OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 2ND 2020
कळंब तालुक्यात 7 वाढले, शहरातील आणखी
एका बड्या कुटुंबात कोरोनाचा प्रवेश
कळंब : कळंब तालुक्यातील कोरोना बाधित
रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये.
तालुक्यात आणखी कोरोना बाधित 7 रुग्णांची
भर पडली आहे. शनिवारी तालुक्यातील एकूण
15 संशयितांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट घेण्यात आले,
त्यांपैकी 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,
अशी माहिती कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय
अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली.
त्यात माळकरंजा येथील 2 तर रत्नापुर येथील
बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 1 जण पॉझिटिव्ह
आला आहे.
शुक्रवारी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात
आलेले स्वाबपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यात सात्रा, रत्नापुर आणि कळंब शहर असे
प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
कळंब शहरात बाधित आलेली व्यक्ती शहरातील
मोहा रोड येथील आहे. शहरात आणखी एका
बड्या व्यापारी आणि 30 ते 40 सदस्य असलेल्या
कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
सुरुवातीला या कुटुंबातील एका महिलेचा अहवाल
बार्शी येथे पॉझिटिव्ह आला आहे, असं डॉक्टर
वायदंडे म्हणाले. आता कुटुंबातील व्यक्तींना
महावीर भवन कळंब येथे क्वाराईनटाईन केले आहे.
या कुटुंबाचे ही कळंब शहरात 2 मोठे जनरल स्टोअर्स एक
ऑटोमोबाईल्सचे दुकान आहे. म्हणून या कुटुंबातील
व्यक्तींच्याही संपर्कात किती जण आलेत, याचा शोध
प्रशासन घेत आहे. मात्र एकही बाधित रुग्ण नसलेल्या
कळंब शहरात बड्या व्यापाऱ्याच्या कुटुंबातील वृद्ध
व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला बाहेर जिल्ह्यातील लोक
आल्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग मोठयाप्रमानात
वाढला आहे. त्यामुळे सर्वानुमते उद्यापासून म्हणजे
3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट शहरा जनता कर्फ्यु पाळला
जाणार आहे. मात्र या कालावधीत बधितांच्या संपर्कातील
लोकांनी समोर येऊन तपासणी करणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment