कोरोना : ३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सात पॉजिटीव्ह
उस्मानाबाद - ३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील तीन, उमरगा - लोहारा तालुक्यातील दोन आणि उस्मानाबाद तालुक्यातील दोन असा समावेश आहे.. आज ३ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून १६८ स्वाब लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी सात पॉजिटीव्ह, २ अनिर्णित आणि १६० निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. पॉजिटीव्ह रुग्ण तुळजापूर शहरातील एक, खडकी येथील एक, उपजिल्हा रुग्णालयातील एक तसेच लोहारा - उमरगा तालुक्यातील तुरोरी १ बलसूर १, त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागातील एक आणि कनगरा ता. उस्मानाबाद येथील एक आहे. कोरोना बाधित रुग्ण - २५५ बरे झालेले रुग्ण - १८४ मृत्यू - १२ एक्टीव्ह रुग्ण -
No comments:
Post a Comment