Saturday, 6 June 2020
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांच्या जीवनावर* 🔊 आधारित प्रश्न मंजुषा
https://forms.gle/FwsjfjXFquS2qQSB7 👈
🔊 *शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी महाराज यांच्या जीवनावर* 🔊 *आधारित प्रश्न मंजुषा*
🔊 *आयोजक*-जि.प.प्रा.शाळा *शेळका धानोरा* ता.कळंब जि.उस्मानाबाद
🔊 *निळ्या लिंकवर क्लिक करा.*
🔊 *टेस्ट सोडवा.*
🔊 *नांव, वर्ग, शाळा, मोबाईल क्रमांक लिहा.*
🔊 *submit करा.*
🔊 *view score वर क्लिक करा.आपले गुण व चुकलेली उत्तरे पहा.*
Friday, 5 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह ,एकूण रूग्ण 116
उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह ,एकूण रूग्ण 116
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील बारा जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे आजपर्यंत सापडलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ११६ झाली आहे. पैकी ५६ रुग्ण बरे झाले आहेत.
आज ५ जून रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 45 जणांचे रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.
त्यापैकी बारा पॉझिटिव्ह,4 inconclusive व 29 निगेटिव्ह आले आहेत.
पॉजिटीव्ह रुग्ण असे
आठ पेशंट शिरढोण ता.कळंब येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत. व दोन पेशंट हासेगाव ता. कळंब येथील पूर्वीच्या आंदोरा येथील पेशंटच्या संपर्कातील आहेत असे एकूण दहा पेशंट कळंब तालुक्यातील आहेत. व दोन पेशंट ढोकी ता उस्मानाबाद येथील असून ते पुणे रिटर्न आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात
आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - ११६
एकूण बरे झालेले रुग्ण - ५६
उपचार घेत असलेले रुग्ण -५७
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ३
Thursday, 4 June 2020
उस्मानाबाद जिल्हयाने शतक ओलांडले, आज दहा रूग्ण कोरोना पाॅजिटीव
कोरोना अपडेट उस्मानाबाद
आज दिनांक 04/06/2020 रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 74 नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व रिपोर्ट प्राप्त झाले .
त्यापैकी दहा पॉझिटिव्ह,एक inconclusive व 63 निगेटिव आले आहेत.
पॉझिटिव पेशंट ची माहिती ---
सात पेशंट काका नगर उस्मानाबाद येथील असून हे सर्व पूर्वीच्या पेशंटच्या संपर्कातील आहेत.
दोन पेशंट शिराढ़ोन ता.कळंब येथील आहेत व एक पेशंट सोन्नेवाडी ता. भूम येथील असून दहा दिवसांपूर्वी घाटकोपर मुंबई येथून आलेली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत
सापडलेले कोरोना रुग्ण - 104
एकूण बरे झालेले रुग्ण - 46
उपचार घेत असलेले रुग्ण - 55
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
Wednesday, 3 June 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले
उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद तालुका 4 कळंब तालुका 2 आणि उमरगा 1 अश्या सात रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 94 झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यातआले आले होते, पैकी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर सात जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत, तर २ अहवाल Inconclusive तर २ अहवाल पेंडिंग आहेत.
आज प्राप्त रिपोर्ट पैकी एकूण सात जण पॉसिटीव्ह आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण उस्मानाबाद शहरातला पूर्वीचाच रुग्ण आहे ज्याचा स्वाब पॉजिटीव्ह आला आहे, म्हणजे नवीन सहा रुग्णात भर पडली आहे.
नवीन सहा रुग्ण
एक रुग्ण केसरजवळगा ता. उमरगा येथील येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. दुसरे दोन रुग्ण अंदोरा ता. कळंब येथील असून ते 29 मे रोजी मुंबई रिटर्न आहेत. एक रुग्ण धुता येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण सुंभा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण कारी येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. असे एकूण नवीन सहा रुग्ण व एक जुनाच रुग्ण आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत
सापडलेले कोरोना रुग्ण - 94
एकूण बरे झालेले रुग्ण - 41
उपचार घेत असलेले रुग्ण - 50
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
Tuesday, 2 June 2020
उस्मानाबाद दि.02/06/2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण वाढले
उस्मानाबाद दि.02/06/2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण वाढले
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील 8, कळंब शहरातील 2 आणि कळंब तालुक्यातील शिरढोण येथील 1 अश्या 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 88 झाली आहे.
आज दि. 2 जून रोजी 55 स्वाबचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. एक जणांचा रिपोर्ट inconclusive आला आहे.
पॉजिटीव्ह पेशंटची माहिती
8 रुग्ण उस्मानपुरा, उस्मानाबाद येथील असून ते नळदुर्ग येथील पूर्वी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
2 रुग्ण कळंब येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत व एक रुग्ण शिराढोण येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी 77 रुग्ण होते, त्यापैकी 3 मयत झाले असून, 32 जण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आता 53 झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 88
एकूण बरे झालेले रुग्ण - 32
उपचार घेत असलेले रुग्ण - 53
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
Monday, 1 June 2020
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्ण वाढले
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्ण वाढले
एकूण रूग्ण-77
उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 77 झाली आहे.
कोरोनाचा तिसरा बळी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले
एकूण कोरोना रुग्ण - 77
एकूण बरे झालेले रुग्ण - 19
उपचार घेत असलेले रुग्ण - 55
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी
उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी
एकूण ७३
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी दोन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील काल ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. आणखी दहा अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज येणार आहे, त्यामुळे आणखी धाकधूक वाढली आहे.
Sunday, 31 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले,
एकूण ७३आणखी दहा अहवाल प्रलंबित , चिंता वाढली
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी दोन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात नळदुर्ग शहरातील एक ५० वर्षांचा एक पुरुष आणि सुंभा ता. उस्मानाबाद येथील ५३ वर्षांचा एक पुरुष आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन व्यक्तीचा अहवाल Inconclusive आला आहे. आणखी दहा अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज रात्री उशिरा किंवा उद्या येणार आहेत.
Saturday, 30 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात ,एकूण 71
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात
आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील
कोरोना रुग्णाची संख्या आता ७१ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात कळंब शहरातील
पाच ( मुंबई रिटर्न ), शिराढोण ( ता. कळंब )
येथील एक आणि बेडगा ( ता. उमरगा ) येथील एक
असा समावेश आहे. शिराढोण आणि बेडगा रुग्ण
अगोदरच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील 52 व्यक्तींचे स्वॅब
तपासणीसाठी आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे
अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल
पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल
Inconclusive आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना
रुग्ण - ७१ एकूण बरे झालेले रुग्ण - १५उपचार घेत
असलेले रुग्ण - ५४ एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - २
Friday, 29 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज
( शुक्रवार ) कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.
उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका
कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो मुंबईहुन गावी आला होता. गंभीर बाब म्हणजे
त्या रुग्णाच्या घरातील आणखी दोघेजण
कोरोनाग्रस्त आहेत.
मरण पावलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय
६७ असून तो मुंबईहून गावी आला होता. मुंबईत
रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या या
रुग्णाला २५ मे रोजी उमरगा उपजिल्हा
रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात
आले होते, त्याचा २६ मे रोजी कोरोना रिपोर्ट
पॉजिटीव्ह आला होता तर आज मृत्यू झाला.
त्यास मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता, त्यात
कोरोना झाल्यामुळे त्याचा श्वासोश्वास कोंडत
होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी
सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले
असून पैकी पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. सद्यस्थितीत ४७ रुग्ण उपचार
घेत आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
Thursday, 28 May 2020
Subscribe to:
Comments (Atom)









