⛳ 🏰 *गडवाट* 🏰 ⛳
🗡️ *अकलूजचा किल्ला* 🗡️
*"अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे.*
किल्ल्याचा जिर्णोध्दार व शिवसृष्टी उभारण्यासाठी मोहीते पाटील घराण्याने विशेष प्रयत्न केलेले आहेत.
तिकीट काढून किल्ल्यात शिरताना प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची म्युरल्स् पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स् व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स् मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.
किल्ल्याच्या मधोमध असणार्या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्या बाजूस शेकोटी पेटवून पहार्यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.
किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी इ समावेश आहे. हे पुतळे पहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्त्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.
किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.
"