OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH, 2020 AT 9:30 PM
---------------------------------------------
कळंब तालुक्यात कोरोनाने थैमान घातला आहे. संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार
तब्बल 33 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज दिवसभरात तब्बल 64 रुग्णांची भर
पडली आहे. काल म्हणजेच (शुक्रवारी) बाधित रुग्णांच्या संपर्कात अलेल्यांचा 65 जणांचा
स्वाब घेण्यात आला होता. त्यापैकी 33 जण बाधित आल्याची माहिती डॉ. वायदंडे यांनी दिली.
या बाधित रुग्णांमध्ये प्रभारी नगराध्यक्षा यांचा देखील समावेश आहे.
या 33 जणांमध्ये कळंब शहरात 13 रुग्ण सापडले आहेत. तर बोरगाव येथे 7, कोथळा 4,
खेरडा, भाटशिरपुरा, कण्हेरवाडी, रत्नापुर या गावांमध्ये प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे.
तर डिकसळ येथे एकाच कुटुंबातील 5 जण बाधित आढळले आहेत.
No comments:
Post a Comment