. पैकी ५६ रुग्ण बरे झाले आहेत. 


आज ५ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 जणांचे रिपोर्ट  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले  आहेत. 

त्यापैकी बारा  पॉझिटिव्ह,4 inconclusive  व 29 निगेटिव्ह आले आहेत. 

पॉजिटीव्ह रुग्ण असे 

आठ  पेशंट शिरढोण  ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व दोन पेशंट हासेगाव  ता. कळंब  येथील  पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील  आहेत. व दोन पेशंट ढोकी  ता  उस्मानाबाद  येथील  असून ते पुणे  रिटर्न  आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात 

आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ११६

एकूण बरे झालेले  रुग्ण - ५६

उपचार घेत असलेले रुग्ण -५७

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३  

Thursday, 4 June 2020

उस्मानाबाद जिल्हयाने शतक ओलांडले, आज दहा रूग्ण कोरोना पाॅजिटीव

कोरोना अपडेट उस्मानाबाद

आज दिनांक 04/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 74 नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .

त्यापैकी दहा पॉझिटिव्ह,एक inconclusive  व 63 निगेटिव आले आहेत. 


पॉझिटिव पेशंट ची माहिती ---

सात पेशंट काका नगर उस्मानाबाद येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत.

दोन पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील आहेत व एक पेशंट सोन्नेवाडी ता. भूम येथील असून दहा दिवसांपूर्वी घाटकोपर मुंबई येथून आलेली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 

सापडलेले कोरोना रुग्ण - 104

एकूण बरे झालेले  रुग्ण - 46

उपचार घेत असलेले रुग्ण - 55

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3

Wednesday, 3 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले 


उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद तालुका 4 कळंब तालुका 2 आणि उमरगा 1 अश्या सात रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 94  झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यातआले  आले होते, पैकी  ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर सात जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत, तर २ अहवाल Inconclusive तर २ अहवाल पेंडिंग आहेत. 

आज प्राप्त रिपोर्ट  पैकी एकूण  सात जण पॉसिटीव्ह आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण  उस्मानाबाद शहरातला पूर्वीचाच रुग्ण आहे ज्याचा स्वाब  पॉजिटीव्ह आला  आहे, म्हणजे नवीन  सहा रुग्णात भर पडली आहे. 

नवीन सहा रुग्ण  

एक रुग्ण केसरजवळगा ता. उमरगा येथील  येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. दुसरे दोन रुग्ण  अंदोरा ता. कळंब येथील असून ते 29 मे रोजी मुंबई रिटर्न आहेत. एक रुग्ण धुता येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण सुंभा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण कारी  येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. असे एकूण नवीन सहा रुग्ण व एक जुनाच रुग्ण  आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत

 सापडलेले कोरोना रुग्ण - 94 

एकूण बरे झालेले  रुग्ण - 41 

उपचार घेत असलेले रुग्ण - 50 

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3 


Tuesday, 2 June 2020

उस्मानाबाद दि.02/06/2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण वाढले

 उस्मानाबाद दि.02/06/2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण वाढले

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील 8, कळंब शहरातील 2 आणि कळंब तालुक्यातील शिरढोण येथील 1 अश्या 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 88 झाली आहे.

आज दि. 2 जून  रोजी 55 स्वाबचे रिपोर्ट  प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे  रिपोर्ट  पॉजिटीव्ह  आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेले आहेत. एक  जणांचा रिपोर्ट  inconclusive आला आहे.

पॉजिटीव्ह  पेशंटची  माहिती 

8 रुग्ण उस्मानपुरा, उस्मानाबाद  येथील असून ते नळदुर्ग  येथील पूर्वी पॉजिटीव्ह  आलेल्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. 

2 रुग्ण   कळंब  येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत  व  एक रुग्ण  शिराढोण येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी 77 रुग्ण होते, त्यापैकी 3 मयत झाले असून, 32 जण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आता 53 झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 88

एकूण बरे झालेले  रुग्ण - 32

उपचार घेत असलेले रुग्ण - 53

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3


Monday, 1 June 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्ण वाढले

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्ण वाढले 

एकूण रूग्ण-77


उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 77 झाली आहे. 


कोरोनाचा तिसरा बळी 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज  सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला   तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले  नाही.  

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले 

एकूण कोरोना रुग्ण - 77 

एकूण बरे झालेले  रुग्ण - 19  

उपचार घेत असलेले रुग्ण - 55 

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3 

उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी

उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी 

एकूण ७३ 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज  सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला   तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले  नाही. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  रविवारी दोन  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.  

उस्मानाबाद जिल्हयातील काल ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन  व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला आहे. आणखी  दहा  अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज  येणार आहे, त्यामुळे आणखी धाकधूक वाढली आहे.  


Sunday, 31 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले,

एकूण ७३
आणखी दहा अहवाल प्रलंबित , चिंता वाढली


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  रविवारी दोन  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात नळदुर्ग शहरातील  एक ५० वर्षांचा  एक पुरुष आणि सुंभा ता. उस्मानाबाद येथील ५३ वर्षांचा एक पुरुष आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन  व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला आहे. आणखी  दहा  अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज रात्री उशिरा किंवा उद्या येणार आहेत. 

Saturday, 30 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात ,एकूण 71

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात 


 आज सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील
कोरोना रुग्णाची संख्या आता ७१ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात कळंब शहरातील
 पाच ( मुंबई  रिटर्न ), शिराढोण ( ता. कळंब )
येथील  एक आणि बेडगा ( ता. उमरगा ) येथील एक
असा समावेश आहे.  शिराढोण  आणि बेडगा रुग्ण
अगोदरच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील 52 व्यक्तींचे स्वॅब
तपासणीसाठी आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे
अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल
 पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा  अहवाल
Inconclusive आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना
रुग्ण - ७१ एकूण बरे झालेले  रुग्ण - १५उपचार घेत
असलेले रुग्ण - ५४ एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - २