कुळीथ( हुलगे) आरोग्यासाठी फायदे
कुळीथ एक उत्तम ,पौष्टिक औषधी,धान्य आहे,पारंपारिक आयुर्वेदिक
पाकक्रुतीत कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणून वापरले जाते.कुळीथ
चवीला गोड,तुरट,व उष्ण असतात, पचायला हलके असतात,कुळिथ हे
प्रथिने व इतर पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे,हे लोह, माॅलिब्डेनम व
कॅल्शिअमचे उत्तम स्रोत आहे.खरं तर स्थूल व्यक्तीसाठी हे फायद्याचे
कडधान्य आहे.यात सर्वात कमी चरबी व चोथा अधिक असल्याने याच्या
सेवनाने वेगाने वजन,मेद कमी होतो.काविळीत याचे भरपुर सेवन करावे.
सर्व प्रकारच्या युरिन,मूत्राशयाच्या विकारांवर कुळीथाचा काढा करून
पिण्यास द्यावा.लवकर गुण येतो.बाळंतिणीला दूध भरपूर येण्यासाठी
याचा काढा देतात, कुळीथ हे वातघ्न,कफघ्न आहे,याचे सार रोगी
माणसास पथ्यकार आहे.शरिराच्या कोणत्याही सूजेवर कुळीथाचा
उपयोग होतो.तीव्र ज्वर असल्यास कुळीथाचा गरम काढा,सूप रुग्णास
पिण्यास दिल्याने त्वरीत ताप उतरून त्याला हुशारी येते,कुळीथाचे पीठ
उटण्यासारखे शरिराला आंघोळीच्या वेळेस चोळले तर वेगाने चरबी कमी
होते.मुतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांसोबत कुळीथाचे सूप
द्यावे पोटात होणारी वेदना ( रीनल कोलिक) कमी होते.पोटात वात धरणे,
पोट दुखणे,फुगल्यासारखे वाटणे यावर याचा काढा उपयोगी आहे.
पोटातील जंत,कृमी सेवनाने नष्ट होतात.त्वचेची आग,पुरळ,फोड,याकरता
याचे चूर्ण पाण्यासोबत घ्यावे,चेहरा उजळण्याकरता, मुलायम,सुंदर
करण्याकरता याची पेस्ट करून लावावी.कुळीथ हे फेरूलिक,
क्लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टिअन,व माल्विडिन
वनस्पतीजन्य रसायनयुक्त आहे. त्यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना
अटकाव करते व वजन कमी करते.कुळीथाच्या नियमित सेवनाने
कोलेस्ट्रोलचे प्रमाण घटवून हार्ट अटॅक धोके टाळता येतात.यात फायबर
विपुल असल्याने बद्धकोष्ठ,मुळव्याध,बवासिर हे आजार होत नाही.
मधुमेहींनाही उपयोगा आहे,आयुर्वेदात कुळीथ डोळ्यांना हितकर
सांगितले आहे.कुळीथातले लोह शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
वाढवते.वरिल सर्व फायदे लक्षात घेता,इतर धान्ये,व कडधान्ये आपण
नियमित खातो,तसेच कुळीथाला देखील प्राधान्य देऊन आपल्या
आहारात जागा द्यावी.जेणेकरून उत्तम स्वास्थ राहील.
No comments:
Post a Comment