Tuesday, 16 June 2020

उस्मानाबाद -चार रूग्णांचा रिपोर्ट पाॅजिटीव, एक मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील चार जणांचा 


 कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे तर एका


 कोरोना  बाधित महिलेचा मृत्यू झालेला आहे. 


वानेवाडी, सलगरा , मसाला आणि बेटजवळगा  येथील प्रत्येकी 


 एक रुग्ण कोरोना बाधित सापडला असून, उस्मानाबाद


 शहरातील  कोरोना बाधित  आठ महिन्याची गर्भवती


 महिला मृत्यू पावली आहे. 


आज 16 जून रोजी, सामान्य रुग्णालय उस्मानाबाद


 येथून 53 स्वाब  तपासणीसाठी विलासराव देशमुख


 शासकीय वैदकीय महाविद्यालय, लातूर तेथे


 पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून


 त्यापैकी 4 पॉजिटीव्ह , 4 inconclusive व 45


 निगेटिव्ह  रिपोर्ट आले आहेत. 


पॉजिटीव्ह रुग्णाची माहिती 


 रुग्ण वाणेवाडी ता. उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या


 रुग्णाच्या  संपर्कातील आहे. एक रुग्ण  सलगरा ता.


 तुळजापूर येथील आहे. एक रुग्ण मसला  ता. तुळजापूर


 येथील असून तो दोन दिवसापूर्वी पॉजिटीव्ह


 रुग्णाचा  सहप्रवासी आहे. एक रुग्ण  बेटजवळगा ता.


 उमरगा येथील असून तो दहा दिवसापूर्वी मुंबई वरून


 आला आहे. 


त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील


 बोबले हुनुमान चौकातील एक आठ महिन्याची गर्भवती


 महिला लातूरला ऍडमिट होती. तिचा कोरोना रिपोर्ट


 पॉजिटीव्ह होता, तिचा आज मृत्यू झाला आहे. 


कोरोना बाधित रुग्ण  - 153


बरे झालेले रुग्ण - 116


मृत्यू - 6


एक्टीव्ह रुग्ण - 31


No comments:

Post a Comment