Sunday, 28 June 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात तीन पॉजिटीव्ह

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन पॉजिटीव्ह 


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन  जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या २०९ आणि ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३४  झाली आहे.आज २८ जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून ५८  स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून तीन  पॉजिटीव्ह  व ५५ निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.पॉजिटीव्ह तीन रुग्णापैकी दोन रुग्ण ईडा ता. भूम आणि एक रुग्ण नालगाव ता. परंडा येथील आहेत. सर्व रुग्ण पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातकोरोना बाधित रुग्ण - २०९

बरे झालेलं रुग्ण - १६६

मृत्यू - ९

ऍक्टिव्ह रुग्ण  ३४


No comments:

Post a Comment