Thursday, 18 June 2020

उस्मानाबाद -आज पाच कोरोना रिपोर्ट पाॅजिटीव

#CoronaUpdate

दि.18/6/2020 रोजी .सामान्य रुग्णालय #उस्मानाबाद येथून 37 swab तपासणीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 5 #पॉसिटीव्ह असून, 32 नेगेटिव्ह आहेत.


पॉसिटीव्ह पेशंट पैकी 3 सलगरा (दिवटी ) येथील 1 माळुम्बरा ता. तुळजापूर व 1 पेशंट नळदुर्ग सर्व पूर्वीच्या पेशंट च्या संपर्कातील आहेत. 

Total cases 165.

Discharge 127.

Death 6.

Active cases 32.

जि.प.प्राथमिक शाळा शेळका धानोरा-प्रवेश देणे चालू आहे

*🌟🌻🔊🔆*जि.प.प्राथमिक शाळा शेळका धानोरा*🔊💥🔶🌻 

🔻🔶🌻🌟🔆💥🔊🔊🔊🌟🌻🔶🔻🔶🌻🌟🔆🔊

प्रवेश फाॅर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

    https://forms.gle/2gHd4tbFKCEsVGAz6   👈येथे क्लिक करा.


🌻🌟प्रवेश चालु🌻🔶🔻🌻 आजच प्रवेश घ्या🌻🌟🌟🔻

🌻🔶🔻घाई करा🌻प्रवेश चालु🌻🔶

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी आमच्या जि.प.प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिश साठी इ.1ली ते 7 वी वर्गामध्ये प्रवेश देणे चालू आहे.तरी पालकांनी सदरील Google form मध्ये माहिती भरून आजच प्रवेश निश्चित करावा.*

Wednesday, 17 June 2020

BP विषयी BP वाढविणारी वास्तविक माहिती.


BP विषयी BP वाढविणारी वास्तविक माहिती.


मित्रानो, आजकाल डॉक्टरांनी सांगितलेल्या किंवा अन्य माध्यमातून आपल्याला ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज 80 - 100  अशी माहिती प्राप्त होते.


त्याच्या आधारावरच आपण औषधे घेतो किंवा अन्य उपचार करतो व ह्या गोष्टीचे घातक टेन्शन घेऊनआपण जगत असतो.


आता आपण आपले डोळे उघडणाऱ्या हकीकती जाणून घेऊ या.


1970 पर्यंत म्हणजे आजपासून 47 वर्षापूर्वीच्या काळात, ब्लड प्रेशरची प्रचलित नॉर्मल रेंज काय होती हे तुम्हाला माहित आहे का? ती रेंज होती 110 – 170. होय हे खरे आहे, खालचे 110 आणि वरचे 170. त्यानंतर काही समाजाचे हितेच्छु समजल्या जाणाऱ्या मंडळीनी एकत्र येऊन, व स्वत:चे वर्चस्व वापरून सर्व अमेरिकेसाठी ह्या प्रमाणात थोडा बदल करविला.


आणि नवीन प्रमाण आले 110 – 160.


1980मध्ये WHO ह्या संघटनेने एक कमिटी नियुक्त केली. *(हे सर्व कमिटी मेम्बर मोठमोठ्या औषध कंपन्यांचे मालक होते)*. त्यांनी नवीन प्रमाण दिले 100 – 150.


1997 पर्यंत जगभर हेच प्रमाण प्रचलित झाले. परंतु औषध कंपन्यांना ह्याचा फारसा फायदा न झाल्याने, 1997 मध्ये WHO ने पुन्हा एक कमिटी नियुक्त केली. *(सर्व औषध कंपन्यांचे मालक च होते).*

नवीन प्रमाण आले 100 – 140.

ह्या मुळे एका रात्रीत केवळ अमेरिकेतील 14% लोक ब्लड प्रेशरचे पेशंट निर्माण झाले. (औषधं कंपन्यांचा केवढा फायदा!!!)


इतके करूनही कांही औषधं कंपन्यांच्या मालकांचे समाधान न झाल्याने 2003 साली WHO ने पुन्हा अश्या लोकांची नवीन कमिटी नियुक्त केली.


आता नवीन प्रमाण आले 90 – 126.

पुन्हा एका रात्रीत 18% पेशंट वाढले.


पुन्हा दोन वर्षांनी ह्याच घटनेची पुनरावृती झाली. आणि नवीन प्रमाण आले 80 – 120. आणि पुन्हा एका रात्रीत 45% पेशंटची वाढ. 


मित्रानो,आजकाळ तुम्ही खरोखर पेशंट आहात की नांही, हे तुमच्या शारीरिक स्थितीवरून ठरत नांही तर, ह्या लोभी औषधं कंपन्यांच्या मालकांच्या इशाऱ्यावरून ठरते.हे ध्यानात घेणे महत्वपूर्ण होईल. अशी लुट अनेक क्षेतात बीनदिक्कत सुरु आहे.

🙏

*मधु सरस्वती*

आज उस्मानाबाद जिल्ह्यात पाच नवे रूग्ण सापडले

उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. सर्वच्या सर्व रुग्ण लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. दरम्यान, आतापर्यंत १५९ कोरोना रुग्ण सापडले असून, पैकी १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच जणांचा मृत्यू झाला असून, केवळ २९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील ४७ जणांचा स्वाब आज तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे पाठवण्यात आला होता, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून, पैकी पाच पॉजिटीव्ह तर ४२ निगेटिव्ह रिपोर्ट आहेत.; पाचही पॉजिटीव्ह रुग्ण  लक्ष्मीनगर, भूम येथील असून, पूर्वीच्या रुग्णा संपर्कातील आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना अपडेट 


एकूण बाधित रुग्ण  - १५९ 


बरे झालेले रुग्ण - १२५


मृत्यू पावलेले रुग्ण - ५


ऍक्टिव्ह रुग्ण - २९  

शिवकालीन वजने(मापे)




 * अठवे- शेराचा 1/8

 * अडशेरि- अडीच शेर

 * अदपाव- अर्धा पावशेर

 * अदमण- अर्धा मण

 * अदशेर- अर्धा शेर

 * अधोली- अर्धी पायली

 * अंजली- ओजळभर पानी

 * आटके- अर्धा शेर

 * आढक- चार शेर, पायली

 * कर्ष- सोळा माषांचे एक परीमाण

 * कार्त- पाव रत्तल

 * किळवे- अर्धा छटाक, अर्धे निवळे

 * कुडव- आठ शेर

 * कुंभ- वीस खंडी

 * कोथळी- मुंबईत 6 मणांची गोनी

 * कोड- खंडी, वीस मण

 * कोळवे- शेराचा अष्ठमांश

 * खारी- 16 द्रोण, एक खंडी

 * गरांव- अर्ध गूंज माप

 * गिधवे- धान्य मोजन्याचे एक माप

 * गुंज-  एक वजन परिमाण

 * चंपा- दोन शेर धान्याचे माप 

 * चवाटके- छटाक

 * चवाळामण- एक प्रकारचा मण

 * चाटंक- पांच तोळे वजनाचे परिमाण

 * चाळीसा- चाळीस शेरांचे माप

 * चिटके- अर्ध्या कोळव्याचे माप

 * चिपटे- पावशेराचे माप

 * चिमटी- हाताचा अंगठा व तर्जनी याच्या पकडित मावनारा पदार्थ

 * चिळवे- कोळव्याचा निम्मा भाग

 * चोथवा- एक पायली

 * चौटके- चार टाकांचे माप,छाटाक, चवटके

 * चौशेरी- चार शेरांचे माप

 * छटाकी- छटाक

 * छतिसी- छत्तीस परिमानाचे वजन

 * टवणा- पांच शेरांचे माप

 * टांक- एक तोळा

 * टिपरी- मापी पावशेर

 * टोमणे- पांच शेरांचे तेल मोजन्याचे माप

 * टवका- दोन्ही हातात मावेल एवढे परिमाण, कवटा

 * डवक- वस्तुवर पाचही बोटे पसरुन मारून घेतलेले परिमाण

 * डोळा- 16 शेरांचे माप

 * धडा- दहा शेरी वजन केलेल्या मापाचे परिमाण

 * धरण- सुमारे 24 गूंजाइतके वजन

 * नकटे- अर्ध्या पावशेराचे माप,निपटे,नवटाक,10 तोळ्यांचे वजन

 * नग- कापसाचे वजन करण्याचे एक परिमाण

 * नाकटी- दीड पावशेराचे माप

 * नाळके- एक माप

 * निउटके- शेराचा बत्तीसावा हिस्सा

 * तोळा- 96 भार गुंजांचा तोळा

 * पक्का शेर- 80 तोळ्यांचा शेर

 * पड- मापी 2 शेर, पाउन शेर

 * पल- 40 मासे वजन, 380 गुंजांचे वजन

 * पल्ला- 30 पायली किंवा 120 शेर, 120 शेरांचे अडीच मणाचे पक्के वजन

 * पान- पावशेर

 * पाभ- एक प्रकारचे माप

 * पायली- चार शेरांचे माप

 * पायली- 48 शेरांची खानदेशि एक पायली

 * पिक्कल- 5320 सुरती रूपये भार वजन

 * पिटके- अदपाव

 * फरा/फरी- धान्य मोजन्याचे साधन

 * बेताळामण- 1568 सुरती रुपयांचे एक माप

 * भरा- धान्याचे एक माप

 * भरो- चार खंडीचे कुडाळ प्रांतातिल एक माप

 * भार- आठ हजार तोळे वजन

 * मणखाण- सुमारे एक मण

 * मणका- एक मणाचे माप

 * मापटे- अर्धा शेर

 * मापारी- धान्य ई. मोजन्याचे फरां नावाचे एक माप

 * माष- पांच, आठ किंवा दहा रत्तीच वजन

* मासा- आठ गुंजांचे वजन

 * मुटला- सहा शेराची गुळाची ठेप

 * मूठ- मुठभर धान्य

 * रत्तल/रतल- सुमारे 15 औसांचे म्हणजे 36 सुरती रूपयांइतके वजन

 * रोवळा- एक माप

 * लिक्षा- मोहरीच्या दाण्याच्या एक षोडशांश वजनाइतके परिमाण

 * वाल- तिन गूंजाभर वजन

 * वैताद- एक तृतयांश तोळा 

 * शणपो- भात मोजन्याची मोठी ओंजळ 

 * शिरिद- पावशेर

 * शीग- धान्याचे माप भरले असता मापाच्या वर येणारी निमुळती रास

 * शिगवर- अगदी शीग लोटून सपाट केलेले माप

 * शेर- पदार्थ तोलावयाचे किंवा मापावयाचे एक प्रमाण

 * साक- एक हाताची ओंजळ

 * सामाशी- सहा मासे वजनाचे

#खासरे ]

Tuesday, 16 June 2020

उस्मानाबाद -चार रूग्णांचा रिपोर्ट पाॅजिटीव, एक मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील चार जणांचा 


 कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे तर एका


 कोरोना  बाधित महिलेचा मृत्यू झालेला आहे. 


वानेवाडी, सलगरा , मसाला आणि बेटजवळगा  येथील प्रत्येकी 


 एक रुग्ण कोरोना बाधित सापडला असून, उस्मानाबाद


 शहरातील  कोरोना बाधित  आठ महिन्याची गर्भवती


 महिला मृत्यू पावली आहे. 


आज 16 जून रोजी, सामान्य रुग्णालय उस्मानाबाद


 येथून 53 स्वाब  तपासणीसाठी विलासराव देशमुख


 शासकीय वैदकीय महाविद्यालय, लातूर तेथे


 पाठविण्यात आले होते. सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून


 त्यापैकी 4 पॉजिटीव्ह , 4 inconclusive व 45


 निगेटिव्ह  रिपोर्ट आले आहेत. 


पॉजिटीव्ह रुग्णाची माहिती 


 रुग्ण वाणेवाडी ता. उस्मानाबाद येथील असून पूर्वीच्या


 रुग्णाच्या  संपर्कातील आहे. एक रुग्ण  सलगरा ता.


 तुळजापूर येथील आहे. एक रुग्ण मसला  ता. तुळजापूर


 येथील असून तो दोन दिवसापूर्वी पॉजिटीव्ह


 रुग्णाचा  सहप्रवासी आहे. एक रुग्ण  बेटजवळगा ता.


 उमरगा येथील असून तो दहा दिवसापूर्वी मुंबई वरून


 आला आहे. 


त्याचबरोबर उस्मानाबाद शहरातील


 बोबले हुनुमान चौकातील एक आठ महिन्याची गर्भवती


 महिला लातूरला ऍडमिट होती. तिचा कोरोना रिपोर्ट


 पॉजिटीव्ह होता, तिचा आज मृत्यू झाला आहे. 


कोरोना बाधित रुग्ण  - 153


बरे झालेले रुग्ण - 116


मृत्यू - 6


एक्टीव्ह रुग्ण - 31


शिक्षणव्यवस्था सुधारण्याची सुसंधी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 

14 Jun 2020, 


करोनाने एकूणच सध्याच्या शिक्षणव्यवस्थेपुढे एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आधीच्या शैक्षणिक वर्षाचा निकाल लागण्याआधीच, नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.


*डॉ. वसंत काळपांडे*


करोनाने एकूणच सध्याच्या शिक्षणव्यवस्थेपुढे एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आधीच्या शैक्षणिक वर्षाचा निकाल लागण्याआधीच, नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परिणामी विद्यार्थी, पालक आणि काही प्रमाणात सरकारही संभ्रमित आहे. शिक्षण कुठून, कसे सुरू करावे याचा गलबला सर्वत्र सुरू आहे. त्यात आता 'ऑनलाइन' शिक्षणाने डिजिटल विषमतेची मेढ रोवली आहे... या साऱ्याचा आढावा घेणारे लेख.


करोनामुळे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यातच शाळा बंद करण्यात आल्या. काही शाळांच्या परीक्षा घ्यायच्या राहिल्या होत्या. राज्य मंडळाची बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती, तर दहावीचा भूगोलाचा एकच पेपर राहिला होता. या सर्व बाबतींत शासनाने सुयोग्य निर्णय घेऊन पालकांना आणि विद्यार्थ्यांना चिंतामुक्त केले आहे. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती निकालपत्रक पडायचे आणि शैक्षणिक वर्ष संपले असे जाहीर करून पुढचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होईल, हे सांगितले जायचे. या वर्षी शैक्षणिक वर्षाचा 'सांगता समारंभ' अनुभवता न आल्यामुळे काही 'बोलके' पालक आणि शिक्षक अस्वस्थ झाले आहेत. आता वेध लागले आहेत ते शाळा पुन्हा सुरू होण्याचे. याबद्दलचा निर्णय योग्य तो विचार आणि नियोजन करून शासन घेईलच.



करोनाकाळात एससीईआरटी, काही उत्साही शिक्षक आणि अनेक खासगी संस्था यांनी ऑनलाइन शैक्षणिक कार्यक्रमांचा भडिमार करून शैक्षणिक भवितव्याविषयी निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेत भरच टाकली. खरेतर उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मुलांसाठी खेळण्याचे, आपल्याला आवडेल ते करण्याचे, आवडेल ते वाचण्याचे दिवस. त्यावर या कार्यक्रमांनी अतिक्रमण केले. ज्यांच्याकडे, स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट या सुविधा नव्हत्या, किंवा ज्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले ते यातून सुटले.


शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल कार्यक्रम तयार करणे हे दीर्घकालीन नियोजन करून, शिक्षणक्षेत्रातील आणि माध्यमांतील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, कलाकारांचे सहकार्य घेऊन जबाबदारीने करायचे काम आहे. विशेषतः राज्यस्तरावर केल्या जाणाऱ्या कामात तर ते अत्यंत आवश्यक आहे. तसे झाल्याचे सध्या तरी दिसत नाही. डिजिटल कार्यक्रमांत शिक्षकांचा सहभाग मुख्यतः शैक्षणिक बाबींशी निगडित हवा. अभ्यासक्रमातला कोणता भाग कसा सादर केला, तर प्रभावी ठरेल याच्या कल्पना त्यांनी द्याव्यात. माध्यमतज्ज्ञांच्या सल्ल्याने डिजिटल साहित्याच्या संहिता लिहाव्या. मुलांचे कार्यक्रम बसवायला मदत करावी, त्याऐवजी डिजिटल कार्यक्रम तयार करण्याचे तांत्रिक कामही त्यांच्यावरच टाकले, तर त्यांचा दर्जा चांगला कसा राहील? शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असणे आवश्यकच आहे, पण ते स्वत:चे ज्ञान वाढवण्यासाठी आणि अध्यापन प्रभावी होण्यासाठी. सध्या पाहायला मिळणारे बहुतेक साहित्य तांत्रिक किंवा शैक्षणिक, कुठल्याच बाबतीत समाधानकारक नाही. सुमार दर्जाच्या अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसानच होते.



मराठीव्यतिरिक्त राज्यात उर्दू, हिंदी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या डिजिटल कार्यक्रमांच्या संदर्भात विचार झाल्याचे दिसत नाही. शासनाकडे असलेल्या संसाधनांचा उपयोग या आपत्काळात कसा करून घेता येईल, याचाही विचार झाल्याचे दिसले नाही. महाराष्ट्र शासनाच्या बालचित्रवाणी या संस्थेने सुमारे ३००० दर्जेदार शालेय कार्यक्रम तयार केले होते. त्यातील निवडक रंजक कार्यक्रम सुट्टीतही दाखवता आले असते. शासनाने ही संस्था बंद करण्याची चूक करून एक प्रकारे स्वत:च्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली.


त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून ऑगस्टनंतर टप्प्या-टप्प्याने विद्यार्थी शाळांमध्ये यायला सुरवात होईल, असे दिसते. शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांच्या करोनाकाळातील शिक्षणासाठी आणि पूर्वतयारीसाठी आधीपासूनच शाळेत जायला सुरुवात करावी. यापुढे शाळेचे स्वरूप 'पारंपरिक शाळा, गृहशिक्षण आणि दूरशिक्षण' यांचा संकर असे राहील, तर अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप शिक्षकांचे अध्यापन, पालकांचे आणि परिसरातील इतर व्यक्तींचे मार्गदर्शन, स्वयंअध्ययन, सहअध्ययन आणि दूरशिक्षण असे संमिश्र राहणार आहे. यापुढे विद्यार्थी शाळेत आणि शिक्षकांसोबत नेहमीच्या तुलनेत निम्मा वेळच असतील. त्यामुळे पालक आणि स्वयंस्फूर्तीने मदत करू शकणारे समाजाचे विविध घटक यांचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत नियोजनपूर्वक सहभाग घ्यावा लागेल.


करोनाचा सामना कसा करायचा याबद्दल तर अनिश्चितता आहेच; पण या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केव्हा, कशी करायची आणि वर्षभर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी काय करायचे, याचे चित्रसुद्धा धूसरच आहे. परंतु शालेय शिक्षणात या अनिश्चिततेला निश्चिततेची एक किनार लाभली आहे, ती म्हणजे वेळेच्या आधीच उपलब्ध झालेली पाठ्यपुस्तके. बालभारतीची सर्व पुस्तके तयार होऊन त्यांचे वाटपसुद्धा जवळपास पूर्ण झाले आहे. करोनामुळे सर्व गोष्टी पुढे जात आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकालसुद्धा. २४ मार्च २०२० रोजी एकूण पुस्तकांपैकी सुमारे ३० टक्के म्हणजे चक्क तीन कोटी पुस्तके छापून यायची होती. पण लॉकडाउनच्या काळात ही पुस्तके छापून घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याची, आश्चर्य वाटावे अशी कामगिरी बालभारतीने प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने पार पाडली. या बाबीचा आपल्याला कोणत्या प्रकारे शैक्षणिक फायदा करून घेता येईल?


पाठ्यपुस्तक हे राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात पोचणारे, शिकण्याचे एकमेव साधन आहे, हे २००५च्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात नमूद केले आहे. महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकांत वेळोवेळी अनेक चांगले बदल करण्यात आले आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी काय आणि कसे शिकावे याचे मार्गदर्शन करणारे, किमान दर्जाची हमी देणारे, विश्वासार्ह आशय असणारे आणि चुकांचे प्रमाण नगण्य असलेले ते अतिशय महत्त्वाचे साधन आहे. त्यातील आशय वयानुरूप श्रेणीबद्ध पद्धतीने क्रमवार लावलेला असतो. आधीच्या आणि नंतरच्या इयत्तांची पुस्तके आता बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. समान आशय, परंतु अध्ययन-अध्यापनात गरजेनुसार लवचीकता अशा रीतीने रचना केलेल्या हल्लीच्या पाठ्यपुस्तकांत सर्वांना सहज करता येतील अशा कृती, उपक्रम, प्रकल्प भरपूर प्रमाणात आहेत. ते त्या त्या ठिकाणच्या संबोधाशी, कौशल्याशी व्यवस्थित जोडलेले आहेत. पाठ्यपुस्तकांत उद्दिष्टे, इंटरनेटवरील उपयुक्त लिंक्स, साईट्स, त्या वापराव्या कशा, याची शिक्षक पालकांसाठी सूचना आणि इतर माहिती आणि मार्गदर्शन देणारा भागही आहे. अवांतर पूरक वाचन अपेक्षित आहेच.


असे असूनही काही प्रभावशाली व्यक्ती आणि संस्था स्वयंकेंद्रित आणि नकारात्मक हेतूंनी गेली दहा वर्षे 'पाठ्यपुस्तकाबाहेर जा', 'पाठयपुस्तक म्हणजे शिक्षण नाही', 'पाठयपुस्तक म्हणजे घोकंपट्टी', असा अपप्रचार करत आहेत. पाठ्यपुस्तकाला पर्याय म्हणून ते जे काही देतात, ते बहुतेक वेळा एकतर पाठ्यपुस्तकांत दिलेलेच असते; नसेल तर सुमार दर्जाचे असते. दुर्दैवाने आज पाठ्यपुस्तकांतील नवे बदल, चांगल्या बाबी सर्व शिक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याची प्रशिक्षण व्यवस्था आपल्याकडे नाही; होती ती नष्ट केली. खासगी संस्थांकडे काम आऊटसोर्स केले. या संस्था शासनाचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांना महत्त्व देत नाहीत. मग त्या प्रशिक्षणाचा उपयोग झाला नाही की शिक्षकांना नावे ठेवायची किंवा काम नीटच झाले, असे अहवाल दडपून तयार करायचे, असे घडते. अशा व्यवस्थांचा आपत्काळात काय उपयोग होणार? त्याऐवजी पाठ्यपुस्तकांसारख्या सहज हाताशी असलेल्या साधनांचा या काळात अधिकाधिक चांगल्या रीतीने वापर कसा करून घेता येईल, याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्याची गरज आहे.


शिक्षकांनीसुद्धा 'असर'च्या अहवालांवर टीका करण्यात आपली शक्ती वाया घालवण्याऐवजी, आपले विद्यार्थी प्रत्येक इयत्तेत वयानुरूप प्रगती करतात की नाही, हे सतत तपासायला हवे. कारण त्यांचे विद्यार्थी हेच त्यांच्या कामाचा आरसा असतात. त्यासाठी मूल्यमापन पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. मूल्यमापनाची परिभाषा बदलली, तरी ढाचा तोच राहिला आहे. लेखी परीक्षेव्यतिरिक्त मुलांची इतर कौशल्ये, क्षमता, समज, वृत्ती तपासण्याची विविध विश्वासार्ह साधने, पद्धती शिक्षकांसमोर ठेवण्यात आलेली दिसत नाहीत. उलट नव्या बदलांना छेद देणाऱ्या पद्धती कायम कशा राहतील, याचीच काळजी घेतली गेली. पारंपरिक लेखी प्रश्नोत्तरे सोडून बाकी सर्व भाग आपण श्रेणी, गुण नसलेल्या नोंदी, गृहकार्य, आणि तत्सम गोष्टींमध्ये ढकलून दिला. मूल्यमापनाचे ठरावीक साचे सर्वांना सरसकट सक्तीचे केल्यामुळे त्याबाबतीतले शिक्षकांचे स्वातंत्र्य, विद्यार्थ्यांना खरोखर उपयोगी होईल असे नवीन काही करून बघण्याची प्रेरणा नष्ट होत आहे. शिक्षकांचे नवोपक्रम 'स्वान्त सुखाय' नसतात, तर शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यासाठी असतात, हे शिक्षकांनीसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. लेखक त्याच्या साहित्यकृतींत पाहायचा असतो, कलाकार त्याच्या कलाकृतींत पाहायचा असतो; तसाच शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायचा असतो, याचे भान सुटून देऊन चालणार नाही.


शिक्षक कोणत्याही इयत्तेला शिकवत असले, तरी खालील आणि वरील सर्व इयत्तांचा अभ्यासक्रम त्यांना चांगला माहीत हवा. म्हणजे प्रत्येक मूल कुठे आहे, त्याला किती गॅप भरून काढायची आहे, किंवा किती पुढे झेप घेतली आहे, हे त्यांना कळेल. प्रत्येक विद्यार्थ्याचे जजमेंट कसे घ्यावे, याचे प्रशिक्षण शिक्षकांना आत्ताच मिळायला हवे. मूल्यमापन केल्यानंतर शिक्षकांना उपाययोजना करण्याचे स्वातंत्र्य हवे आणि त्यासाठी बालसुलभ मार्गच वापरावे ही भूमिका कटाक्षाने घेतली जाईल, अशी दक्षता घ्यायला हवी.


या गोष्टी घडण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शाळा, प्रशासन, समाज यांचे दाट वीण असलेले एक संवेदनशील जाळे निर्माण व्हायला हवे. त्यातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या गरजा काय आहेत, याचे मूल्यमापन करणारी कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहू शकेल. शिक्षणातली कोंडी फोडण्यासाठी करोना ही एक इष्टापत्तीच समजली पाहिजे. औपचारिक मूल्यमापनाचा ढाचा मोडून, अशी कामे करण्याची संधी आताच आहे. प्राथमिक स्तरावर केव्हा परीक्षा घ्यायच्या, कशा घ्यायच्या याचे पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना हवे. मात्र प्रत्येक मूल आहे त्यापेक्षा पुढे जाईल हे त्यांनी पाहावे. गुण देण्यापेक्षा मुलांना काय येते, काय नाही, याच्या वैयक्तिक नोंदी कराव्यात. प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक फाईल असावी. प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे नेण्याचे हे काम 'मिशन मोड'मध्ये करता यावे, यासाठी शिक्षकांना शाळेच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी वापरण्यास संबंधित शासकीय विभागांनी स्पष्ट नकार द्यावा. शिक्षकांनीही आर्थिक स्वरूपातील लोकसहभागापेक्षा मुलांवर वैयक्तिक लक्ष देऊन शिकवणे, आरोग्य-स्वच्छतेची काळजी घेऊन शालेय परिसर शिक्षणोत्तेजक बनवणे, पाठ्यपुस्तकातील उपक्रम, प्रकल्प, कृती, खेळ घेणे, यासाठी पालक आणि समाजाचे विविध घटक यांची मदत घ्यावी. या विद्यार्थिमित्रांनी शिक्षकांना विनामोबदला मदत करण्याचे आवाहन शासनाने केल्यास नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि शाळेचे कामकाजही आणखी पारदर्शक व्हायला मदत होईल.


मूल्यमापन प्रक्रियेत मूलभूत बदल, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पाठ्यपुस्तकांचा प्रभावी वापर, 'मिशन मोड'मध्ये पालकांचा आणि समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती आणि शिक्षकांचा व्यावसायिक विकास आणि या सर्वांसाठी शिक्षकांना आवश्यक ते स्वातंत्र्य या कळीच्या मुद्द्यांकडे यापुढेही कायमच लक्ष दिले पाहिजे. तेच खऱ्या अर्थाने विद्यार्थिहिताचे आहे. संकटकाळात आपण आपल्या पूर्वीच्या सर्व पद्धती बाजूला ठेवून नवीन वाटा चोखाळत असतो. करोनाने हे आपल्याला करायला भाग पाडले आहे. हे सर्व करण्याची वेळ हीच आहे. हे आज केले नाही, तर पुढे ते आणखीच अवघड होईल आणि आपली वाटचाल अधोगतीकडे होत राहील.

Monday, 15 June 2020

उस्मानाबाद -आज एकही रिपोर्ट पाॅजिटीव नाही

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात तीन दिवसानंतर पुन्हा एकदा एकही कोरोना  रिपोर्ट  पॉजिटीव्ह आलेला नाही. तसेच १४८ पैकी ११५ रुग्ण बरे झाले असून, केवळ २८ रुग्ण  ऍक्टिव्ह आहेत. 


आज दि. १५ जून  रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून  शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय लातूर येथे 28 स्वाब  तपासणी साठी पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून, 26 निगेटिव्ह, एक inconclusive व एक रिजेक्ट असा रिपोर्ट आलेला आहे.   


कोरोना बाधित रुग्ण - १४८


बरे झालेले रुग्ण - ११५


मृत्यू  पावलेले रुग्ण - ५


 ऍक्टिव्ह रुग्ण -  २८

Sunday, 14 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी तीन रूग्ण कोरोना पाॅजिटीव सापडले.

उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी तीन रूग्ण कोरोना पाॅजिटीव सापडले. 


लोहारा तालुक्यात एक व तुळजापूर तालुक्यात दोन रूग्णांची चाचणी पाॅजिटीव आली आहे.

तीनही रूग्ण मुंबई व पुणे रिटर्न्स आहेत.

एकूण संख्या 148 

उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तीन मृत्यू

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ तासात तीन मृत्यू 



उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे तिघांचा  मृत्यू  झाला आहे. त्यात  उस्मानाबाद शहरातील दोन आणि कारी येथील एक अश्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या सहा झाली आहे.
उस्मानाबाद शहरातील देवी मंदिर परिसरातील एका २५ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे शनिवारी  मृत्यू झाला होता, त्यानंतर आज ( रविवारी ) उस्मानाबाद शहरातीलच उस्मानपुरा, काकानगर भागातील ५०  वर्षीय व्यक्तीचा  मृत्यू  झाला.  हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता, त्यास मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता, असे सांगण्यात आले.
त्यानंतर कारी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा  मृत्यू  झाला आहे. या वृद्धास काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यास उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. दहा दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु त्याचा देखील  मृत्यू  झालेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी तीन रुग्ण लातूर, सोलापूर आणि पुणे येथे ऍडमिट आहेत. त्यांची नोंद उस्मानाबाद मध्ये नाही. उर्वरित १४३ पैकी सहा बळी गेले आहेत. त्यात . गेल्या २४ तासात तीन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोना बाधित रुग्ण - १४६

बरे झालेले रुग्ण - १०५

मृत्यू  पावलेले रुग्ण - ६

 ऍक्टिव्ह रुग्ण -  ३५

Saturday, 13 June 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन पॉजिटीव्ह

उस्मानाबाद जिल्ह्यात आज तीन पॉजिटीव्ह  

भूम एक आणि परंडा दोन जणांना कोरोनाची बाधा  


उस्मानाबाद -  सलग दुसऱ्या दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यात भूम   येथील एक आणि परंडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता १४५ झाली आहे. पैकी १०५  बरे झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ७३  जणांचे स्वॅब आज १३  जून रोजी लातूरला पाठवण्यात आले होते,पैकी  तीन पॉजिटीव्ह , ७०  निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. पॉजिटीव्ह रुग्णापैकी एक रुग्ण  भूम  आणि दुसरे दोन रुग्ण  हे  परांडा येथील पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

 उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण १४५ 

एकूण बरे झालेले  रुग्ण -१०५ 

उपचार घेत असलेले रुग्ण - ३६ 

एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - ४

 तालुकानिहाय रुग्ण

  उस्मानाबाद - ५९

 कळंब- ३६ 

उमरगा - १६

 परंडा - १७ 

लोहारा -२ 

वाशी - 0 

तुळजापूर -१२ 

भूम -३


उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी


उस्मानाबादेत कोरोनाचा चौथा बळी 


उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील २५ वर्षीय कोरोना बाधित तरुणाचे आज निधन झाले, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या आता चार झाली आहे.उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणास कोरोना झाला होता, तो गेल्या २६ दिवसापासून उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार होता. त्यास ब्लड कॅन्सरचा दुर्धर आजार होता, त्यात कोरोना झाल्यामुळे या तरुणाची प्रकृती नाजूक बनली होती, अखेर त्याचे आज शनिवारी निधन झाले.उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  १४२ जणांना  कोरोना झाला आहे. पैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. १४२ पैकी १०५ बरे झाले असून, ३३ रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत. 


Friday, 12 June 2020

किडनी स्टोन (मुतखडा) घरेलू उपचार

किडनी स्टोन (मुतखडा)

 घरेलू उपचार


किडनी में स्टोन होना एक आम समस्या है. यूरीन में कई रासायनिक तत्व मौजूद होते हैं. यूरिक एसिड, फॉस्फोरस, कैल्शियम और ऑक्जेलिक एसिड. यही सारे रासायनिक तत्व स्टोन बनाने के लिए उत्तरदायी होते हैं.


इसके साथ ही बहुत अधिक मात्रा में विटामिन डी के सेवन से, शरीर में लवणों के असंतुलन से, डीहाइड्रेशन से और अनियमित डाइट की वजह से भी किडनी में स्टोन हो जाता है.

किडनी में स्टोन हो जाने की वजह से पेट में हर वक्त दर्द बना रहता है. इसके अलावा बार-बार यूरीन डिस्चार्ज करना, शौच के दौरान दर्द होना, बहुत ज्यादा पसीना आना और उल्टी होना इसके लक्षण हैं.

हालांकि इसके उपचार के लिए कई तरह की दवाइयां बाजार में उपलब्ध हैं और ऑपरेशन से भी इसका इलाज संभव है लेकिन आप इन घरेलू उपायों को अपनाकर भी किडनी के स्टोन से राहत पा सकते हैं .

घरेलू उपायों के साथ ही ये बेहद जरूरी है कि आप नियमित रूप से 10 गिलास पानी का सेवन करें. स्टोन होने की हालत में कम पानी पीना दर्द और तकलीफ की वजह बन सकता है .

1. लेमन जूस और ऑलिव ऑयल

बरसों से लेमन जूस और ऑलिव ऑयल को मिलाकर उसका सेवन गॉलब्लेडर के स्टोन के लिए किया जाता रहा है लेकिन किडनी के स्टोन में भी ये काफी कारगर है . नींबू के रस में मौजूद सिट्रिक एसिड कैल्शियम बेस वाले स्टोन को तोड़ने का काम करता है और दोबारा बनने से भी रोकता है. इस मिश्रण को बनाने के लिए नींबू के रस और ऑलिव ऑयल को बराबर मात्रा में लेकर मिला लें और दिन में दो से तीन बार इसका सेवन करें.

2. अनार

अनार का जूस और उसके बीज दोनों में ही एस्ट्रीजेंट गुण होता है जो कि किडनी के स्टोन के इलाज में मददगार है. यदि आपकी किडनी में स्टोन है तो प्रतिदिन एक अनार खाना या फिर उसका जूस पीना फायदेमंद हो सकता है. इसके अलावा अनार को फ्रूट-सलाद में भी मिलाकर खाया जा सकता है.

3. तरबूज

मैग्निशियम, फॉस्फेट्स, कार्बोनेट और कैल्शियम से बने किडनी स्टोन के इलाज के लिए तरबूज एक बहुत अच्छा और कारगर उपाय है. तरबूज में पर्याप्त मात्रा में पोटैशियम मौजूद होता है जोकि स्वस्थ किडनी के लिए एक प्रमुख तत्व है. पोटैशियम यूरीन में एसिड लेवल को मेंटेन रखने में मदद करता है. पोटैशियम के साथ ही पानी भी भरपूर होता है जोकि स्टोन को नेचुरल तरीके से शरीर से बाहर निकाल देता है.

4. राजमा

राजमा में भरपूर फाइबर होता है. इसे किडनी बीन्स के नाम से भी जाना जाता है. किडनी बीन्स किडनी और ब्लेडर से जुड़ी हर किस्म की समस्या से राहत दिलाने में कारगर होती है. इसे बनाने से पूर्व जिस पानी में भिगोया जाता है उसे पीने से भी फायदा मिलता है.

5. व्हीट ग्रास

व्हीट ग्रास को पानी में उबालकर ठंडा कर लें. इसके नियमित सेवन से किडनी के स्टोन और किडनी से जुड़ी दूसरी बीमारियों में काफी आराम मिलता है. इसमे कुछ मात्रा में नींबू का रस मिलाकर पीना और बहतर हो सकता है.