Saturday, 8 August 2020

OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON AUGUST 8TH, 2020 AT 7:00 PM


कळंब तालुक्यात रॅपिड अँटीजन्स टेस्टमध्ये 16 जणांचा

 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरात कळंब

 तालुक्यात 31कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. 

एकाच दिवसात 31 रुग्ण सापडल्याने कळंब तालुक्यात 

खळबळ उडाली आहे. कळंब तालुक्यात आज एकूण 87 

जणांचे रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी 

दहिफळ गावात 7,खामसवाडीमध्ये 5, मस्सा येथे 2 आणि

 पानगाव व चोराखळी येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण 

पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती उपविभागीय 

अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिली.

कळंब तालुक्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्र 

प्रयोगशाळेत आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत 

पाठवण्यात आलेल्या स्वाब नमुन्यांचे अहवाल आज दुपारी 

प्राप्त झाले होते, त्यात 15 जण पॉझिटिव्ह सापडले होते. 

संपर्कातील लोकांचे लवकर अहवाल हातीयावे म्हणून

प्रशासनाने रॅपिड अँटीजन्स टेस्ट मोहीम हाती घेतली आहे.

यात 15 ते 20 मिनिटात अहवाल कळतो. त्यामुळे दररोज 

जास्तीत जास्त टेस्ट केल्या जात आहे. काल देखील 140 

पेक्षा जास्त जणांचे रॅपिड टेस्ट करण्यात आले त्यात 22 जण

 बाधित आढळले होते. आता उद्या शहरातील 100 व्यापारी, 

अधिकारी, पत्रकार, बँक कर्मचारी, दुर्धर आजारी 

असलेल्यांची रॅपिड अँटीजन्स टेस्ट करण्याच्या सूचना

उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी दिल्या आहेत.



No comments:

Post a Comment