Friday, 26 June 2020

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात कोणते आजार उद्भवू शकतात?


👉 योग्य प्रमाणात पाणी पिल्याने आपले शरीर ताजेतवाने राहण्यास मदत होते तसेच शरीरात ऊर्जेचे प्रमाण वाढण्यास देखील मदत होते.



पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून आपले शरीर वाचू शकते. मात्र कमी पाण्यामुळे आपल्या शरीरात विविध आजार उद्भवू शकतात. त्याबाबत पाहुयात... 


1) *पोटाची तक्रार* : कमी पाणी प्यायल्याने डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच अपचन, पोटात दुखणे असेही आजार होऊ शकतात. 


2) *थकवा* : कमी पाण्यामुळे शरीराला थकवा येऊन शरीरातील एनर्जी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच डोकेदुखी, ताण, गोंधळलेपणा, अस्वस्थता या सारख्या समस्या डोके वर काढू शकतात.


3) *हदयरोगाची समस्या* : शरीरात पाण्याच्या कमतरतेने डिहाड्रेशन होऊन शरीरातील रक्त गोठू शकते. ज्यामुळे रक्त प्रवाहामध्ये बाधा येवून हदयरोगाच्या तक्रारी निर्माण होवू शकतात.


4) *चेहऱ्यावरील समस्या* : चेहऱ्यावरील सुंदरता ही पाण्याच्या मात्रेवर टिकून असते. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. याने चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.


5) *लठ्ठपणाची समस्या* : पाणी कमी प्यायल्याने आपल्या शरीराचे वजन वाढून लठ्ठपणाचे विकार होऊ शकतात.


*टीप* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

No comments:

Post a Comment