Thursday, 10 November 2022

लोणार सरोवर व राम मंदिर

 लोणार सरोवराच्या बाजूचे विस्मयकारी रामाचे मंदीर...




लोणार सरोवराच्या पाण्यापाशी जाताना उंचावरून एका पायवाटेने खाली उतरत यावं लागतं... हा रस्ता नागमोडी वळणाचा आणि जंगलातून जाणारा आहे...याचं पायवाटेवर जरासं आडवाटने बाजूला काही अंतर चालतं गेलं की डाव्या बाजूला थोडंसं उंचावर हे एक अदभूत आणि खास वैशिष्ट्यपूर्ण असे श्रीरामाचे मंदिर आहे...मोडतोड आणि अत्यंत दुर्लक्षित झालेलं हे मंदिर अजूनही त्याच्या पुराणकालीन वैभवशाली श्रीमंतीची साक्ष देत उभे आहे...


या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात फक्त श्रीरामाची मूर्ती आहे, सहसा श्रीराम यांची एकटी मूर्ती कधीही नसते... श्रीरामाच्या एका बाजूला बंधू लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला पत्नी सीता उभे असतात...अजून खास म्हणजे श्रीराम यांची ही मूर्ती निशस्त्र अवस्थेत आहे आणि हे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे...श्रीरामाच्या हातात कायम धनुष्यबाण दाखवले जाते जे या मूर्तीत नाही...


यामागे एक खास कारण आहे...श्रीराम वनवासात असताना येथे या सरोवराच्या बाजूला वास्तव्यास असताना त्यांचे वडील दशरथ यांचे निधन झाले... श्रीरामांनी आपल्या वडिलांचा दशक्रियाविधी येथून वीस किमी अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या काठी मेहकर येथे केला...तेथेच श्री बालाजी यांची खास मूर्ती आहे त्यावर मागच्या भागात लिहिले आहेच...


श्रीराम यांना आपल्या वडीलांचे पिंडदान करायचे होते आणि ते वनवासात असल्याने त्यासाठी अट अशी होती त्या विधीसाठी श्रीराम निशस्त्र असायला हवेत आणि त्यांच्याबरोबर कोणी स्वकीय असायला नको...हेच पिंडदान श्रीरामांनी या सरोवराच्या बाजूला केले आणि त्याचं ठिकाणी सध्याचे हे निशस्त्र श्रीरामाचे मंदिर आहे...


या मंदिरात एक अचंबित करणारी गोष्ट अशी या ठिकाणी तुम्ही गाभाऱ्यात मूर्तीच्या समोर उभे राहून हात जोडून नमस्कार करायला उभे राहिलात की तुम्हाला  श्रीरामांच्या मूर्तीच्या एका बाजुला लक्ष्मण आणि दुसऱ्या बाजूला सीता मातेचे दर्शन होते...हे खूपच आश्चर्यकारक आहे... त्यामागे एक खास कारण आहे...या मंदिरात सभामंडपात दगडी सुबक नक्षीकाम केलेले बारा खांब आहेत, जे एका विशिष्ट रचनेत मंदिरात बसवले गेले आहेत...चार मोठे खांब सभामंडपात मध्यभागी आणि चार छोटे खांब उजव्या बाजूला आणि चार डाव्या बाजूला...हे खांब अशा रितीने बसवले गेले आहेत की ज्यावेळी आपण मूर्ती समोर हात जोडून उभे असतो त्यावेळी प्रकाशाची किरणे विशिष्ट कोनातून परावर्तित होईन आपली स्वतःची सावली श्रीरामाच्या मूर्तीच्या बाजूला अशा प्रकारे पडते की आपल्याला त्या मूर्तीच्या एका बाजूला सीतामाता आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मण उभे आहेत हा भास निर्माण होतो...मी हे प्रत्यक्ष बघितल्यावर अंगावर रोमांच उभे राहिले...जरा विचार करा त्यावेळी आजच्या सारखे कॅलक्युलेटर , संगणक, दुर्बीण, होकायंत्र असे कोणतेही अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध नसताना हे त्यांनी कसे निर्माण केले असेल?...अहो एक दोन सेंटीमीटर जरी खांबांची लांबी, रुंदी, ठेवण बदलली तरी ही विस्मयकारी गोष्ट साकारणे केवळ अशक्य आहे...यावरून त्याकाळी विज्ञान किती प्रचंड ताकदीचे होते याची प्रचिती येते...


एवढंच नाही तर या मूर्तीच्या समोर उभे राहून तुम्ही आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ उभे नेऊन डावीकडे उजवीकडे बाय बाय केल्यासारखे हलवले तर श्रीरामांच्या मस्तकाच्या वर मागच्या भिंतीवर या आपल्या हातांच्या सात सात सावल्या पंखा घालत असल्यासारख्या हलताना दिसतात...हे दोन्ही प्रकार मी स्वतः प्रत्यक्ष अनुभवल्यावर माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला... असे अजूनही खास वैशिष्ट्य या मंदिरात आढळले...


यावरून जरा विचार करा की आपले पूर्वज किती विद्वान आणि प्रचंड कलात्मक होते...त्यावेळेसची पाषाण शिल्पकला किती अफाट होती... आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं हे भव्यदिव्य आहे,  पण काळाच्या ओघात अक्षरशः नेस्तनाबूत होत आहे...


अरे हो अजून एक खास बाब अशी या मंदिरात होकायंत्र काम करत नाही...तिथे मंदिरात विश्रांतीसाठी खाली जमिनीवर बसलो असताना होकायंत्र काढून वेगवेगळ्या दगडावर ठेऊन पाहिलं तर त्या होकायंत्राची सुई दक्षिण उत्तर दाखवत नाही...वेगवेगळ्या दगडावर होकायंत्र ठेवलं की ती सुई भरकटत जाते पण स्थिर दक्षिण उत्तर होत नाही...आहे की गमतीशीर?... अर्थात यामागे शास्त्रीय कारण आहे...


या मंदिराची सध्याची अवस्था पाहून मन विषण्ण झालं... इतकं मोठं वैभव आपल्याकडे आहे याचा खरोखरचं अभिमान वाटतो...



Wednesday, 19 October 2022

तुलसी की कथा

 🌺🌺🌺🌺​*तुलसी माता कौन थी?*🌺🌺🌺🌺


तुलसी(पौधा) पूर्व जन्म मे एक लड़की थी जिस का नाम वृंदा था, राक्षस कुल में उसका जन्म हुआ था बचपन से ही भगवान विष्णु की भक्त थी.बड़े ही प्रेम से भगवान की सेवा, पूजा किया करती थी.जब वह बड़ी हुई तो उनका विवाह राक्षस कुल में दानव राज जलंधर से हो गया। जलंधर समुद्र से उत्पन्न हुआ था.



वृंदा बड़ी ही पतिव्रता स्त्री थी सदा अपने पति की सेवा किया करती थी.


एक बार देवताओ और दानवों में युद्ध हुआ जब जलंधर युद्ध पर जाने लगे तो वृंदा ने कहा –


स्वामी आप युद्ध पर जा रहे है आप जब तक युद्ध में रहेगे में पूजा में बैठ कर आपकी जीत के लिये अनुष्ठान करुगी,और जब तक आप वापस नहीं आ जाते, मैं अपना संकल्प नही छोडूगी। जलंधर तो युद्ध में चले गये,और वृंदा व्रत का संकल्प लेकर पूजा में बैठ गयी, उनके व्रत के प्रभाव से देवता भी जलंधर को ना जीत सके, सारे देवता जब हारने लगे तो विष्णु जी के पास गये।

सबने भगवान से प्रार्थना की तो भगवान कहने लगे कि – वृंदा मेरी परम भक्त है में उसके साथ छल नहीं कर सकता ।


फिर देवता बोले – भगवान दूसरा कोई उपाय भी तो नहीं है अब आप ही हमारी मदद कर सकते है।

भगवान ने जलंधर का ही रूप रखा और वृंदा के महल में पँहुच गये जैसे ही वृंदा ने अपने पति को देखा, वे तुरंत पूजा मे से उठ गई और उनके चरणों को छू लिए,जैसे ही उनका संकल्प टूटा, युद्ध में देवताओ ने जलंधर को मार दिया और उसका सिर काट कर अलग कर दिया,उनका सिर वृंदा के महल में गिरा जब वृंदा ने देखा कि मेरे पति का सिर तो कटा पडा है तो फिर ये जो मेरे सामने खड़े है ये कौन है?


उन्होंने पूँछा – आप कौन हो जिसका स्पर्श मैने किया, तब भगवान अपने रूप में आ गये पर वे कुछ ना बोल सके,वृंदा सारी बात समझ गई, उन्होंने भगवान को श्राप दे दिया आप पत्थर के हो जाओ, और भगवान तुंरत पत्थर के हो गये।


सभी देवता हाहाकार करने लगे लक्ष्मी जी रोने लगे और प्रार्थना करने लगे यब वृंदा जी ने भगवान को वापस वैसा ही कर दिया और अपने पति का सिर लेकर वे सती हो गयी। उनकी राख से एक पौधा निकला तब भगवान विष्णु जी ने कहा –आज से इनका नाम तुलसी है, और मेरा एक रूप इस पत्थर के रूप में रहेगा जिसे शालिग्राम के नाम से तुलसी जी के साथ ही पूजा जायेगा और मैं


बिना तुलसी जी के भोग स्वीकार नहीं करुंगा। तब से तुलसी जी कि पूजा सभी करने लगे। और तुलसी जी का विवाह शालिग्राम जी के साथ कार्तिक मास में किया जाता है.देव-उठावनी एकादशी के दिन इसे तुलसी विवाह के रूप में मनाया जाता है .....!!


🙏🌺"जय श्री हरि विष्णु"🌺🙏

Wednesday, 28 September 2022

साडेतीन शक्तीपीठे

 #शक्तीच्या_विविध_स्वरूपांचे_महत्त्व_कायम_स्मरणात_राहावे म्हणूनच आपण #नवरात्र उत्सव साजरा करतो...! 🔱🌸🚩


#नवरात्रीचा  हा उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि सुदृढ आरोग्य घेऊन येवो हीच आदीशक्ती चरणी प्रार्थना...! 💐🙏🏻🔱🚩


प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्माचारिणी।

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्।।

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्म्रणव महात्मना।।


सर्वांना  #घटस्थापना आणि शारदीय #नवरात्र उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! 📿🔱🚩


#घटस्थापना निमित्तानं सर्वांना मंगलमय शुभेच्छा...💫

या देवी सर्व भूतेषु शक्तिरुपेण संस्थिता*|💐🕉️


*नमस्तस्यै ! नमस्तस्यै ! नमस्तस्यै नमो नम: ||💐🙏

१) आईसाहेब श्री #तुळजाभवानी माता .💐🕉️



२) आईसाहेब श्री #सप्तश्रूंगी माता .🙏🕉️



३) आईसाहेब श्री #रेणुका माता .🙏🕉️



४) आईसाहेब श्री #महालक्ष्मी माता .🕉️🙏



 #सर्व #शक्ती #पिठ #दर्शन.


श्री #आदिशक्ती #प्रसन्न 💐🙏🕉️


Thursday, 22 September 2022

घटस्थापना मुहूर्त व पुजा विधी

 शारदीय नवरात्र उत्सव 2022

अश्विन शु.प.०१ शके १९४४ शरदऋतू प्रारंभ कसा साजरा करावा ?



घटस्थापना शुभ मुहुर्त:

यंदा सोमवार, 26 सप्टेंबरला घटस्थापना केली जाईल. या दिवसापासून शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल

घटस्थापना मुहूर्त - सकाळी 06:11 ते 07:51 पर्यंत. 

घटस्थापना अभिजित मुहूर्त - सकाळी ११:४८ ते दुपारी १२:३६

घटस्थापना पूजा विधी:

 घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटा खाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घाला.

 चौरंग/पाटावर लाल वस्त्र अंथरा.

टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्या मधोमध कलश ठेवा.

 कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटं ओढा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा.

 कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.

 नारळावर बारीक काडी लावून त्यावर फुलं ठेवा.

 कलशाला हळद कुंकु, गंध अक्षता वाहून पूजा करा.

 कलशावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला.

 दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता.

 नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी एक अशी फुलांची माळ वाढवत जा.

 दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.

 परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.

नवरात्रातीत दुर्गेची पूजा ही "निर्मिती शक्तीची" पूजा असते. नवरात्रीतील घटाला सृष्टीचे रुप मानले जाते. या काळात कन्या पूजन करुन देवीच्या रुपाची पूजा केली जाते.

आई तुझाच आशिर्वाद 

जय जगदंबा 🕉👏🏻🔱


Sunday, 18 September 2022

नवरात्र 2022 नवरात्रीचे नऊ रंग

 नवरात्र 2022 नवरात्रीचे नऊ रंग 

सर्व मंगल मांगल्ये।

शिवे सर्वार्थ साधिके ।।

शरण्ये त्र्यंबके गौरी ।

नारायणी नमोस्तुते ।।

Friday, 16 September 2022

शारदीय नवरात्र 2022,नवरात्र नवरंग

 1.शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी शैलपुत्री देवीची पूजा केली जाईल. सोमवारी पांढरा रंग शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला पांढरा रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा म्हणजे. श्वेत रंग शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंग धारण केल्याने आत्मविश्वाव वाढतो.


2. नवरात्र द्वितीया तिथी (लाल) (Red)


नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी मंगळवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग साहस, पराक्रम आणि प्रेमाचं प्रतिक आहे.


3. नवरात्र तृतीया तिथी (नारंगी) (Orange)


शारदीय नवरात्रौत्सावाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर हा दिवस चंद्रघंटा देवीला समर्पित आहे. बुधवारी चंद्रघंटा देवीला नारंगी रंगाचं वस्त्र अर्पण केलं जाईल. नारंगी रंग सकारात्मक ऊर्जेचा प्रतिक आहे. 


4. नवरात्र चतुर्थी तिथी (पिवळा) (Yellow)


नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी 29 सप्टेंबरला कुष्मांडा देवीची रूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग शुभ मानला जातो. पिवळा रंग सौभाग्याचा, संपत्तीचा आणि वैभवाचं प्रतिक आहे.


5. नवरात्र पंचमी तिथी (हिरवा) (Green)


शारदीय नवरात्रौत्सावाच्या पाचवा दिवस 30 सप्टेंबरला आहे. या दिवशी स्कंदमातेची आराधना केली जाईल. देवी स्कंदमातेला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग निसर्गाचं प्रतिक आहे. हिरवा धारण केल्यानं चैतन्यामध्ये वृद्धी होते.


6. नवरात्र षष्ठी तिथी (राखाडी) (Grey)


नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशी 1 ऑक्टोबरला कात्यानी देवीची पूजा केली जाईल. या दिवशी देवीला राखाडी रंगाचं वस्त्र चढवलं जाईल. राखाडी रंग बुद्धिमत्तेचं प्रतिक आहे. 


7. नवरात्र सप्तमी तिथी (निळा) (Blue)


शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी म्हणजेच सप्तमीला देवी कालरात्रीची पूजा केली जाते. 2 ऑक्टोबरला सप्तमीच्या दिवशी निळा रंग शुभ मानला जातो. आकाश आणि पाण्याचा निळा रंग हा विश्वासाचं प्रतिक आहे. 


8. नवरात्र अष्टमी तिथी (जांभळा) (Purple/Violet)


नवरात्रौत्सवाच्या आठव्या दिवशी अष्टमी 3 ऑक्टोबरला सोमवारी आहे. यादिवशी महागौरीची आराधना केली जाईल. या दिवशी जांभळा रंग अतिशय शुभ मानला जातो. जांभळा रंग कल्पनाशक्ती आणि स्वामित्वाचं प्रतिक आहे. या दिवशी कन्यापूजेचा मुहूर्त आहे.


9. नवरात्र नवमी तिथी (गुलाबी) (Pink)


शारदीय नवरात्रौत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. 4 ऑक्टोबरला नवमी दिवशी गुलाबी रंग शुभ आहे. गुलाबी रंग प्रेमाचं आणि स्त्री शक्तीचं प्रतिक आहे.

Tuesday, 12 July 2022

तुळशीला रविवारी व एकादशीला का पाणी घालू नये ?

 तुळशीला एकादशी व रविवारी पाणी का घालू नये संपूर्ण माहिती


एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी का घालू नये म्हणजेच तुळशीला जल अर्पण का करू नये आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये एकादशी हे व्रत फार प्रमाणात केलं जातं त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई या देवस्थानामुळे आणि वारकरी संप्रदायामुळे एकादशी ही फार मोठ्या प्रमाणात आपल्या हिंदू धर्मामध्ये व्रत केल जातात


तर एकादशीला आणि रविवारी तुळशीला पाणी का घालू नये याविषयीची माहिती सांगणार आहे  हिंदू धर्मात तुळशीचे वनस्पती किती महत्त्वाची आहे आयुर्वेदिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या आणि हिंदूं शास्त्र नुसार ज्या घरात तुळशी आहे त्या घराला कधीही वाईट नजर लागत नाही आणि जे तुळशीची सेवा करतात त्यांना प्रकारचा आनंद प्राप्त होतो अशी ही वनस्पती आपल्या घरातील जीवनातील नकारात्मक ऊर्जा अडथळे दूर करण्यास महत्त्वाची भूमिका बजावते


त्यामुळे पूर्वीपासून फार पूर्वीपासून आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावलेला असतं आणि त्याला विशेष करून स्त्रिया जल अर्पण करत असतात त्याची पूजा करत असतात आणि त्याला प्रदक्षिणा मारत असतात आणि शुद्धतेने तुळशीची पूजा करतो आणि तुळशीच्या रूपाची सेवा करतो त्याच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि धनच येत नाही तर त्याचे सौभाग्य देखील वाढते आणि इतकेच नाही ज्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येत नाही आणि त्या घरात कधीही कोणत्याही प्रकारचे भांडण होत नाही


म्हणून फार पूर्वीपासून प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन हे असायचं आणि अजून सुद्धा आहे आणि त्याला या स्त्रिया घरातील स्त्रिया सकाळ संध्याकाळची पूजा करून जल अर्पण करतात आणि त्या तुळशी मातीला प्रदक्षिणा घालत असतात आणि तो ऑक्सिजन आपल्या घरातील स्त्रियांना भरपूर प्रमाणात मिळावा म्हणून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आपल्या ऋषीमुनी ंनी हिंदू धर्मातील विद्वान विद्वान लोकांनी केलेली आहे


त्यामुळे बहुतेक घरामध्ये तुळशीच्या रोपाला महत्त्वाचे स्थान दिले जाते तिला रोज पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो पाणी अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येथे आणि भगवान विष्णूंची कृपा कुटुंबावर सदैव राहते असे असूनही रविवारी आणि एकादशी तिथीला तुळशीला पाणी अर्पण का करू नये हे सांगणार आहे


पण तुम्हाला माहित आहे का की तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते परंतु रविवारी आणि एकादशी तिथीला पाणी अर्पण करणे आता तुम्ही विचार करत असाल की असे का चला तर मग आज आपण जाणून घेऊया की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी का अर्पण करत नाही त्यामुळे रविवारी तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही


रविवारी तुळशीला पाणी अर्पण करणे वर्ज्य मानले जात असले तरी रोज जल अर्पण करणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार असे सांगितले आहे की भगवान विष्णूला रविवार खूप प्रिय आहे तुळशीला विष्णू प्रिया हरिप्रिया असे म्हटले जाते रविवारी तुळशी भगवान विष्णूंचे तप करतात त्यांच्या कुठल्याही प्रकारचे विघ्न पडू म्हणून रविवारी तुळशीला पाणी घालू नये


तपश्चर्य भंग पडली तर तुळशी देवी रागावते आणि नंतर त्याचे वाईट परिणाम भोगाव लागतात म्हणून तुळशीला रविवारी पाणी अर्पण करू नये तुळशीला पाणी अर्पण केल्यास माता तुळशी व्रत मोडते त्यामुळे भगवान विष्णूची कृपा ही मिळत नाही असे मानले जाते रविवारी तुळशीच्या रूपाला पाणी अर्पण केल्याने जीवनात नकारात्मक शक्तीचा वास निर्माण होतो


असे केल्याने घरात संकटे वाढण्याची आणि सुख-समृद्धी कमतरता होण्याची शक्यता असते म्हणून तुळशीला पाणी अर्पण करणे निषिद्ध मानले गेलेले आहे त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करणे का वर्ज्य मानले गेले आहे ते आपण आता पाहूया मान्यता नुसार माता तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम या रूपाशी झालेल्या होता यासाठी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांचा विवाह थाटामाटात आयोजित केला जातो


माता तुळशी भगवान विष्णूंच्यासाठी निर्जन उपवास करत असते म्हणजे त्यावेळेस तुळशी मातेचा उपवास असतो एकादशीला त्यामुळे तुळशीला जल अर्पण केल्याने त्यांच्या व्रतामध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे माता तुळशी आणि भगवान विष्णू भगवान विष्णू आणि भगवान शालिग्राम यांच्या आशीर्वाद ही कुटुंबाला मिळत नाही


त्यामुळे तुळशीचे हिरवे रोप सुकायला लागले तसेच कुटुंबात सुख-समृद्धी कमतरता निर्माण होते त्यामुळे तुळशीला तुम्ही एकादशीच्या दिवशी किंवा रविवारी जल अर्पण करू नये तुळशी माता हे विष्णूंच्या साठी हे निर्जल उपवास करत असतात एकादशीच्या दिवशी आणि रविवारी आपण तुळशीला जल अर्पण करू नये

Sunday, 10 July 2022

जय जगन्नाथ जगन्नाथ पुरी

 भगवान श्रीकृष्णांनी देह सोडला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांचे संपूर्ण शरीर पंचभूतांमध्ये मिसळले होते, परंतु त्यांचे हृदय सामान्य जिवंत माणसासारखे धडधडत होते, श्री कृष्णाचे हृदय आजपर्यंत सुरक्षित आहे, जे भगवान जगन्नाथाचे लाकडी मूर्तीत आहे. आणि ठोके ही सर्व माणसानं सारखेच आहेत, हे फार कमी लोकांना माहीत आहे. . . !

महाप्रभूंचे मोठे रहस्य सोन्याच्या झाडूने केली जाते स्वच्छता . . . !

महाप्रभू #जगन्नाथ (श्री कृष्ण) यांना कलियुगाचे भगवान देखील म्हटले जाते. जगन्नाथ स्वामी त्यांची बहीण #सुभद्रा आणि भाऊ #बलराम यांच्यासोबत पुरी (ओरिसा) येथे राहतात, परंतु रहस्य असे आहे की आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही . . . !

दर 12 वर्षांनी महाप्रभूंची मूर्ती बदलली जाते . . . !

अशावेळी संपूर्ण पुरी शहरात ब्लॅकआऊट असतो, म्हणजे संपूर्ण शहरातील दिवे बंद असतात, दिवे बंद केल्यानंतर मंदिर परिसराला CRPF ने वेढले असते, त्यावेळी कोणीही मंदिरात आत जाऊ शकत नाही . . . !

मंदिराच्या आत दाट अंधार आसतो, पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आसते, पुजाऱ्याला हातमोजे आसतात, तो जुन्या मूर्तीतील "ब्रह्म पदार्थ" काढून नवीन मूर्तीमध्ये घालतात. हा ब्रह्म पदार्थ काय आहे हे आजपर्यंत कोणालाही माहीत नाही. ते आजपर्यंत कोणी पाहिलेले नाही. हजारो वर्षांपासून हे एका मूर्तीतून दुसऱ्या मूर्तीकडे हस्तांतरित होत आहे . . . !

हा एक अलौकिक पदार्थ आहे, त्याला स्पर्श केल्याने माणसाच्या अंगाच्या चिंध्या उडून जातात. हा ब्रह्म पदार्थ भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. पण हे काय आहे, कुणालाच माहीत नाही, आषाढचे दोन महिने एकाच वर्षी येतात तेव्हा भगवान जगन्नाथ आणि इतर मूर्ती बदलल्या जातात. ही संधी 19 वर्षांनंतर आली आहे, काही वेळा 14 वर्षातही येते, या प्रसंगाला नव-कलेवर म्हणतात . . . !

पण आजपर्यंत एकही पुजारी सांगू शकला नाही की महाप्रभू जगन्नाथाच्या मूर्तीत काय आहे . . . ?

काही पुजारी म्हणतात की जेव्हा आम्ही ते हातात घेतले तेव्हा ते हृदयासारखे उड्या मारत होते… डोळ्यावर पट्टी होती… आम्ही फक्त अनुभवू शकलो होतो . . . !

आजही जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने पुरीचा राजा स्वतः सोन्याच्या झाडूने झाडू मारायला येतो . . . !

भगवान जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारातून आतमध्ये पहिले पाऊल टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही, तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिरातून बाहेर पडताच समुद्राचा आवाज येतो . . . !

तुम्ही बहुतेक मंदिरांच्या शिखरावर पक्षी बसलेले आणि उडताना पाहिले असतील, परंतु जगन्नाथ मंदिरावरून एकही पक्षी जात नाही, #ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो, दिवसाच्या कोणत्याही वेळी जगन्नाथ परमेश्वराच्या मंदिराच्या मुख्य शिखराची सावली पडत नाही . . . !

भगवान जगन्नाथ मंदिराच्या 45 मजल्यावरील #ध्वज दररोज बदलला जातो, असे म्हणतात की एक दिवसही ध्वज न बदलल्यास 18 वर्षे मंदिर बंद राहील . . . !

त्याचप्रमाणे, भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक #सुदर्शन_चक्र देखील आहे, जे कोणत्याही दिशांनी पाहिल्यावर, तुमच्याकडे तोंड करून आहे असे भासते . . . !

भगवान जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरात, #प्रसाद शिजवण्यासाठी 7 मातीची भांडी एकमेकांवर ठेवली जातात, जो लाकडाच्या #अग्नीने शिजवला जातो, त्यातील सर्वात वरती ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो . . . !

भगवान जगन्नाथ मंदिरात दररोज केला जाणारा प्रसाद भक्तांसाठी कधीच कमी पडत नाही, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराचे दरवाजे बंद होताच प्रसादही संपतो आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, आपल्या #सनातन_हिंदू धर्मामध्ये . . . !

सनातन हिंदु धर्म की जय

श्री जगन्नाथ की जय

Wednesday, 31 March 2021

Aadhar PAN LINK कशी करावी

सर/मॅडम ,

तुम्हाला कळवण्यात येते की तुमचे आधार तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे आणि आम्ही  ते इनकम टॅक्स च्या पोर्टल सोबत तपासून बघितले आहे.आपण  आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले  आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले  तर ३१मार्च २०२१ च्या आधी  करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल . 
आधार-पॅन लिंक आहे का तपासण्यासाठी खालील लिंक १ चा वापर करा व आधार-पॅन लिंक नसेल तर लिंक २ चा वापर करून लवकरात लवकर लिंक करून घ्या. 

लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :

 

लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :