Thursday, 23 July 2020
Wednesday, 22 July 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 22ND,2020 AT 7-00 PM
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात
तिघांचा बळी
उस्मानाबाद- जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाने तीन
जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१
जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाचा मृत्यू दर पाच
पेक्षा जास्त गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज
मृत्यू पावलेल्या व्यक्तींची माहिती
१) 60 वर्षीय महिला, रा. उंबरे गल्ली, उस्मानाबाद
२) ६० वर्षीय पुरुष डाळींब ता उमरगा
३) ४८ वर्षीय पुरुष केसर जवळगा ता उमरगा
➤ आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या
बाधितांची संख्या - ५८३
➤ रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या -
१९७
➤ रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची
संख्या - ३५५
➤आज पर्यंत एकूण मृतांची संख्या - ३१
वरील माहिती. दि 22/07/2020 रोजी सायंकाळी
7:00 वाजेपर्यंत ची आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 22ND,2020
उस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर
सुरूच आहे. जिल्ह्यात बुधवारी १० रुग्णाची भर पडली
आहे तर कोरोनामुळे शहरातील एका महिलेचा मृत्यू
झाला आहे.
दि. 20 जुलै रोजी जिल्हा रुग्णालय
उस्मानाबाद येथून 76 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा.
रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे
पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून
त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
पाठवलेले स्वाब नमुने - 76
प्राप्त रिपोर्ट्स - 76
पॉजिटीव्ह - 06
निगेटिव्ह - 70
पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
उस्मानाबाद तालुका - 04
1) 55 वर्षीय पुरुष रा ख्रिस्तियन इंग्लिश स्कूल
जवळ, मिली कॉलनी , उस्मानाबाद. ( अँटीजेन टेस्ट )
2) 58 वर्षीय पुरुष, रा. 16 नं गल्ली, खाजा नगर,
सोलापूर रोड, उस्मानाबाद. (अँटीजेन टेस्ट )
3) 28 वर्षीय पुरुष रा. गवळी वाडा, तांबरी विभाग,
उस्मानाबाद.( अँटीजेन टेस्ट )
4) 80 वर्षीय पुरुष रा.हनुमान मंदिराजवळ, तेरखेडा ता.
उस्मानाबाद.( अँटीजेन टेस्ट )
उमरगा तालुका -06.
1) 56 वर्षीय पुरुष. रा. मशालकर गल्ली, उमरगा
2) 30 वर्षीय महिला रा. ,माशाळकर गल्ली, उमरगा
3) 17 वर्षीय, मुलगी रा. माशाळकर गल्ली, उमरगा
4) 36 वर्षीय पुरुष रा. उमरगा
5) 70 वर्षीय पुरुष रा.मुनशी प्लॉट उमरगा
6) 50 वर्षीय पुरुष. रा. कुंभार पट्टी, उमरगा
रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 27 संशयितांची
तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 04 रुग्ण
पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले असून ते वरील
यादीमध्ये त्यांचा समाविष्ट केलेला आहे.
त्यामळे आज एकूण 10 रुग्णांची बाधितांमध्ये भर
पडली आहे...
मृत्यू बाबतची माहिती ➦60 वर्षीय महिला, रा. उंबरे
गल्ली, उस्मानाबाद.
➤ जिल्ह्यातील एकूण रुग्ण -583
➤जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण -348
➤जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण -206
➤जिल्ह्यातील एकूण मृत्यू -29
Tuesday, 21 July 2020
उस्मानाबाद - विद्यापीठ उपपरिसर कोविड 19 संशोधन केंद्रास मंजुरी
उस्मानाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसर येथील कोविड
संशोधन केंद्रास (Covid-19TestingsResearch
Facility Center)आयसीएमआरची अंतिम मंजुरी
प्राप्त झाली आहे. विद्यापीठाच्या औरंगाबाद परिसरात
यापूर्वीच लॅब सुरू झाली असून दोन नॉन मेडिकल लॅब
असणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यात कोरोना संख्या झपाट्याने
वाढत असल्याने या दोन्ही लॅब केव्हा सुरू होणार
याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.या संदर्भात अखिल
भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (AIIMS)
यांच्यावतीने मंजुरी देण्यात आल्याचे पतघ मंगळवार
(दि.21) प्राप्त झाले, अशी माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद
येवले यांनी दिली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल
रिसर्च (ICMR) यांच्या वतीने 'एम्सला' कोरोना टेस्टिंग
लॅब सुरु करण्यास मान्यता देणे बाबतचे अधिकार
देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक ती तयारी
करून मान्यता मिळण्यासाठी विद्यापीठाने पाठपुरावा
केला.एम्स'च्या टीमने विद्यापीठातील लॅबसाठी उपलब्ध
असलेले कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा,यंत्रसामुग्री
या संबंधीची संपूर्ण पाहणी करून अहवाल सादर केला.
त्यानंतर स्वॅब टेस्टिंग सुरू करण्यास मान्यता मिळाली
आहे.
टेस्टिंग लॅब दि.२२ पासून कार्यान्चित
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
उस्मानाबाद परिसरातील कोरोना टेस्टिंग लॅब दि.२२
पासून कार्यान्वित होत आहे. व्यवस्थापन परिषदेचे
सदस्य संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने ही लॅब
साकारत आहे. विद्यापीठ व सीएसआर फंडातून सदर
लॅब साकारली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या
कामाचा पाठपुरावा करून उस्मानाबाद वासियासाठी
लॉकडाऊन काळातील दिलासादायक असे मोठे काम
करीत आहेत. कुलगुरू डॉ प्रमोद येवले,जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ मुंडे, उपपरिसर संचालक डॉ. डी. के
गायकवाड, नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत दीक्षित
यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांचे सहकार्य
लाभत आहे.
या संशोधन केंद्रास लवकरच नॅशनल अॅक्रीडिटेशन बोर्ड
फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलीब्रेशन लॅबोरेटरीज' यांच्यावतीने
अधिस्वीकृतीचे पत्रही मिळणार आहे. या केंद्रात
अगोदरच ट्रायल स्वॅब टेस्टिंगचे काम सुरु करण्यात
आलेले आहे. आता आयएमसीआरची मान्यता
मिळाल्याने हे काम गतीने होणार आहे.
विद्यापीठासाठी अभिमानाचा क्षण : कुलगुरू
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
कोरोना टेस्टिंग लॅबचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. आता
उस्मानाबाद उपपरिसर येथील टेस्टिंग लॅब सुरू होत
आहे.ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया
कुलगुरु डॅ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.
मराठवाड्यात व विशेषत: औरंगाबाद, बीड,उस्मानाबाद
परिसरासात संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना
टेस्टिंग व अन्य संशोधन कार्य होणे गरजेचे आहे.
त्यामुळे कोरोना संदर्भात संशोधन या केंद्रात लगेचच
सुरू करण्यात येणार आहे. सीएसआर फंडातून कोटी
व विद्यापीठाचे वीस लाख असा हा एक कोटी २० लाख
रुपयांचा निधी मंजूर करून कोविड संशोधन केंद्र
तातडीने उभे केल्याबद्दल उस्मानाबाद यांच्या वतीने
कुलगुरू, जिल्हाधिकारी, व्यवस्थापन परिषदेचे सर्व
सदस्य सीएसआर फंड देणाऱ्या सर्व संस्था यांचा
आभारी आहे. असे व्यवस्थापन परिषद सदस्य संजय
निंबाळकर म्हणाले. आगामी काळात कोविङ-19 चा
प्रसार रोखण्याकरिता हे संशोधन केंद्र काम करणार
असून या कोरोना युद्धात अनेक कोरोनायोद्धे जसे की,
डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे स्वत:च्या जिवावर उदार
होऊन प्रतिकुल परिस्थितीत काम करित आहे. आणि
या कोरोना योद्ध्यांना काम करत असताना विषाणुचा
संसर्ग होतो तेव्हा आपण हा संसर्ग कसा होतो? आणि
त्याचा प्रसार होण्यास कसा अटकाव करता येईल, या
केंद्रात संशोधन करून या माध्यमातून अनेकांचे प्राण
वाचण्यास मदत होणार आहे.
Monday, 20 July 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 21ST, 2020 AT 10-00 AM
#CoronaUpdate
दि. 19/07/2020 रोजी #उस्मानाबाद येथून 148 स्वाब नमुने तपासणी साठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्सचा अह
वाल खालीलप्रमाणे आहे.
*पाठवलेले स्वाब नमुने - 148.
*प्राप्त रिपोर्ट्स - 148.
*पॉजिटीव्ह - 16.
*अनिर्णित - 2.
*नेगेटिव्ह - 130.
तसेच रॅपिड अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून 04 पाॅजिटीव असे एकूण 20 रूग्णांची भर पडली आहे.
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 20,2020 AT 7-00 PM
प्रेस नोट
*दि. 20/07/2020
सायंकाळी 07:00 वाजता
* जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 200 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
*पाठवलेले स्वाब नमुने - 200.
*प्राप्त रिपोर्ट्स - 200
*पॉजिटीव्ह - 37
*अनिर्णित - 2
*नेगेटिव्ह - 161
*पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
*उस्मानाबाद तालुका - 01.
1) 60 वर्षीय महिला रा. उंबरे गल्ली, उस्मानाबाद.
*उमरगा तालुका -26
1) 25 वर्षीय पुरुष. रा. उमरगा.
2) 50 वर्षीय पुरुष रा. शिवाजी चौक, उमरगा.
3) 36 वर्षीय महिला, रा. पतंगे रोड, उमरगा.
4)13 वर्षीय मुलगा, रा. पतंगे रोड, उमरगा.
5) 30 वर्षीय महिला, अजय नगर, उमरगा.
6) 35 वर्षीय महिला, रा. अजय नगर, उमरगा.
7) 40 वर्षीय पुरुष, अजय नगर, उमरगा.
8) 03 वर्षीय मुलगा, अजय नगर, उमरगा.
9) 40 वर्षीय महिला, अजय नगर, उमरगा.
10) 55 वर्षीय महिला, आरोग्य नगर, उमरगा.
11) 65 वर्षीय पुरुष, आरोग्य नगर, उमरगा.
12) 51 वर्षीय पुरुष, रा. गोंधळवाडी ता. उमरगा.
13) 55 वर्षीय महिला रा मुळज, ता. उमरगा.
14) 20 वर्षीय पुरुष रा. घोटळ ता. उमरगा.
15)14 वर्षीय मुलगा रा. सानेगुरुजी नगर उमरगा
16) 68 वर्षीय पुरुष, सानेगुरुजी नगर, उमरगा.
17) 32 वर्षीय पुरुष, सानेगुरुजी नगर, उमरगा.
18) 21 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
19) 60 वर्षीय महिला , सानेगुरुजी नगर, उमरगा.
20) 38 वर्षीय पुरुष, सानेगुरुजी नगर, उमरगा.
21 ) 05 वर्षीय मुलगा, सानेगुरुजी नगर, उमरगा.
22) 30 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
23) 38 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
24) 30 वर्षीय महिला, सानेगुरुजी नगर, उमरगा.
25) 68 वर्षीय पुरुष सानेगुरुजी नगर, उमरगा.
26) 6 वर्षीय मुलगी रा. साने गुरुजी नगर उमरगा
*तुळजापूर तालुका -06
1) 26 वर्षीय पुरुष रा. काटी
ता. तुळजापूर.
2) 07 वर्षीय मुलगा रा. काटी ता. तुळजापूर
3) 23 वर्षीय महिला, रा. काटी ता. तुळजापूर.
4) 40 वर्षीय महिला रा. काटी ता. तुळजापूर.
5) 81 वर्षीय पुरुष रा आंदूर ता. तुळजापूर.
6) 70 वर्षीय महिला रा. आंदूर ता. तुळजापूर.
* परांडा ता -01
1) 21 वर्षीय महिला रा. बावची ता. परांडा.
* वाशी तालुका -02
1) 65 वर्षीय पुरुष रा तेरखेडा ता. वाशी.
2) 60 वर्षीय पुरुष रा. तेरखेडा ता. वाशी.
* भूम तालुका - 01
1) 70 वर्षीय पुरुष रा. राळेसांगवी, ता. भूम.
* रॅपिड अँटीजेन किट च्या माध्यमातून एक 24 वर्षीय पुरुष रा. मुलांचे वसतिगृह, आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद हा पॉसिटीव्ह आला आहे.
* मृत्यूची माहिती -
*38 वर्षीय पुरुष रा. विजय क्लिनिक उमरगा यांचा सोलापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
*59 वर्षीय पुरुष रा. टाकळी सुंभा यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे मृत्यू झाला आहे.
* बाहेरील जिल्ह्यांमध्ये उपचार घेत असलेल्या 7 रुग्णांची भर पडली आहे.
* त्यामळे आज एकूण 45 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
* जिल्ह्यातील एकूण रुग्ण -553
* जिल्ह्यातील एकूण डिस्चार्ज - 338.
*जिल्ह्यातील एकूण मृत्यू -28
* एकूण उपचारा खालील रुग्ण - 187.
⭕ वरील माहिती. दि 20/07/2020 रोजी सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत ची आहे.
Saturday, 18 July 2020
OSMANABAD CORONA VIRUS UPDATES ON JULY 19,2020 AT 10-30 AM
कोरोनाचा कहर : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी १२
रुग्णाची भर , दोघांचा मृत्यू
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर
सुरुच आहे. जिल्ह्यात रविवारी १२ रुग्णाची भर पडली
असून गेल्या २४ तासात दोघांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरात शंभरपेक्षा अधिक
रुग्ण झाले आहेत.
दि. 18/07/2020 रोजी रात्री उशिरा स्वा. रा. ती.
ग्रा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथून 150 रिपोर्ट्स
प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे.
प्राप्त रिपोर्ट्स -150
पॉजिटीव्ह -12.
नेगेटिव्ह -138.
12 पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे.
उस्मानाबाद तालुका - 09
1) 53 वर्षीय पुरुष रा. गालिब नगर , अभिनव
शाळेजवळ, उस्मानाबाद.
2) 52 वर्षीय पुरुष. रा. आगड गल्ली, उस्मानाबाद
( मृत्यू ).
3) 25 वर्षीय महिला. रा. बार्शी नाका, उस्मानाबाद.
4) 30 वर्षीय महिला रा. शाहू नगर, उस्मानाबाद.
5) 25 वर्षीय पुरुष रा. धारासूर मर्दिनी मंदिरा जवळ,
उस्मानाबाद.
6) 30 वर्षीय पुरुष रा. एस. टी. कॉलनी, सांजा चौक,
उस्मानाबाद.
7) 24 वर्षीय पुरुष, रा. मुलांचे वसतिगृह, आयुर्वेदिक
कॉलेज, उस्मानाबाद.
8) 30 वर्षीय पुरुष, रा. कौडगाव (बावी ), पोस्ट - खेड.
ता. उस्मानाबाद.
9) 59 वर्षीय पुरुष रा. पोहनेर ता. उस्मानाबाद.
उमरगा तालुका -01.
1) 40 वर्षीय पुरुष. रा. हमीद नगर , उमरगा.
तुळजापूर तालुका -02.
1) 30 वर्षीय महिला रा. जळकोट ता. तुळजापूर.
2) 47 वर्षीय पुरुष रा. एस. टी. कॉलनी, तुळजापूर.
त्यामळे आज एकूण 12 रुग्णांची बाधितांमध्ये भर
पडली आहे.
कोरोना मृत्यू बाबतची माहिती.
1) 52 वर्षीय पुरुष. रा. आगड गल्ली, उस्मानाबाद.
( उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात ).
2) 50 वर्षीय पुरुष रा. उमरगा
( सोलापूर येथे उपचारादम्यान मृत्यू )
➤जिल्ह्यातील एकूण रुग्ण -508.
➤जिल्ह्यातील एकूण मृत्यू -26.
वरील माहिती. दि 19/07/2020 रोजी सकाळी
10.30 वाजेपर्यंत ची आहे.
Admission घेताना हे लक्षात ठेवा
फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.......
अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला,
नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या
पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका.
पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे
जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख,
जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या
पद्धतीनेच भरावी. उदा.- आडनाव, पालकांचे नाव,
स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये
अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्सवर
माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा
मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने
पालन करा.
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड
कॉपी बरोबर ठेवा.
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्नावली भरावी लागते.
त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का
हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण,
करिक्युलर ऍक्टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्न असतात.
अशा प्रश्नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या
असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते
पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या
जवळ बाळगा.
-----------------------------
काही महत्त्वाची संकेतस्थळे
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल
मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय,
महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र
शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)
"एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा
आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in
8) फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर सेक्युरिटी
www.pcfscs.in
👏👏
बारावी नंतर पुढे काय? भाग-4
शिक्षण - बारावी
शास्त्र कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
फक्त मुलींसाठी
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन,ई-कॉम
डेव्हलपमेंट,वेब ग्राफिक्स ऍण्ड ऍनिमेशन कालावधी
एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
रोजगाराभिमुख कोर्सेस
शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी, म्हैसूर
शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि
मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम
ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस
कालावधी - तीन वर्षे
हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम
टूरिस्ट गाइड
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे.
------------------------------
बांधकाम व्यवसाय
------------------------------
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र,NATA , JEE
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम
उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा पुढील उच्च
शिक्षण - एमआर्च, एमटेक
पारंपरिक कोर्सेस
------------------------------
शिक्षण - बीएससी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था,
नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए,
एमपीएम इत्यादी.
------------------------------
शिक्षण - बीएससी(Agri)
कालावधी - 4 वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र व CET
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी
कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी
परिषद संस्थांमध्ये संशोधन
------------------------------
शिक्षण - बीए
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये,
प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी
जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका,
एलएलबी
-----------------------------
शिक्षण - बीकॉम
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा
अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा
परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी
----------------------------------------------------
शिक्षण - बीएसएल
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी
सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम
------------------------------
शिक्षण - डीएड
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड
----------------------------------------------------
शिक्षण - बीबीए,बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात
नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा पुढील उच्च
शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए
------------------------------
फॉरेन लॅंग्वेज
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,जॅपनीज,
कोरियन)
कालावधी -बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
----------------------------------
बारावी नंतर पुढे काय? भाग-3
----------------------------------------------------
शिक्षण - डिफार्म
----------------------------------------------------
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी,
स्वतःचा व्यवसाय.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म
----------------------------------------------------
शिक्षण - बीफार्म
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था
इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी
सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म
------------------------------
संरक्षण दलांत प्रवेशासाठी
------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून
एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी
परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण
मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी
परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण
आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे
उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय
असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
------------------------------
अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल
------------------------------
शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या
वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा
व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
शिक्षण - बीई
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक
क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच
जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - बीटेक
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई,
एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी
उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व
अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा
जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन,
तत्सम शिक्षण.
--------------------------------------------------
कॉम्प्युटरमधील कोर्सेस
------------------------------
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
----------------------------------------------------
बारावी नंतर काय? भाग- 2
वैद्यकीय क्षेत्र
----------------------------------------------------
शिक्षण - एमबीबीएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि NEETप्रवेश
परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात
नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
शिक्षण - बीएएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात
नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका
----------------------------------------------------
शिक्षण - बीएचएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात
नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडी
----------------------------------------------------
शिक्षण - बीयूएमएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात
नोकरी.
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
शिक्षण - बीडीएस
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, NEET
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात
नोकरी
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस
---------------------------------------------------
शिक्षण - बीएससी फाँरेन्सिक सायन्स अँड सायबर
सेक्युरिटी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - सिबीआय,सीआयडी, न्याय सहायक
संस्था, पोलीस,औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी
सेवा परीक्षा, स्वयंरोजगार इत्यादी.
–-----------------------------------------------
शिक्षण - बीएससी इन नर्सिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी .
----------------------------------------------------
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र NEET
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी
संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
----------------------------------------------------
बारावी नंतर काय? भाग-1
मेडीकल व इतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
👈🏿
----------------
1) *नीट* ऑनलाईन फॉर्म प्रिंट
2) *नीटप्रवेश* पत्र
3) *नीट मार्क* लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस
11) आधार कार्ड
12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते
14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड
मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
----------------------------------------------------
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण
करून घ्यावे.
----------------------------------------------------
👉🏿 *इंजिनीअरिंग* प्रवेशासाठी लागणारी
कागदपत्रे👈🏿
----------------------------------------------------
1) *MHT-CET* आँनलाईन *फाँर्म* प्रिंट
2) MHT-CET* पत्र
3) MHT-CET* मार्क लिस्ट
4)10 वी चा मार्क मेमो
5)10 वी सनद
6) 12वी मार्क मेमो
7) नँशनँलीटी सर्टीफिकेट
8 ) रहिवाशी प्रमाणपत्र
9)12 वी टी सी
10) आधार कार्ड
11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा
12) राष्ट्रीय बँकेतील खाते
13) फोटो.
----------------------------------------------------
*मागासवर्गीयांसाठीवरील सर्व व खालील प्रमाणपत्रे*
----------------------------------------------------
1) जातीचे प्रमाणपत्र
2) जात वैधता प्रमाणपत्र
3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र
( मागील काढलेले असेल तर 31 मार्च2021 पर्यत लागू)
कृपया वरील कागदपत्रे अपुर्ण असतील तर त्वरीत पुर्ण
करून घ्यावे
----------------------------------------------------
शिक्षक व विद्यार्थी हिताचा विचार करूनच शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर ( टीम अचूक बातमी ) : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदल्या शिक्षक व विद्यार्थी हिताचा विचार करुनच केल्या जातील, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिली असल्याची माहिती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
शनिवार ( १८ जुलै ) राज्याचे बदली धोरण व शिक्षकांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदधिकारी यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते. या वेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात ,प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, पुणे जिल्हासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, उस्मानाबाद जिल्हासंघाचे अध्यक्ष संतोष देशपांडे ,सातारा जिल्हासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव व पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक संघाने मागणी केलेल्या सर्व विषयावर या वेळी चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळेतील सन २०१८ व २०१९ मध्ये रेण्डम राऊंड ,विस्थापित होऊन व समायोजनामध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांची विनाअट बदली करण्यात यावी. या बदल्या करताना समानिकरणच्या नावाखाली रिक्त ठेवलेल्या जागा दाखवण्यात याव्यात, प्रशासकीय कारणावरुन तालुका बाहेर बदली करण्यात येऊ नये, बदल्याची खो,खो पद्धत बंद करण्यात यावी, त्यासोबतच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती करण्यात यावी, आतर जिल्हा बदलीसाठी राज्य रोष्टर ग्राह्य धरावे, संगणक प्रशिक्षण नसलेल्या शिक्षकांची सेवानिवृतीच्या वेळी वेतनवाढ वसुली थांबवावी, कोविड १९ संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात बदली प्रक्रिया ऑनलाईनच राबवावी या बाबींवर चर्चा करण्यात आली.
या वेळी मुश्रीफ यांनी सांगितले, आपण फक्त गैरसोय झालेल्या शिक्षकांच्याच बदल्या करू अनावश्यक बदल्या होणार नाहीत तसेच बदल्यात संपुर्ण पारदर्शकता असेल, बदल्याची गरज असेल तरच आपण बदल्या करू, मुश्रीफ यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी बोलावून बैठकीत प्रश्नांची सोडवून केल्याबद्दल त्यांचे संतोष देशपांडे यांनी आभार मानले.
Subscribe to:
Comments (Atom)













