नवरात्र 2022 नवरात्रीचे नऊ रंग
सर्व मंगल मांगल्ये।
शिवे सर्वार्थ साधिके ।।
शरण्ये त्र्यंबके गौरी ।
नारायणी नमोस्तुते ।।
नवरात्र 2022 नवरात्रीचे नऊ रंग
सर्व मंगल मांगल्ये।
शिवे सर्वार्थ साधिके ।।
शरण्ये त्र्यंबके गौरी ।
नारायणी नमोस्तुते ।।
1.शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. सोमवारी पांढरा रंग शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा म्हणजे. श्वेत रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंग धारण केल्याने आत्मविश्वाव वाढतो.
2. नवरात्र द्वितीया तिथी (लाल) (Red)
नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी मंगळवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे.
3. नवरात्र तृतीया तिथी (नारंगी) (Orange)
शारदीय नवरात्रौत्सावाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर हा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. बुधवारी चंद्रघंटा देवीला नारंगी रंगाचं वस्त्र अर्पण केलं जाईल. नारंगी रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रतिक आहे.
4. नवरात्र चतुर्थी तिथी (पिवळा) (Yellow)
नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी 29 सप्टेंबरला कुष्मांडा देवीची रूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचं प्रतिक आहे.
5. नवरात्र पंचमी तिथी (हिरवा) (Green)
शारदीय नवरात्रौत्सावाच्या पाचवा दिवस 30 सप्टेंबरला आहे. या दिवशी स्कंदमातेची आराधना केली जाईल. देवी स्कंदमातेला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग निसर्गाचं प्रतिक आहे. हिरवा धारण केल्यानं चैतन्यामध्ये वृद्धी होते.
6. नवरात्र षष्ठी तिथी (राखाडी) (Grey)
नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी 1 ऑक्टोबरला कात्यानी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी देवीला राखाडी रंगाचं वस्त्र चढवलं जाईल. राखाडी रंग बुद्धिमत्तेचं प्रतिक आहे.
7. नवरात्र सप्तमी तिथी (निळा) (Blue)
शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते. 2 ऑक्टोबरला सप्तमीच्या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. आकाश आणि पाण्याचा निळा रंग हा विश्वासाचं प्रतिक आहे.
8. नवरात्र अष्टमी तिथी (जांभळा) (Purple/Violet)
नवरात्रौत्सवाच्या आठव्या दिवशी अष्टमी 3 ऑक्टोबरला सोमवारी आहे. यादिवशी महागौरीची आराधना केली जाईल. या दिवशी जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचं प्रतिक आहे. या दिवशी कन्यापूजेचा मुहूर्त आहे.
9. नवरात्र नवमी तिथी (गुलाबी) (Pink)
शारदीय नवरात्रौत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. 4 ऑक्टोबरला नवमी दिवशी गुलाबी रंग शुभ आहे. गुलाबी रंग प्रेमाचं आणि स्त्री शक्तीचं प्रतिक आहे.
तुळशीला एकादशी व रविवारी पाणी का घालू नये संपूर्ण माहिती
एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी का घालू नये म्हणजेच तुळशीला जल अर्पण का करू नये आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकादशी हे व्रत फार प्रमाणात केलं जातं त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई या देवस्थानामुळे आणि वारकरी संप्रदायामुळे एकादशी ही फार मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत केल जातात
तर एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी का घालू नये याविषयीची माहिती सांगणार आहे हिंदू धर्मात तुळशीचे वनस्पती किती महत्त्वाची आहे आयुर्वेदिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या आणि हिंदूं शास्त्र नुसार ज्या घरात तुळशी आहे त्या घराला कधीही वाईट नजर लागत नाही आणि जे तुळशीची सेवा करतात त्यांना प्रकारचा आनंद प्राप्त होतो अशी ही वनस्पती आपल्या घरातील जीवनातील नकारात्मक ऊर्जा अडथळे दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते
त्यामुळे पूर्वीपासून फार पूर्वीपासून आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावलेला असतं आणि त्याला विशेष करून स्त्रिया जल अर्पण करत असतात त्याची पूजा करत असतात आणि त्याला प्रदक्षिणा मारत असतात आणि शुद्धतेने तुळशीची पूजा करतो आणि तुळशीच्या रूपाची सेवा करतो त्याच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि धनच येत नाही तर त्याचे सौभाग्य देखील वाढते आणि इतकेच नाही ज्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि त्या घरात कधीही कोणत्याही प्रकारचे भांडण होत नाही
म्हणून फार पूर्वीपासून प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन हे असायचं आणि अजून सुद्धा आहे आणि त्याला या स्त्रिया घरातील स्त्रिया सकाळ संध्याकाळची पूजा करून जल अर्पण करतात आणि त्या तुळशी मातीला प्रदक्षिणा घालत असतात आणि तो ऑक्सिजन आपल्या घरातील स्त्रियांना भरपूर प्रमाणात मिळावा म्हणून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आपल्या ऋषीमुनी ंनी हिंदू धर्मातील विद्वान विद्वान लोकांनी केलेली आहे
त्यामुळे बहुतेक घरामध्ये तुळशीच्या रोपाला महत्त्वाचे स्थान दिले जाते तिला रोज पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो पाणी अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येथे आणि भगवान विष्णूंची कृपा कुटुंबावर सदैव राहते असे असूनही रविवारी आणि एकादशी तिथीला तुळशीला पाणी अर्पण का करू नये हे सांगणार आहे
पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते परंतु रविवारी आणि एकादशी तिथीला पाणी अर्पण करणे आता तुम्ही विचार करत असाल की असे का चला तर मग आज आपण जाणून घेऊया की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी का अर्पण करत नाही त्यामुळे रविवारी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही
रविवारी तुळशीला पाणी अर्पण करणे वर्ज्य मानले जात असले तरी रोज जल अर्पण करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार असे सांगितले आहे की भगवान विष्णूला रविवार खूप प्रिय आहे तुळशीला विष्णू प्रिया हरिप्रिया असे म्हटले जाते रविवारी तुळशी भगवान विष्णूंचे तप करतात त्यांच्या कुठल्याही प्रकारचे विघ्न पडू म्हणून रविवारी तुळशीला पाणी घालू नये
तपश्चर्य भंग पडली तर तुळशी देवी रागावते आणि नंतर त्याचे वाईट परिणाम भोगाव लागतात म्हणून तुळशीला रविवारी पाणी अर्पण करू नये तुळशीला पाणी अर्पण केल्यास माता तुळशी व्रत मोडते त्यामुळे भगवान विष्णूची कृपा ही मिळत नाही असे मानले जाते रविवारी तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण केल्याने जीवनात नकारात्मक शक्तीचा वास निर्माण होतो
असे केल्याने घरात संकटे वाढण्याची आणि सुख-समृद्धी कमतरता होण्याची शक्यता असते म्हणून तुळशीला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले गेलेले आहे त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करणे का वर्ज्य मानले गेले आहे ते आपण आता पाहूया मान्यता नुसार माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम या रूपाशी झालेल्या होता यासाठी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह थाटामाटात आयोजित केला जातो
माता तुळशी भगवान विष्णूंच्यासाठी निर्जन उपवास करत असते म्हणजे त्यावेळेस तुळशी मातेचा उपवास असतो एकादशीला त्यामुळे तुळशीला जल अर्पण केल्याने त्यांच्या व्रतामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे माता तुळशी आणि भगवान विष्णू भगवान विष्णू आणि भगवान शालिग्राम यांच्या आशीर्वाद ही कुटुंबाला मिळत नाही
त्यामुळे तुळशीचे हिरवे रोप सुकायला लागले तसेच कुटुंबात सुख-समृद्धी कमतरता निर्माण होते त्यामुळे तुळशीला तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा रविवारी जल अर्पण करू नये तुळशी माता हे विष्णूंच्या साठी हे निर्जल उपवास करत असतात एकादशीच्या दिवशी आणि रविवारी आपण तुळशीला जल अर्पण करू नये
भगवान श्रीकृष्णांनी देह सोडला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांचे संपूर्ण शरीर पंचभूतांमध्ये मिसळले होते, परंतु त्यांचे हृदय सामान्य जिवंत माणसासारखे धडधडत होते, श्री कृष्णाचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे, जे भगवान जगन्नाथाचे लाकडी मूर्तीत आहे. आणि ठोके ही सर्व माणसानं सारखेच आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. . . !
महाप्रभूंचे मोठे रहस्य सोन्याच्या झाडूने केली जाते स्वच्छता . . . !
महाप्रभू #जगन्नाथ (श्री कृष्ण) यांना कलियुगाचे भगवान देखील म्हटले जाते. जगन्नाथ स्वामी त्यांची बहीण #सुभद्रा आणि भाऊ #बलराम यांच्यासोबत पुरी (ओरिसा) येथे राहतात, परंतु रहस्य असे आहे की आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही . . . !
दर 12 वर्षांनी महाप्रभूंची मूर्ती बदलली जाते . . . !
अशावेळी संपूर्ण पुरी शहरात ब्लॅकआऊट असतो, म्हणजे संपूर्ण शहरातील दिवे बंद असतात, दिवे बंद केल्यानंतर मंदिर परिसराला CRPF ने वेढले असते, त्यावेळी कोणीही मंदिरात आत जाऊ शकत नाही . . . !
मंदिराच्या आत दाट अंधार आसतो, पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आसते, पुजाऱ्याला हातमोजे आसतात, तो जुन्या मूर्तीतील "ब्रह्म पदार्थ" काढून नवीन मूर्तीमध्ये घालतात. हा ब्रह्म पदार्थ काय आहे हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. ते आजपर्यंत कोणी पाहिलेले नाही. हजारो वर्षांपासून हे एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीकडे हस्तांतरित होत आहे . . . !
हा एक अलौकिक पदार्थ आहे, त्याला स्पर्श केल्याने माणसाच्या अंगाच्या चिंध्या उडून जातात. हा ब्रह्म पदार्थ भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. पण हे काय आहे, कुणालाच माहीत नाही, आषाढचे दोन महिने एकाच वर्षी येतात तेव्हा भगवान जगन्नाथ आणि इतर मूर्ती बदलल्या जातात. ही संधी 19 वर्षांनंतर आली आहे, काही वेळा 14 वर्षातही येते, या प्रसंगाला नव-कलेवर म्हणतात . . . !
पण आजपर्यंत एकही पुजारी सांगू शकला नाही की महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीत काय आहे . . . ?
काही पुजारी म्हणतात की जेव्हा आम्ही ते हातात घेतले तेव्हा ते हृदयासारखे उड्या मारत होते… डोळ्यावर पट्टी होती… आम्ही फक्त अनुभवू शकलो होतो . . . !
आजही जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने पुरीचा राजा स्वतः सोन्याच्या झाडूने झाडू मारायला येतो . . . !
भगवान जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारातून आतमध्ये पहिले पाऊल टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही, तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरातून बाहेर पडताच समुद्राचा आवाज येतो . . . !
तुम्ही बहुतेक मंदिरांच्या शिखरावर पक्षी बसलेले आणि उडताना पाहिले असतील, परंतु जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी जात नाही, #ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, दिवसाच्या कोणत्याही वेळी जगन्नाथ परमेश्वराच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली पडत नाही . . . !
भगवान जगन्नाथ मंदिराच्या 45 मजल्यावरील #ध्वज दररोज बदलला जातो, असे म्हणतात की एक दिवसही ध्वज न बदलल्यास 18 वर्षे मंदिर बंद राहील . . . !
त्याचप्रमाणे, भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक #सुदर्शन_चक्र देखील आहे, जे कोणत्याही दिशांनी पाहिल्यावर, तुमच्याकडे तोंड करून आहे असे भासते . . . !
भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात, #प्रसाद शिजवण्यासाठी 7 मातीची भांडी एकमेकांवर ठेवली जातात, जो लाकडाच्या #अग्नीने शिजवला जातो, त्यातील सर्वात वरती ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो . . . !
भगवान जगन्नाथ मंदिरात दररोज केला जाणारा प्रसाद भक्तांसाठी कधीच कमी पडत नाही, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, आपल्या #सनातन_हिंदू धर्मामध्ये . . . !
सनातन हिंदु धर्म की जय
श्री जगन्नाथ की जय