Wednesday, 3 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 06 कोरोना रुग्ण वाढले 


उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद तालुका 4 कळंब तालुका 2 आणि उमरगा 1 अश्या सात रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 94  झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७० जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यातआले  आले होते, पैकी  ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर सात जणांचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले आहेत, तर २ अहवाल Inconclusive तर २ अहवाल पेंडिंग आहेत. 

आज प्राप्त रिपोर्ट  पैकी एकूण  सात जण पॉसिटीव्ह आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण  उस्मानाबाद शहरातला पूर्वीचाच रुग्ण आहे ज्याचा स्वाब  पॉजिटीव्ह आला  आहे, म्हणजे नवीन  सहा रुग्णात भर पडली आहे. 

नवीन सहा रुग्ण  

एक रुग्ण केसरजवळगा ता. उमरगा येथील  येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. दुसरे दोन रुग्ण  अंदोरा ता. कळंब येथील असून ते 29 मे रोजी मुंबई रिटर्न आहेत. एक रुग्ण धुता येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण सुंभा येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक रुग्ण कारी  येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. असे एकूण नवीन सहा रुग्ण व एक जुनाच रुग्ण  आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत

 सापडलेले कोरोना रुग्ण - 94 

एकूण बरे झालेले  रुग्ण - 41 

उपचार घेत असलेले रुग्ण - 50 

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3 


Tuesday, 2 June 2020

उस्मानाबाद दि.02/06/2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण वाढले

 उस्मानाबाद दि.02/06/2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचे 11 रुग्ण वाढले

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उस्मानाबाद शहरातील 8, कळंब शहरातील 2 आणि कळंब तालुक्यातील शिरढोण येथील 1 अश्या 11 जणांचा समावेश आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या आता 88 झाली आहे.

आज दि. 2 जून  रोजी 55 स्वाबचे रिपोर्ट  प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे  रिपोर्ट  पॉजिटीव्ह  आलेले आहेत. 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेले आहेत. एक  जणांचा रिपोर्ट  inconclusive आला आहे.

पॉजिटीव्ह  पेशंटची  माहिती 

8 रुग्ण उस्मानपुरा, उस्मानाबाद  येथील असून ते नळदुर्ग  येथील पूर्वी पॉजिटीव्ह  आलेल्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. 

2 रुग्ण   कळंब  येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत  व  एक रुग्ण  शिराढोण येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी 77 रुग्ण होते, त्यापैकी 3 मयत झाले असून, 32 जण बरे झाले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाची संख्या आता 53 झाली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 88

एकूण बरे झालेले  रुग्ण - 32

उपचार घेत असलेले रुग्ण - 53

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3


Monday, 1 June 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्ण वाढले

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्ण वाढले 

एकूण रूग्ण-77


उस्मानाबाद जिल्ह्यातील आणखी चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता 77 झाली आहे. 


कोरोनाचा तिसरा बळी 


उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज  सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला   तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले  नाही.  

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले 

एकूण कोरोना रुग्ण - 77 

एकूण बरे झालेले  रुग्ण - 19  

उपचार घेत असलेले रुग्ण - 55 

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3 

उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी

उस्मानाबादेत कोरोनामुळे तिसरा बळी 

एकूण ७३ 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने आता तिसरा बळी घेतला आहे. शिराढोण ता.कळंब येथील एक ६४ वर्षाची महिला आज  सकाळी उस्मानाबादच्या रुग्णालयात मरण पावली. या महिलेला   तीन दिवसापूर्वी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  तिला कोरोना कश्यामुळे झाला, हे अजूनही स्पष्ट झालेले  नाही. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  रविवारी दोन  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.  

उस्मानाबाद जिल्हयातील काल ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन  व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला आहे. आणखी  दहा  अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज  येणार आहे, त्यामुळे आणखी धाकधूक वाढली आहे.  


Sunday, 31 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन रुग्ण वाढले,

एकूण ७३
आणखी दहा अहवाल प्रलंबित , चिंता वाढली


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  रविवारी दोन  जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता ७३ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात नळदुर्ग शहरातील  एक ५० वर्षांचा  एक पुरुष आणि सुंभा ता. उस्मानाबाद येथील ५३ वर्षांचा एक पुरुष आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील ९० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी ७५   व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन २  व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व तीन  व्यक्तीचा  अहवाल Inconclusive आला आहे. आणखी  दहा  अहवाल प्रलंबित असून, त्यांचे रिपोर्ट आज रात्री उशिरा किंवा उद्या येणार आहेत. 

Saturday, 30 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात ,एकूण 71

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पॉजिटीव्ह सात 


 आज सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह
आला आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील
कोरोना रुग्णाची संख्या आता ७१ झाली आहे.
आज पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णात कळंब शहरातील
 पाच ( मुंबई  रिटर्न ), शिराढोण ( ता. कळंब )
येथील  एक आणि बेडगा ( ता. उमरगा ) येथील एक
असा समावेश आहे.  शिराढोण  आणि बेडगा रुग्ण
अगोदरच्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील 52 व्यक्तींचे स्वॅब
तपासणीसाठी आले होते त्यापैकी 44 व्यक्तींचे
अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल
 पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा  अहवाल
Inconclusive आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना
रुग्ण - ७१ एकूण बरे झालेले  रुग्ण - १५उपचार घेत
असलेले रुग्ण - ५४ एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - २

Friday, 29 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोन पॉजिटीव्ह 

एकूण ६४ , 2 मृत्यू 

उस्मानाबाद  -  जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आज पॉजिटीव्ह आला आहे. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तो रुग्ण कोंड ( ता. उस्मानाबाद ) येथील रहिवासी आहे. त्यामुळे जिल्ह्यात  कोरोनामुळे बळींची संख्या दोन झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात आज  

( शुक्रवार ) कोरोनाचा  पहिला बळी गेला  आहे. 

उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका  

कोरोनाग्रस्त रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. तो मुंबईहुन गावी आला होता. गंभीर बाब म्हणजे  

त्या रुग्णाच्या घरातील आणखी दोघेजण 

कोरोनाग्रस्त आहेत. 

मरण पावलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय

 ६७ असून तो मुंबईहून गावी आला होता. मुंबईत

 रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या या 

रुग्णाला २५ मे रोजी उमरगा उपजिल्हा 

रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात 

आले होते, त्याचा २६ मे रोजी कोरोना रिपोर्ट 

पॉजिटीव्ह आला होता तर आज मृत्यू झाला.

 त्यास मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता, त्यात 

कोरोना झाल्यामुळे त्याचा श्वासोश्वास कोंडत

 होता. त्यामुळे त्याचा  मृत्यू झाल्याचे जिल्हा

 शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी

 सांगितले. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६२  जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले 

असून पैकी पंधरा  जणांना डिस्चार्ज देण्यात 

आला आहे.  सद्यस्थितीत ४७  रुग्ण उपचार

 घेत आहेत.   पैकी एकाचा मृत्यू  झाला आहे.  


Thursday, 28 May 2020

उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 रुग्ण #पॉझिटिव्ह

#उस्मानाबाद 44 रिपोर्ट प्राप्त


शहरातील सात रुग्ण पॉजिटीव्ह असून पापनाश नगर येथील पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत. दोन रुग्ण बेडगा (उमरगा) येथील असून पूर्वीच्या कॉन्टॅक्ट मधील आहेत.जिल्ह्यात एकूण संख्या 62.दोन inconclusive, 1पेंडिंग. 33 नेगेटिव्ह. आज एकूण जिल्ह्यातील 9 रुग्ण #पॉझिटिव्ह 

ऋषींची नावे ओळखा

 ऋषींची नावे ओळखा 

********************

१.ज्यांनी समुद्रप्राशन केला...??

२.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती...??

३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते...??

४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते...??

५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार...??

६.चंद्राचे वडील...??

७.महर्षी वेद व्यासांचे वडील...??

८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता...??

९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता...??

१०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे...??

११.श्री रामाचे गुरु...??

१२.श्री कृष्णा चे गुरु...??

१३.कौरव आणि पांडव यांचे गुरु...??

१४.द्रोण भीष्म पितामह यांचे गुरू...??

१५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता...??

१६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता...??

१७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे...??

१८.लवकुशांचा सांभाळ केला

१९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो

२०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले...?? 

****************************************************** 

 ऋषींची नावे ओळखा

१.ज्यांनी समुद्रप्राशन केला...

अगस्ती

२.ह्या ऋषींना भगवान परशुरामांनी पृथ्वी दान केली होती...??

कश्यप 

३.ह्या ऋषींनी कुंतीला वरदान दिले होते...??

दुर्वास

४.ह्या ऋषींच्या अस्थी पासून एक शस्त्र बनविले होते...??

दधिची

५. परशुरामाचे वडील आणि शंकराचा एक अवतार...

जमदग्नी

६.चंद्राचे वडील...??

अत्रीऋषी

७.महर्षी वेद व्यासांचे वडील...

पाराशर

८.ह्या ऋषींचा ग्रह , तारे, तसेच भविष्य शास्त्र याचा अभ्यास होता...??

भृगू, बृहस्पती

९.मेनका हिने या ऋषींचा तपोभंग केला होता...??

विश्वामित्र

१०.विष्णूचा अवतार वामन ह्यांच्या आई वडिलांची नावे...??

कश्यप आदिती

११.श्री रामाचे गुरु...??

वसिष्ठ

१२.श्री कृष्णा चे गुरु...??

सांदिपनी

१३.कौरव आणि पांडव यांचे गुरु...??

द्रोणाचार्य

१४. भीष्म पितामह यांचे गुरू...??

परशुराम

१५.ह्या ऋषींनी शकुंतला हीचा सांभाळ केला होता..

कण्व

१६.ह्या ऋषींचा अणु रेणू चा अभ्यास होता...??

कणाद

१७.या ऋषींच्या नावाने एक पक्षी आहे..

शुकमुनी

१८.लवकुशांचा सांभाळ केला

वाल्मिकी

१९.गुरुपौर्णिमा हा उत्सव यांचे स्मरण म्हणून केला जातो

महर्षि वेदव्यास

२०. गणपतीस्तोत्र या महर्षींनी लिहिले...नारद

Wednesday, 27 May 2020

शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला-४५)

दि. २८ मे २०२०  वार-गुरूवार


*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-४५)


नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.

    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा. या सोबतच सुरू आहे ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती तयारी आणि इ.१० वी अभ्यास!

    

       ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.


https://bit.ly/dikshadownload


*कोरोना योद्धा*

https://bookyboo.com/virus-warrior-marathi


*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*

खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेल्या फोन कॉल वर सांगितलेल्या सूचना ऐका व गोष्टीचा आनंद घ्या.

08033094243


*Story weaver*

अक्कूला आवरेना राग!

https://bit.ly/36y0zZF


*अवांतर वाचन*

आजच्या पुस्तकाचे नाव : मावशीचे पायमोजे

https://bit.ly/2TKhe7n


*चित्रकला*

संकल्प चित्र : रेखांकन व रंगकाम

https://bit.ly/3gppq6H


*Reading English*

Long words with 'y'

https://bit.ly/36JjL7b


*संगणक विज्ञान*

Scratch part 5

https://bit.ly/2zBg7zP


*संगीत/नाटक*

गायन

राग - भूपाळी

https://bit.ly/36yaOx7


*मजेत शिकूया विज्ञान*

हवेला वजन असते का?

https://bit.ly/2A8dC8j


*इयत्ता १०वी अभ्यासमाला*

विषय - गणित भाग २

पाठ - विभाजनाचे सूत्र भाग १

https://bit.ly/2ZFca7P


*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*

*इयत्ता - ५ वी*

विषय - बुद्धिमत्ता चाचणी

घटक - सांकेतिक भाषा भाग १

https://bit.ly/2ZCtnip


*इयत्ता - ८ वी*

विषय - गणित

घटक - सांख्यिकी 

उपघटक - मध्यमान

https://bit.ly/36AgXcd


*Stay home, stay safe!*


आपला

*दिनकर पाटील,*

*संचालक*

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

अर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळया खरेच उपयोगी आहेत का?

सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून Arsenic album 30 हे औषध खूप चर्चेत आहे. 

हे औषध खरेच काम करते का, कसे घ्यायचे, पथ्य काय वगैरे प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवलेले  आहेत. 
ह्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे पाहुयात 

प्रश्न  1 *अर्सेनिक अल्बम ह्या गोळया खरेच उपयोगी आहेत का?* 


उत्तर   *होय,  आयुष मंत्रालयाने सुचवलेले हे औषध केरळ समवेत आठ हुन अधिक राज्यांमध्ये जनतेला देण्यात आले आणि निष्कर्ष तपासण्यात आले. ज्यांनी ह्या औषधाचे फक्त तीनच डोस घेतले त्यांना कोरोना झाला नाही हे टेस्ट मधून सिद्ध झाले.*

प्रश्न 2 
*ह्या औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत का?*
उत्तर  
*हे होमिओपॅथीचे औषध आहे ज्याला कोणतेही साईड इफेक्ट्स नसतात. आठ राज्यांतील कोट्यवधी जनतेला हे औषध दिल्यावर कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवलेले नाहीत*

प्रश्न 3 
*फक्त तीन डोस मूळे कोरोना पासून संरक्षण कसे काय मिळते?*

उत्तर  
*हे औषध फक्त तीनच डोस मध्ये रोग प्रतिकारशक्ती किंवा immunity इतकी वाढवते की तुमचे कोरोना तसेच इतरही viral infection पासून बचाव होऊ शकतो*

प्रश्न  4
*मग ही immunity किती दिवस टिकते?*

उत्तर 
 *सर्वसाधारण पणे 1 महिना ही immunity टिकते, म्हणजे 1 महिन्यानंतर पुन्हा हे औषध घ्यावे असे सुचवण्यात आलेले आहे*

प्रश्न  5 
*लहान मुलांना हे औषध दिले तर चालेल का?*

उत्तर 
 *होय, लहान मुलांना immunity वाढवण्याची खरी गरज असते, त्यामुळे त्यांना आवर्जून द्यावे, गरोदर किंवा डिलिव्हरी झालेल्या स्त्रिया  तसेच वयस्कर व्यक्तींना सुद्धा द्यावे*

प्रश्न 6
 *लहान मुलांना किती गोळया द्यायच्या?*

उत्तर  
*लहान मोठे सर्वाना सारखाच डोस म्हणजे 2 ते 3 गोळया असे 3 दिवस द्यावे*

प्रश्न 7
  *काही ठिकाणी गोळया  च्या ऐवजी liquid मिळते ते कसे घ्यायचे?*

उत्तर  
 *liquid चे 1 ते 2 थेंब थेट तोंडात टाकावेत*

प्रश्न 7
 *ह्या औषधाचे काही पथ्य आहे का?*

उत्तर  
*हे औषध सुरु असताना आठवड्याभर कच्चा कांदा खाऊ नये,  भाजीतला शिजलेला कांदा चालेल,  तसेच कॉफी पिऊ नये, चहा पिऊ शकता*

प्रश्न 8
 *मला कोणताही त्रास किंवा लक्षण नाही, मग निरोगी व्यक्तीने घेतले तर चालेल का?*

उत्तर  
*हे औषध आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता घ्यायचे आहे, कोरोना पासून बचाव होण्याकरिता सर्वांनी घ्यावे*

प्रश्न  9
*ज्यांना BP डायबेटीस आहे त्यांनी घेतले तर चालेल का?*

उत्तर  
*होय, उलट अश्या लोकांना तसेच किडनी रोग कँसर दमा वगैरे व्याधी असलेल्यांनी हे औषध आधी घ्यायला हवे, ते कोरोना ला जास्त susceptible असतात*, *म्हणजे त्यांना कोरोना चा धोका अधिक असतो तसेच कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रमाण जास्त असते*. 
*ह्या लोकांनी आधीच सुरु  असलेल्या औषधांसोबत Arsenic alb चे 3 डोस नक्की घ्यावेत*

प्रश्न 10
 *सध्या औषध योग्य काळजी न घेता बनवत असल्याचा व्हिडिओ फिरत आहे, मग चांगले खात्रीचे औषध कसे व कुठे मिळेल?*

उत्तर   
*सध्या औषधाच्या प्रचंड मागणी मूळे  तुटवडा निर्माण झालेला आहे. अश्या वेळी पैसे कमावण्याची  उत्तम संधी म्हणून असे प्रकार घडणे शक्य आहे,*  *तसेच वाढीव किमतीत औषध विकण्याचे प्रकार सुद्धा सुरु झालेत.* 
*अश्या वेळी तुम्ही तुमच्या खात्रीच्या होमिओपॅथी मेडिकल दुकानातून औषध आणावे.* 
*किंवा होमिओपॅथी डॉक्टर कडूनच  हे औषध घ्यावे*

प्रश्न 11
 *औषध देणारा मेडिकल वाला वेगळा डोस सांगतो, व्हाट्सअप वर वेगळा डोस सांगितला आहे,  नक्की कोणाचे ऐकावे?*

उत्तर   
*आयुष मंत्रालयाने सुचवलेला डोस आहे  2 ते 3 गोळया रोज सकाळी उपाशीपोटी एकदा असे 3 दिवस*. 
*फक्त हाच डोस घ्यावा*

प्रश्न  12 
*हे औषध आम्हाला कुठे मिळते किंवा होमिओ मेडिकल कुठे आहे हे ठाऊक नाही, मग आम्ही काय करावे?*

उत्तर  
*तुम्ही गुगल वर homeopathic medicine near me  असे लिहून search करावा, जे results येईल त्यांच्या नंबर वर फोन करून विचारावे*

प्रश्न  12
*arsenic alb 30 चा  stock संपलाय किंवा मिळतच नसेल तर पर्यायी दुसरे औषध आहे का? ते कसे घ्यावे?*

उत्तर  
*जर आर्सेनिक अल्बम मिळू शकत नसेल तर त्या ऐवजी  Camphor 1M* 
*किंवा Bryonia 200 ह्या होमिओपॅथी औषधाच्या 4 गोळया सकाळ संध्याकाळ असे दोनच दिवस घ्यावे.* 
*ह्या पर्यायी औषधाने सुद्धा उत्तम पैकी बचाव होऊ शकतो*

प्रश्न  13
*मग अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही ही दोन किंवा तिन्ही औषधे एकत्र किंवा एकानंतर दुसरे असे घेतले तर चालेल का?*

उत्तर 
 *होमिओपॅथीची काही औषधे एकमेकांविरुद्ध कार्य करतात, तर काही एकमेकांचा प्रभाव नष्ट करतात.* 
*Camphor 1M हे असेच एक औषध आहे जो इतर औषधांचा प्रभाव नष्ट करतो.* 
*त्यामुळे Arsenic, Camphor, Bryonia ह्यांपैकी कोणतेही एकच औषध घ्यावे व तेच 15 दिवस ते महिन्यानंतर परत घ्यावे.* *आधीचे सोडून दुसरे औषध घ्याल तर कोणत्याच औषधाचा प्रभाव होणार नाही व संरक्षण मिळणार नाही*

प्रश्न 14 *आमच्याकडे ही औषधे मिळतच नाहीत किंवा असे होमिओ स्टोर जवळ कुठेच नाहीत किंवा आमचा परिसर seal किंवा Quarantine केला असल्याने औषध बाहेरून आणणे शक्य नाहीत तर आम्ही औषध कसे मागवू शकतो?* 

उत्तर  *तुम्ही ड्युटीवर असलेल्या पोलिसांना औषध आणून देण्याबाबत विनंती करू शकता किंवा* 
*औषधे कुरियर किंवा पोस्टाने पाठवता येतात पण काही ठिकाणी त्यांची सर्व्हिस नसते किंवा उशिराने औषध मिळते.* 
*अश्या ठिकाणहून सर्वांनी एकत्र विचार विनिमय करून सर्वांसाठी एकत्र औषध मागवले तर ते  कुरियर ने पाठवणे अधिक योग्य ठरेल.* 

*सोसायटी मधील फॅमिली साठी एक एकट्या घरासाठी औषध मागवण्यापेक्षा एकत्र औषध मागवणे हे अधिक प्रॅक्टिकल ठरते*

प्रश्न 15 
*आधीच होमिओ औषध सुरु असेल तर काय करावे,?*

उत्तर 
*ज्यांच्या कडून होमिओ औषध सुरु आहे त्यांचा सल्ला घ्यावा*

प्रश्न 16
*कोरोना पॉसिटीव्ह लोकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी,  Quarantine मधील लोकांनी  हे औषध घेतले तर चालेल का?*
 *काय डोस घ्यावा?*

उत्तर  *अश्या लोकांनी व  ज्यांची टेस्ट positive आली आहे पण जे  asymptomatic आहेत त्यांनी* 
*Arsenic album 30 हे औषध दिवसातून 2 वेळा सकाळ संध्याकाळ असे 4 ते 5 दिवस घ्यावे*. 

*ज्यांना ताप अंगदुखी घसा दुखणे इत्यादी लक्षणें आहेत त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर च्या सल्ल्याने  Camphor किंवा  Bryonia  घ्यावे, त्याचे डोस डॉक्टर ठरवतील*

*हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्याना  ऍलोपॅथीच्या डॉक्टर च्या संमतीने हे औषध घेता येईल*

*डॉ प्रसाद हजारे भिवंडी ठाणे*
*9881374994*

ही महत्वाची माहिती कॉपी पेस्ट करून सर्वत्र शेअर करावी ही विनंती 🙏

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी चार रुग्ण

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 

चार रुग्ण  

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील 

आणखी चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

 आले आहेत. सायंकाळी सात जणांचे रिपोर्ट

 पॉजिटीव्ह आले, त्यात जुने 2 आणि आणि

 नवे पाच असे सात जण होते.  त्यामुळे 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित 

रुग्णाची संख्या आता ५२ झाली आहे.

     आता जे चार पॉजिटीव्ह रिपोर्ट आले

 आहेत, त्यात उमरगा शहरातील एक, लोहारा

 तालुक्यातील काटेचिंचोली येथील

 एक, वाशी   तालुक्यातील गोजवाडा 

येथील एक आणि उस्मानाबाद  

 तालुक्यातील धुता येथील एक असा 

समावेश आहे.

मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातून 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय

 विज्ञान संस्थेला एकूण 89 स्वाब  टेस्टसाठी 

 पाठवण्यात आले होते. त्यापैकी 82 अहवाल

 हे निगेटिव्ह आले आहेत तर ४  पॉजिटीव्ह

 आणि ३ प्रलंबित आहेत.  उस्मानाबाद

 जिल्ह्याने आता कोरोना मध्ये अर्धशतक 

मारले आहे.  सायंकाळी उस्मानाबाद

 जिल्ह्यात सात जणांचा कोरोना रिपोर्ट

 पॉजिटीव्ह आला आहे. त्यात तुळजापूर 

तालुक्यातील कार्ला ३, लोहारा तालुक्यातील

 जेवळी  येथील २, उस्मानाबाद तालुक्यातील

  धुता येथील एक आणि उमरगा तालुक्यातील

 केसरजवळगा येथील एक असा समावेश आहे.